आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाचा रात्रभर जल्लोष:T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमने रात्रभर केली पार्टी; शूजमध्ये बिअर टाकून पिल्याचा व्हिडिओ व्हायरल

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया संघान बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून विजेतेपद पटकावले. चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला ट्रॉफीसह सुमारे 12 कोटी आणि उपविजेत्या न्यूझीलंडला बक्षीस म्हणून सुमारे 6 कोटी रुपये मिळाले. विजेतेपद मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंचा आनंद गगणात मावेनासा झाला. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस यांनी चक्क आनंदाच्या भरात बूटामध्ये बियर टाकत आणि डॉन्स करत आनंद साजरा केला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी असलेल्या न्यूझीलंडचे आठ गडी बाद करत T20 विश्वचषक 2021 आपल्या बाजून केला आहे. या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाला सुमारे 14 वर्ष वाट पाहावी लागली आहे. 2010 च्या टूर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या जवळ असताना, इंग्लंडने कमालीची कामगिरी करत विजय प्राप्त केला होता. ऑस्ट्रेलियाने संघाने पहिल्यांदा वर्ल्डकप आपल्या देशाला दिले आहे. वर्ल्डकप मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियास संघाने रात्रभर ड्रेसिंग रूममध्ये पार्टी केली.

न्यूजीलंडने केल्या 172 धावा
सुरूवातीला न्यूजीलंडने फलंदाजी करत 172/4 धावा केल्या. केन विलियम्सन यांने सर्वाधिक 85 धावा काढल्या. तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुडने 3 गडी बाद केले. डेविड वॉर्नरने 53 तर मिचेल मार्शने 77 धावा केल्या.

सामन्यापूर्वी दुबईमध्ये भूकंप
सामना सुरू होण्यापूर्वी दुबईच्या काही भागात भूकंपाचे झटके लागले होते. त्यामुळे अनेकांनी इमारतीत खाली केल्या होत्या. त्या भूकंपाची तीव्रता 2.3 रिस्टर स्केल इतकी होती. अरब न्युजने दिेलेल्या वृत्तानुसार, दक्षिण इरानमध्ये भूकंपाची तीव्रता 6.2 रिस्टर स्केल इतकी होती. त्यानंतर काही प्रमाणात यूएईमध्ये इटके जाणवले.

बातम्या आणखी आहेत...