आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कसोटी संघ जाहीर:कानपूरमध्ये सलामी कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व, दुसऱ्या कसोटीत कर्णधारपदी कोहली

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अय्यर दुसऱ्या नव्या चेंडूवर प्रति आक्रमण करू शकतो, त्यामुळे कसोटी संघात संधी; जयंतचे चार वर्षांनी पुनरागमन
  • रोहित, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली

न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कानपूरमध्ये २४ नोव्हेंबरपासून होणाऱ्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे संघाने नेतृत्व करेल. नियमित कर्णधार विराट कोहली ३ डिसेंबरपासून मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत परतेल. बीसीसीआयने तणाव व्यवस्थापनतर्गंत काही मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिली.

टी-२० संघाचा नवा कर्णधार व सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक ऋषभ पंत व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व मो. शमी कसोटी खेळणार नाहीत. बीसीसीआय सचिव जय शाहने म्हटले की,‘कोहली दुसऱ्या कसोटीत परतेल आणि संघाचे नेतृत्व करेल.’ कोहली १७ नोव्हेंबरपासून होणाऱ्या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेचा सदस्य नाही. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर व ऑफ स्पिनर जयंत यादवचे संघात पुनरागमन झाले आहे.

आक्रमक अय्यरचा समावेश करण्याचे कारण म्हणजे, त्याचा दुसरा नवीन चेंडूवरील प्रति आक्रमण खेळ. यामुळे संघाला खूप मदत होऊ शकते. जसा सलामीवीर मयंक खेळतो. संघाचे तिन्ही सलामीवीर राहुल, मयंक व शुभमन यांनी कारकिर्दीत कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. जर अय्यरला अंतिम-११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर त्याची पहिली कसोटी असेल. दुसरीकडे, जयंत ४ वर्षांनी कसोटी संघात परतला आहे. त्याने अखेरची कसोटी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली.

बातम्या आणखी आहेत...