आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल अडकणार लग्नाच्या बेडीत, भावी पत्नीसोबत शेअर केला फोटो; चेन्नई सुपर किंग्सने दिला 'हा' सल्ला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युजवेंद्र चहलची भावी पत्नी धनश्रीने देखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला
  • धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर, यूट्यूबर आणि कोरिओग्राफर आहे

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मुंबईच्या डॉक्टर, कोरियोग्राफरने चहलची विकेट घेतली. चहनने सोशल मीडियाद्वारे आपला साखरपुडा झाल्याची माहिती दिली. सोबतच त्याने होणारी पत्नी धनश्री वर्मासोबतचा एक फोटो देखील शेअर केला. फोटोसोबत चहलने लिहिले की, आम्ही कुटुंबातील 'रोको सेरेमनी'ला होकार दिला.

चहलच्या ट्विटरवर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि सुरेश रैनासह अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. आयपीएलची टीम चेन्नई सुपर किंग्जने शुभेच्छा देत सल्ला दिला की, रानी समोर आत्मसमर्पण कर, अन्यथा पराभव होईल.

धनश्रीने चहलच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला होता

धनश्री व्यवसायाने डॉक्टर, यूट्यूबर आणि कोरिओग्राफर आहे. ती मुंबईत राहते. तिने देखील इन्स्टाग्रामवर चहलसोबत रोका सेरेमनीचा फोटो शेअर केला. याआधी धनश्रीने चहलच्या वाढदिवसादिवशी 23 जुलै रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. तेव्हा तिने लिहिले की, 'हा डान्स टीचर तुमची विकेट घेऊ शकते. तुम्ही सर्वात मनोरंजक विद्यार्थी आणि उत्कृष्ट व्यक्ती आहात. आपल्या उजव्या लेग स्पिनरसोबत स्लो मोशनची भावना.'

बातम्या आणखी आहेत...