आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पांड्याच्या घड्याळीचे वैशिष्टे:स्विस कंपनी पाटेक फिलिपच्या घड्याळ घालतो पांड्या, एकाची किंमत 5 कोटी; 14 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या आहेत कार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या घड्याळेमुळे चांगलाच चर्चेत आहे. ही चर्चा पांड्याच्या फलंदाजी व गोलंदाजीची नसून त्याच्या घड्याळीची आहे. दुबईहून परतत असताना विमानतळावर पांड्याच्या दोन घड्याळी सीमाशुल्क विभागाकडून जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या या घड्याळींची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

मात्र पांड्याचे म्हणणे आहे की, जप्त करण्यात आलेल्या घड्याळींची किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. सध्या सोशल मीडियावर पांड्या आणि त्याच्या घड्याळीच्या चर्चा जोरदार सुरू असून, हार्दिक पांड्या महागड्या घड्याळ घालतो. हे सिद्ध झाले आहे.

हार्दिक पांड्याने या 13 ऑगस्टला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या एका फोटोत त्याची घड्याळ दिसत आहे. ही घड्याळ पाटेक फिलिप कंपनीची आहे. त्याचे मॉडेल पाटेक फिलिप नॉटिलसल प्लॅटिनम 5711 हे आहे. अगदी साधारण दिसणाऱ्या या घड्याळीची किंमत पाच कोटी रुपये आहे. सोबतच पांड्याकडे याच कंपनीची आणखी एक महागडी घड्याळ आहे. नेमकी पांड्या घालत असलेल्या या घड्याळींची किंमत इतकी महागडी आहे आहे जाणून घेऊया...

पाटेक फिलिप या कंपनीच्या अनेक घड्याळी

पाटेक फिलिप ही एक स्विस कंपनी असून, ती घड्याळ तयार करण्याचे काम करते. आतापर्यंत या कंपनीने 1839 घड्याळीचे प्रकार बाजारात आणले आहे. सोबतच जगभरात याचे सुमारे 400 हून अधिक वितरीत दुकाने आहेत. सध्या पांड्याकडे असलेली पाटेक फिलिपची नॉटिलस ही घड्याळ आहे. विशेष म्हणजे या घड्याळीचे देखील उपप्रकार पाहायला मिळतात. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईवर या घड्याळीचे सुमारे 31 मॉडल उपलब्ध आहेत. हार्दिक पांड्याकडे त्यातील नॉटिलस प्लॅटिनम 5711 ही घड्याळ आहे.

नॉटिलस प्लॅटिनम 5711 ची खास वैशिष्टे

पांड्याकडे असलेल्या नॉटिलस प्लॅटिनम 5711 या घड्याळीला प्लॅटिनम बेल्ट देण्यात आहे. सोबतच 40mm चे डायल आहे. त्यात सफायर-क्रिस्टल देण्यात आले आहे. त्यामुळे ही घड्याळ ऑटोमॅटिक निळी आणि काळ्या रंगाची होते. विशेष म्हणजे तिला 120 मीटर पाण्याखाली देखील वापरता येऊ शकते. कंपनीने घड्याळीची वॉरंटी दोन वर्षांची दिली आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला 5 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.

प्लॅटिनम सर्वात महागडा प्रकार
प्लॅटिनमला पांढरे सोने असे देखील म्हटले जाते. अगदी सोन्याच्या भावाप्रकारे याचे देखील दर प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. दिल्लीत आज 1 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत सुमारे 2574 रुपये इतकी आहे. त्यानुसार 100 ग्रॅमची किंमत 257400 रुपये होते. मात्र जेव्हा प्लॅटिनमची डिझाईन तयार करण्यात येते. तेव्हा त्याचे दर आणखीणच वाढते.

पांड्याच्या गळ्यात भली मोठी साखळी
हार्दिक पांड्याला प्लॅटिनमच्या वस्तू खुप आवडतात. त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवरून कळते की तो प्लॅटिनमचा चाहता आहे. त्याच्या गळ्यात देखील प्लॅटिनमची साखळी आहे. मात्र याची किंमत किती आणि कोणत्या कंपनीची आहे. याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.

पांड्या वापरतो कोटींच्या कारगाड्या
पांड्याला फक्त घड्याळ आणि साखळी घालण्याचीच आवड नाही तर, त्याला कारची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. लॅम्बोर्गिनीपासून रोल्स रॉयस अशा सहा कारगाड्या त्याच्याकडे आहे. या सर्व कारगाड्यांची किंमत 14 कोटी रुपये इतकी आहे.

बातम्या आणखी आहेत...