आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी 2022 च्या टी-20 विश्वचषकात कुलदीप यादव युझवेंद्र चहलपेक्षा धोकादायक ठरेल असे सांगितले. त्यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ICC टी-20 विश्वचषक 2022 सुरू होण्यास अवघे काही महिने उरले आहेत. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांनाही ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळेल, असे टीम इंडियाकडून मानले जात आहे.
संजय मांजरेकर यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या पाहता या दोनपैकी कोणता गोलंदाज जास्त मारक ठरू शकतो, तर चहलपेक्षा कुलदीप हा वरचढ ठरेल असं वक्तव्य केलं आहे. हा अंदाज थोडा धक्कादायक असला तरी ते कुलदीपची आताची खेळी पाहून तो निश्चितच टी-20 वर्ल्डकप मध्ये सरस कामगिरी करेल असा विश्वास मांजरेकर यांंना आहे.
कुलदीप यादवची IPL मध्ये शानदार गोलंदाजी
2019 च्या विश्वचषकापासून कुलदीप संघात आणि संघाबाहेर होत आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत त्याची संघात निवडही होत नव्हती, पण रोहित शर्मा कर्णधार आणि राहुल द्रविडचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर निवडकर्त्यांनी कुलदीपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या IPL मध्येही कुलदीपने शानदार गोलंदाजी केल्याचे पाहिले आहे
चहलची कसोटी लागणार
एका क्रीडावाहिनीवर बोलताना मांजरेकर म्हणाले, 'ऑस्ट्रेलियन परिस्थितीत चहलची खरी कसोटी असेल. चहलला ज्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करायला आवडते, तिथल्या खेळपट्ट्या सारख्या नसतील. त्यामुळे मला कुलदीप यादवने संघाचा भाग असावा असे वाटते. विकेटमध्ये उसळी असेल आणि अशा परिस्थितीत कुलदीप यादवसारखे गोलंदाज प्रभावी ठरू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.