आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्ड कप:भारत-पाकिस्तान सामना न होण्यासाठी पाकचे विशेष प्रयत्न, जर टीम इंडियाने पाकिस्तानसोबत सामना खेळला नाही, तर ICC टीम इंडियावर घालू शकते बंदी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून, भारताचा पहिला सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असून, हा सामना 24 ऑक्टोंबर होणार आहे. त्याआधी भारत-पाकिस्तान सामन्याला रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

कारण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी परराज्यातील नागरिकांना लक्ष करून, भरदिवसा त्यांची हत्या करत आहे. भारतीय सेना त्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत आहे. त्यामुळे पाकिस्तानला असे वाटत आहे की, भारत-पाकिस्तान सामना व्हावे.

जर भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर भारताला फायदा होणार की तोटा, जाणून घेऊया

काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जर टीम इंडियाने पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास नकार दिला तर, यात भारताला मोठ्या तोट्याला सहन करावे लागणार आहे. कारण पाकिस्तानला सामना न खेळल्यानंतरही 2 पॉइंट्स मिळू शकतात. त्यामुळे पाकिस्तानचे सेमीफाइनलमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. तर भारतासाठी फायनलपर्यंत जाणे मोठ्या प्रमाणात कठीण होऊ शकते.

भारताने विश्व चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यास दिला होता नकार
भारताने ICC वर्ल्ड टेस्च चॅम्पियनशीप 2021 मध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यास मनाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानने ICC ला कित्येकदा तक्रारी देखील केल्या मात्र BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही सीरीज होऊ दिली नाही.

यावेळीही जर ICC ने भारत-पाकिस्तान सामना रद्द केला तर त्यांना मोठा आर्थिक नुकसान होऊ शकतो. पाकिस्तान सलग ICC ला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात जर भारताने टी-20 न खेळण्याचा निर्णय घेतला तर ICC टीम इंडियावर कारवाई करू शकते. व मोठ्या प्रमाणात दंड देखील आकारू शकते.

भारत-पाकिस्तान जर फाइनलमध्ये पोहोचले तर...

आपण असे समजू की, 24 ऑक्टोंबरला होणारा सामना जर रद्द झाला किंवा टीम इंडियाने खेळण्यास मनाई केली. तर टीम इंडियाला 2 पॉइंट्सपासून मुकावे लागेल. मात्र तरीही जर आपण हा सामना रद्द झाल्यानंतरही दुसरा टीमसोबत चांगल्या प्रकारे खेळून जर फायनलपर्यंत पोहोचलो आणि तेथेही जर भारताचा पाकिस्तान सोबत सामना झाला तर? तेव्हा आपण काय करणार? तेथेही आपण फायनलमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळणार नाही. जर भारताने असे केले तर वर्ल्डकपमध्ये भारताला हार मानून पाकिस्तानला होतांना पाहावे लागेल.

2019 च्या वर्ल्डकप दरम्यान हीच मागणी करण्यात आली होती
2019 च्या वर्ल्डकपमध्ये देखील हीच मागणी करण्यात आली होती. 2019 मध्ये भारत-पाकिस्तान सामना झाला होता. त्यावेळी देखील पाकिस्तानने हा सामना होऊ न देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र सचिन तेंडूलकर यांनी म्हटले होते की, जर आपण हा सामना रद्द केला तर आपल्याला 2 पॉइंट्सपासून मुकावे लागेल. आणि पाकिस्तानला फुकटात 2 पॉइंट्स मिळेल. 2008 च्या मुंबईतील 26/11 हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. या दोन्ही टीमने 2012 साली शेवटचा सामना खेळला होता.

बातम्या आणखी आहेत...