आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T20 world cup
  • Inside Story Of Jaspreet Bumrah । Yorker King । Dad Died When He Was 5 Years Old, Watching Cricket On Home TV As A Child, Today Became The Most Dangerous Bowler In The World

जसप्रीत बुमराहच्या 'यॉर्कर किंग' होण्याची इनसाइड स्टोरी:5 वर्षाचा असताना वडिलांचा मृत्यू, लहानपणी घरातल्या टीव्हीत क्रिकेट पाहत, आज झाला जगातील सर्वात खतरनाक 'गोलंदाज'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा जगभरातल्या दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहच्या गोलंदाजीसमोर चांगल्या-चांगल्या फलंदाजांना देखील घाम सुटतो. ESPN क्रिकइन्फोवर बुमराहची एक व्हिडीओ स्टोरी शेअर करण्यात आली आहे. या स्टोरीमध्ये बुमराह कशा प्रकारे यॉर्कर किंग झाला हे दाखवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की, बुमराहने कोणत्याही क्रिकेट अकॉडमी किंवा क्रिकेट प्रशिक्षण शाळेमध्ये शिक्षण घेतलेले नाही.

टीव्ही पाहून गोलंदाजी शिकला बुमराह
क्रिकइन्फोवरील स्टोरीमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, बुमराहने टीव्हीत क्रिकेट पाहून गोलंदाजी शिकली आहे. बुमराह नेहमी वसीम अकरम, वकार यूनुस, एलन डोनाल्ड, ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांच्या अनोख्या गोलंदाजीकडे लक्ष देऊन टीव्हीत पाहायचा. आणि तशी प्रॉक्टिस करायचा.

बुमराह पाच वर्षाचा असतांना वडिलांचे निधन
जसप्रीत जेव्हा पाच वर्षाचा होता, तेव्हा त्याचे वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर बुमराह याच्या आईवरच त्यांच्या संभाळण्याची जबाबदारी पडली. लहानपणी संपुर्ण दिवसभर बुमराह गोलंदाजी करायचा. आईची झोप मोडू नये म्हणून, भींतीवर आणि जमीनीवर चेंडू लागू नये म्हणून तो विशेष काळजी घ्यायचा.

त्या लहानशा घरातच त्याने गोलंदाज होण्याचे स्वप्न बघितले होते. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यानंतर बुमराहला मुंबई इंडियंस कडून आमंत्रण मिळाले. काही दिवसांपुर्वी दिलेल्या एका मुलाखतीत बुमराहाने प्रतिक्रिया देत म्हटले होते की, 'आज मी टीम इंडियात खेळत आहे, याचे संपुर्ण श्रेय मी जॉन राइट यांना देणार कारण त्यांच्यामुळेच माझे इथपर्यंत प्रवास झाले' अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली होती. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट हे मुंबई इंडियंसमध्ये होते. तेव्हा त्यांनी बुमराहची मुंबई इंडियंससाठी निवड केली होती.

टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सर्वात चांगला गोलंदाज
जसप्रीत बुमराहने टी-20 मध्ये टीम इंडियात कमालीची भुमिका निभावली होती. आपल्या अनोख्या गोलंदाजीमुळे बुमराहने अख्खा विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्ल्डकपमध्ये बुमराहच्या गोलंदाजीचा नक्कीच भारताला फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...