आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन युगाचा अंत:सचिनने आजच्याच दिवशी संपवली होती आपल्या 24 वर्षांची कारकीर्द, अंतिम सामना खेळल्यानंतर झाला होता भावूक

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सचिनने आपल्या 24 वर्षांची कारकीर्द आज संपवली होती. वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

हा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला गेला होता. सचिनने या सामन्यात 74 धावा काढल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि 126 धावांनी जिंकला. या मालिकेतून रोहित शर्माने कसोटी पदार्पण केले होते.

सचिन झाला होता भावूक
सामना संपल्यानंतर सचिन मोठ्या प्रमाणात भावूक झाला होता. भाषण करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. तो म्हणाला होता की, 22 ते 24 वर्षांचे माझे आयुष्य, एवढा सुंदर प्रवास आता संपला यावर मला विश्वासच बसत नाही. माझा शेवटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की काळ खूप लवकर बदलतो, पण तुम्ही सोडलेल्या आठवणी कायम माझ्यासोबत राहतील. असे म्हणत सचिन आभार मानले होते.

तेंडुलकरच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 धावा

सचिनने 200 कसोटीत 15,921 धावा आणि 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर कसोटीत 51 आणि वनडेत 49 शतके आहेत. त्याने एक टी-20 खेळला, ज्यामध्ये त्याने 10 धावा केल्या होत्या.

1990 मध्ये पहिले कसोटी शतक झळकावले
सचिनने 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण कसोटी सामना खेळला. त्यानंतर ऑगस्ट 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने पहिल्या डावात 519 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 432 धावाच करू शकला.

यानंतर इंग्लंडने 320 धावा करताना 408 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर लक्षाचा पाठलाग करत भारताने 183 धावांवर 6 विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सचिनने नाबाद 119 धावा केल्या. यासह अखेरच्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात 6 विकेट्सवर 343 धावा करत सामना अनिर्णित ठेवला होता. मनोज प्रभाकरनेही सचिनसोबत नाबाद 67 धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...