आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा वनडे 3 गड्यांनी जिंकला:झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्या गृह मैदानावर पराभूत केले

टाउन्सविलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३ विकेट्सनी पराभूत केले. हा झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियातील या संघाविरुद्धचा पहिलाच विजय आहे. यापूर्वी संघाने ३० वर्षांत ऑस्ट्रेलियात १२ एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने गमावले होते. एक एकदिवसीय सामना पावसामुळे खेळला गेला नाही.

झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चकबवा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय खरोखर योग्य ठरला. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ ३१ षटकांत १४१ धावांतच गारद झाला. हा ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या आहे. तसेच गेल्या २० वर्षांतील दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव ७४ वरच आटोपला होता. रेयान बर्लने ३ षटकांत जेमतेम १० धावा देत ५ गडी टिपले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ९४ धावा कुटल्या. त्याचा संघाच्या एकूण धावांमध्ये ६६.६६ टक्के धावा केल्या. उत्तरादाखाल झिम्बाब्वेने ३९ षटकांत ७ गडी गमावून १४२ धावा करत विजय मिळवला. कर्णधार चकबवाने सर्वाधिक ३७* धावांची खेळी केली.

01 गोलंदाज ठरला झिम्बॉब्वेचाचा रेयान बर्ल. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ बळी घेतले. बर्लची (५/१०) ही कामगिरी ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम द्वितीय कामगिरी आहे.

200 वनडे विकेट पूर्ण झाले मिचेल स्टार्कचे. त्याने १०२ सामन्यांत ही कामगिरी केली. तो सर्वाधिक गतीने या स्थानावर पोहोचणारा गोलंदाज ठरला. त्याने सकलेन मुश्ताकचा (१०४ सामने) विक्रम मोडला.

बातम्या आणखी आहेत...