आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी दोन खेळाडूंना कोरोना:चहल आणि गौतम कोरोना पॉझिटिव्ह; कृणाल पांड्याच्या संपर्कात आले होते, भारतात परतणार नाहीत श्रीलंका दौऱ्यावर संक्रमित खेळाडू

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर खेळाडू भारतात होणार रवाना

भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि फिरकी गोलंदाज अष्टपैलू कृष्णाप्पा गौतम हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. हे दोन्ही खेळाडू कृणाल पांड्याच्या अतिशय जवळच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना दोन्ही टी-20 सामन्याला मुकावे लागले आहे. कारण यापूर्वी 27 जुलै रोजी पहिल्या टी-20 सामन्यानंतर कृणाला पांड्या कोरोनाबाधित झाला होता.

दरम्यान, पांड्या यांच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. यामुळे दुसरा टी-20 सामना एका दिवसासाठी पुढे ढकलवा लागला होता. श्रीलंका दौऱ्यावर संक्रमित झालेले तीनही खेळाडू सध्यातरी भारतात परतणार नाहीयेत.

इतर खेळाडू भारतात होणार रवाना
भारत आणि श्रीलंका संघादरम्यानची मालिका काल संपली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित तीन खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडू भारतासाठी रवाना होणार आहे. यामध्ये कृणालच्या संपर्कांत आलेल्या 6 खेळाडूंचा समावेश आहे. हार्दिक पंड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, दीपक चहर आणि ईशान किशन या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

चहल आणि गौतमचा अवहाल आला पॉझिटिव्ह
या दोन्ही खेळाडूंचा अवहाला शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. परंतु, 27 जुलै रोजी कृणाल पांड्या कोरोनाबाधित झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामध्ये या दोघांचा समावेश होता. परंतु, स्पर्धेच्या आयोजकांनी सर्व खेळाडूंना आयसोलेट केले होते. त्यांना 72 तासापर्यंत कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. कृणाललाही एका वेगळ्या हॉटेलमध्ये अलग केले होते.

बातम्या आणखी आहेत...