आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप 2021:सलग चार चेंडूंत चार विकेट घेणारा कॅफर तिसरा; आयर्लंड टीमचा विजय

अबुधाबी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर कर्टिस कॅफरच्या (४/२६) धारदार गाेलंदाजीच्या बळावर आयर्लंड संघाने धडाकेबाज विजय साजरा करताना आयसीसीच्या टी-२० विश्वचषकातील सुपर-१२ मधील स्थान निश्चित करण्याचे संकेत दिले. आयर्लंड संघाने साेमवारी हाॅलंडवर १५.१ षटकांत सात गड्यांंनी मात केली.

यासह आयर्लंड टीमने विश्वचषकाच्या इतिहासात एकूण चाैथ्या आणि २०१४ नंतर पहिल्या विजयाची नाेंद केली. प्रथम फलंदाजी करताना हाॅलंड संघाने २० षटकांत १०६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात आयर्लंड संघाने तीन गड्यांच्या माेबदल्यात २९ चेंडू राखून विजयाचे आवाक्यातले लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सलामीवीर पाॅल स्टर्लिंग (३०) व ग्रेथ डेलानीचे (४४) माेलाचे याेगदान राहिले. त्यामुळे आयर्लंडने झटपट विजय साकारला.

कॅफरची धारदार गाेलंदाजी : आयर्लंड टीमकडून कॅफरने सामन्यात धारदार गाेलंदाजी केली. त्याने दहाव्या षटकांत सलग चार चेंडूंत चार बळी घेतले. यासह त्याने विक्रमाचा पल्ला गाठला. ही कामगिरी करणारा कॅफर हा जगातील तिसरा गाेलंदाज ठरला.

यापूर्वी अशी कामगिरी श्रीलंकन गाेलंदाज लसिथ मलिंगाने वनडे व टी-२० सामन्यात केली. अफगाणिस्तान संघाच्या राशिद खानने टी-२० फाॅरमॅटमध्ये ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...