आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी अ‍ॅनालिसिस:कोचचा टी-20 ‘ओल्ड मॅन गेम’चा दावा; ऑस्ट्रेलिया संघाने विजयातून केला सिद्ध, न्यूझीलंडविरुद्ध उद्या खेळणार फायनल

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अजिंक्य पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय संघाची निर्भीड आक्रमकता दर्शवतो. या फॉर्म्युल्यासह संघ टी-२० विश्वचषकाचे पहिले जेतेपद जिंकू शकते, ते आणखी पुढेही जाऊ शकते.

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने करा किंवा मराची रणनीती अवलंबली. कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यकच आहे, हे त्यांनी ठरवले होते. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातही संघ याच रणनीतीचा अवलंब करेल.

मॅथ्यू वेडने गुरुवारी दुबईत पाकिस्तानविरुद्ध विजयी खेळी केली. त्याने आफ्रिदीच्या ३ चेंडूंवर स्वाइप आणि स्कूप शॉट्स खेळत सलग ३ षटकार ठोकले. त्याने १७ चेंडूंत नाबाद ४१ आणि त्याचा जोडीदार मार्कस स्टोइनिसने ३१ चेंडूत नाबाद ४० धावा करत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकवला.

या विजयाचे श्रेय त्याच्या त्या निर्णयाला जाते, ज्यात त्यांनी संघ निवडीत अनुभवी खेळाडू घेण्याचा सल्ला दिला होता. २८ वर्षीय पॅट कमिन्स त्याच्या संघातील सर्वात तरुण खेळाडू आहे. प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी नेहमीच असा दावा केला आहे की, टी-२० हा “वृद्ध माणसाचा खेळ’ आहे, कारण महत्त्वाच्या क्षणी स्पष्ट विचार आवश्यक असतो.

३३ वर्षीय वेड आणि ३२ वर्षीय स्टोइनिस यांनी गोष्ट अगदी योग्य असल्याचे सिद्ध केले. जेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९६/५ होती आणि संघाला सुमारे १३ च्या सरासरीने धावा करायच्या होत्या, तेव्हा दोघांनीही आपल्या अनुभवाचा उपयोग करून संघाला यश मिळवून दिले. पुढचा टी-२० विश्वचषक अवघ्या एका वर्षानंतर ऑस्ट्रेलियात होणार आहे. यावेळी फायनलमध्ये जिंकले किंवा हरले, तरी त्यांना पुन्हा एकदा लयीत येण्याची संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...