आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संघाने अलीकडेच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. निर्णायक सामन्यात 126 धावांची नाबाद शतकी खेळी करणाऱ्या टीम इंडियाच्या या विजयात शुभमन गिलचे महत्त्वाचे योगदान होते. सामन्यानंतर शुभमन गिलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ईशान हा शुभमनवर रागावताना दिसत असून त्याने गिलच्या कानशिलात लगावल्याचे दिसून येत आहे.
या व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहलदेखील दिसत आहे. जो शांतपणे संपूर्ण घटना मागे बसून पाहत आहे. आता या संपूर्ण प्रकरणाविषयी बोलायचे झाले तर, शुभमन गिलने स्वतः हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर टाकला आणि त्याच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट झाले आहे की हे संपूर्ण प्रकरण काय होते.
तर झाले असे की, तिघांनीही गंमत म्हणून हा मजेदार व्हिडिओ बनवला. भारताचे हे तीन क्रिकेटपटू हे रोडीज रिअॅलिटी शोचा सीन रिक्रिएट करत होते. या व्हिडिओमध्ये चहल आणि ईशान हे शोमधील जजच्या भूमिकेत आहेत. तर शुभमन गिल एका स्पर्धकाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, जज ईशान हा स्पर्धक गिलवर चिडतो. याच गोंधळात तो आधी गिलला स्वतःला थप्पड मारायला सांगतो. यातच तो स्वतः गिलला एक जोरदार थप्पड लगावतो. या व्हिडीओच्या गांभीर्याबद्दल बोलायचे झाले तर हा तिन्ही क्रिकेटपटूंचा एक विनोद होता. या तिघांनी ते दृश्य पुन्हा तयार करून एक मजेदार व्हिडिओ बनवला होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कसोटी मालिकेत गिलचे लक्ष
भारतीय संघ आता 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात करणार आहे. उत्कृष्ट लयीत धावणाऱ्या शुभमन गिलवर सर्वांच्या विशेष नजरा असतील. त्याचबरोबर इशान किशनलाही पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. रोहित आणि राहुलच्या उपस्थितीत शुभमन गिल कोणत्या स्थानावर खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे, केएस भरतविरुद्धच्या नागपूर कसोटीत इशान किशनला संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ईशान आणि शुभमन ही जोडी भारतीय कॅम्पमध्ये एकत्र दिसणार आहे.
कॅप्टनचा सल्ला गिलसाठी उपयोगी ठरला
अहमदाबादेत न्यूझीलंड आणि भारतादरम्यान खेळल्या गेलेल्या टी-20 सीरिजच्या शेवटच्या सामन्यात युवा ओपनर शुभमन गिलने नाबाद 126 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 168 धावांनी पराभूत केले आणि सोबतच 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. गिलला शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. सामन्यानंतर गिलने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की या खेळीसाठी त्याने वेगळे काही केले नाही, केवळ आपला नैसर्गिक खेळच तो खेळला. बीसीसीआयने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर विराट कोहलीने गिलचे इन्स्टाग्रामवर अभिनंदन केले आहे. कोलहीने गिलला भविष्यातील तारा म्हटले आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.