आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कॉटलंडच्या फलंदाजाला पाहून आली धोनीची आठवण:बुमराहच्या चेंडूवर जॉर्ज मुन्सेने मारला हेलिकॉप्टर शॉट, गोलंदाज बघतच राहिला

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया आणि स्कॉटलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या 37व्या सामन्यात स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुन्सेने टीम इंडियाचा खतरनाक गोलंदाज जसप्रीत बुमराहला एक शानदार हेलिकॉप्टर शॉट मारला. मुन्सेसाठी हा षटकार संस्मरणीय ठरला. त्याने हा फटका मारला तेव्हा गोलंदाज तसेच सर्व खेळाडू केवळ चेंडूकडे पाहत होते. मुन्सेचा हा शॉट पाहून सर्वांना धोनीची आठवण झाली. धोनी जेव्हा भारतीय संघाकडून खेळायचा तेव्हा असे लांब हेलिकॉप्टर शॉट मारायचा. मुन्सेचा हा षटकार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना स्कॉटलंडची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने काइल कोएत्झरला (१) क्लीन बोल्ड करून टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पण जॉर्ज मुन्से (24) एका बाजूला मोठे फटके मारत होता. पण त्याची खेळी फार काळ टिकली नाही आणि मोहम्मद शमीने त्याला ३१व्या षटकात बाद केले.

काय घडलं मॅचमध्ये?
या सामन्यात धमाकेदार खेळ दाखवत भारतीय संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना SCO संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १७.४ षटकांच्या खेळात ८५ धावांवर सर्वबाद झाला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने ३-३ विकेट्स घेतल्या. भारताने 86 धावांचे लक्ष्य 6.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...