आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट विश्वातील सर्वात रोमांचक लढत:भारत-पाक लढतीच्या तिकिटांचे वेटिंग 30 मिनिटांत 13 हजारांवर, दुबईचे सर्व हॉटेल्स-रेस्तराँ फुल्ल

दुबई / शानीर एन. सिद्दिकी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट संघांत संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) टी-२० वर्ल्डकपचा सामना होत आहे. यामुळे सगळीकडे याच सामन्याची चर्चा रंगली आहे. यूएईत भारत-पाकिस्तानच्या लोकांची मोठी संख्या आहे. यामुळे येथे या सामन्याचा रोमांच काही वेगळाच आहे. सामान्य मजूर ते कोट्यधीश सर्व स्तरांतील लोक आपापल्या संघांशी भावनात्मक रूपाने जुळलेले आहेत. या सामन्याचे सर्व टूर पॅकेजेस हातोहात विकले जात आहेत. इतकेच नव्हे तर सामन्यासाठी अमेरिका व कॅनाडापर्यंतच्या लोकांनी पॅकेज खरेदी केले आहेत.

दुबईची प्रख्यात ट्रॅव्हल कंपनी दादाभाईचे सुपरवायझर एलिडस म्हणाले की, आम्ही सामन्याच्या तिकिटासोबत एका रात्रीच्या मुक्कामाची सुविधा असलेली ५०० पॅकेजेस जारी केले होते. ते हातोहात बुक झाले. एका पॅकेजचे शुल्क ४०,७०० रुपये (२००० दिरहम) होते. दुसरीकडे, दुबईत रेस्तराँ आणि बारही लोकाना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत. त्यांच्या मेन्यूवरही क्रिकेटचा रोमांच उतरला आहे. उदा.- जेवणाचा सेंच्युरी पॅक, हाफ सेंच्युरी पॅक, फिक्स्ड ओव्हर मेन्यू तयार केला आहे. रेस्तराँनेही फूड डिलिव्हरीची तयारी केली आहे, जेणेकरून लोकांना घरबसल्या सामना व चविष्ट व्यंजनांचा आनंद घेता येईल. दुसरीकडे, भारत-पाक सामन्याची तिकिटे विक्री सुरू झाल्याच्या काही मिनिटांत संपली. सुरुवातीच्या ३० मिनिटांत वेटिंग ३० हजारांच्या पार केले होते. अनेक प्लेटफॉर्मवर तिकिटे ४ ते ५ पट किमतीत विकली जात आहेत. तिकिटे संपल्याने सामना लाइव्ह पाहणे कर्मचाऱ्यांसाठी अशक्य आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मि. क्रिकेट यूएई नावाने प्रख्यात डेन्यूब ग्रुपचे उपाध्यक्ष अनीस साजन यांनी लकी ड्राॅच्या माध्यमातून १०० कामगारांना सामन्याची तिकिटे दिली आहेत.

दुबई एक्स्पोनंतर लगेच सामने, हॉटेल्सची मागणी उच्च स्तरावर
दुबईच्या कानू ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक अफजल आजम म्हणाले, वर्ल्डकपदरम्यान भारतातून तिकीट बुकिंग व हॉटेल बुकिंगमध्ये अचानक उसळी आली आहे. एक्स्पोमुळे आधीच हॉटेल्समध्ये जागा नव्हत्या. आता वर्ल्डकपमुळे हाॅटेल्समध्ये जागेचा तुटवडा आहे. सेमीफायनल व फायनल येईपर्यंत या मागणीत आणखी वाढ होण्याची आशा आहे.

१० सेकंदांच्या जाहिरातींसाठी २५ ते ३० लाख रु.चे शुल्क
टी-२० वर्ल्डकपचा थेट प्रक्षेपण पार्टनर २४ ऑक्टोबरच्या सामन्याचे उरलेले १०-१० सेकंदांचे स्लॉट २५ ते ३० लाख रुपयांत विकत आहेत. हे भारतीय टीव्हीवर क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रसारित जाहिरातींचे सर्वाधिक शुल्क आहे. याआधी या स्लॉटचे दर ९.५ लाख रुपये होते. टी-२० वर्ल्डकप आयपीएलनंतर लगेच सुरू झाला असला तरी जाहिरातदार स्लॉट बुक करण्यात मागे नाहीत. स्टारने स्टार स्पोर्ट्‌ससाठी ९०० कोटी रुपये आणि डिस्ने+हॉटस्टारसाठी २७५ कोटी रुपयांत करार केला आहे.

बातम्या आणखी आहेत...