आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवाला टीम इंडिया नाही BCCI जबाबदार:भारतीय खेळाडूंनी वर्षभरात तब्बल 120 IPL मॅच अन् 76 दिवस आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ही आहेत भारतीय संघाच्या पतनाची 7 कारणे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या पदरी आतापर्यंत फक्त पराभवच मिळाले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून भारताला मोठ्या प्रमाणात हार स्वीकारावी लागली. त्यामुळे आता भारतीय संघाला अंतिम सामन्यात जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहे.

या परिस्थितीला जबाबदार कोण खेळाडू की BCCI? टी-20 मध्ये सुरु असलेल्या पराभवानंतर आता जनता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह संपुर्ण क्रिकेट संघालाच ट्रोल करत आहे. मात्र याची जबाबदार BCCI ने घेतली होती.

BCCI ने मागील एका वर्षात टीम इंडियाचे शेड्यूल मोठ्या प्रमाणात व्यस्त ठेवले. त्यामुळे संघातील खेळाडू टी-20 सुरु होण्याअगोदर मोठ्या प्रमाणात थकले होते. त्यांना थकवा आल्याने अशा वेळी त्यांनी आरामाची आवश्यकता होती. टी-20 मध्ये टीम इंडियाचे 7 फॅक्टर आपण समजून घेऊया..

1. 13 महिन्यांमध्ये 2 IPL आणि सलग इंटरनॅशनल क्रिकेट
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मार्चपासून ते ऑक्टोंबरपर्यंत भारतीय क्रिकेट संघाला कोणत्याही प्रकारे क्रिकेट सिरीज खेळता आला नाही. नंतर आयपीएलदेखील रद्द करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सप्टेंबरपासून आतापर्यंत सलग भारतीय क्रिकेट संघाचे सामने सुरु आहे.

टीम इंडिया सप्टेंबर 2020 पासून सलग सामने खेळत आहे. युएईमध्ये 2020 साली आयपीएल पार पाडण्यात आले होते. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यानंतर इंग्लंडचा देखील दौरा केला होता. यानंतर आयपीएल 2021 चा पहिला टप्पा पार पडला मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने ते रद्द करण्यात आले. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशीपचे अंतिम सामने खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडला गेली. तेथे त्यांनी इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट सामने खेळण्यात आले.

त्याचदरम्यान बोर्डाने टीम इंडियाची दुसरी बी टीम तयार करत श्रीलंकेला पाठवले. टीम इंडियाने आयपीएलच्या दोन सीझनच्या तीन फेजमध्ये 120 सामने आणि 76 दिवस इंटरनॅशनल क्रिकेट सामना खेळाला आहे.

2. IPL च्या अंतिम सामन्यापर्यंत 6 खेळाडू
आयपीएल 2021 ची सुरुवात 10 ऑक्टोंबरला झाली होती. टी-20 च्या अवघ्या एक आठवड्याआधी या राऊंडमध्ये भारतीय वर्ल्डकप टीम मधले 6 खेळाडूंनी आयपीएल सामना शेवटपर्यंत खेळला. यात विराट कोहली, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, ऋषभ पंत, वरुण चक्रवर्ती आणि रविचंद्रन अश्विन सामिल होते.

8 ऑक्टोबरला मुंबई इंडियनने अंतिम सामना खेळला. यात रोहित शर्मा सह जसप्रीत बुमराह आणि अन्य भारतीय टीमचे 6 खेळाडू होते. म्हणजेच वर्ल्डकपच्या सुरुवात होण्याआधीच आयपीएलमध्ये भारतीय संघ घामाघूम झाला होता.

3. क्वारंटाईन, हॉटेल ते ग्राउंड
जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघाला वेगवेगळ्या देशात गेल्यानंतर विलगीकरणात राहावे लागले. त्यांना हॉटेल ते क्रिकेट मैदानापर्यंतच जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण ऑस्ट्रेलिया सोडून भारतात परतले होते. त्यामुळे खेळाडू मानसिक आणि शारीरिक स्वरूपात तयार नसून देखील वर्ल्डकपची घोषणा झाल्याने आता भारताला याचे परिणाम भोगावे लागत आहे.

4. 3 आठवड्यांची विश्रांती हवी होती
दिग्गज क्रिकेटर आणि वेस्टइंडीडला दोनदा वर्ल्ड चॅम्पियन ठरवणारा कर्णधार क्लाइव लॉयड यांने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, भारतीय क्रिकेट संघ सलग क्रिकेट खेळत आहे. आयपीएलचा सामना हा शारीरिक आणि मानसिक स्वरूपात खूपच किंचकट आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाला किमान 3 आठवड्यांची विश्रांती हवी होती. मात्र असे न केल्याने टीम इंडिया वर्ल्डकपासाठी तयार झालेली नाही.

5. बुमराह म्हणाला ब्रेक हवाच होता
टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाला दोनदा पराभवाला स्वीकारावे लागल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांने क्रिकेटवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. बुमराह म्हणाला की, खेळाडू सलग क्रिकेट खेळत आहे. त्यांना आराम करण्यासाठी वेग दिला पाहिजे होता. शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे खेळाडू त्रस्त झाले आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही आमच्या घरीदेखील गेलो नाही. कोरोनात प्रत्येक जण आपआपल्या घरी गेले. मात्र आम्ही या कठीण काळात देखील क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात फोकस केले. त्यामुळे काही प्रमाणात तरी आम्हाला ब्रेक हवाच होता.

6. पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला

सध्या जगभरात BCCI, इंग्लंड क्रिकेट बोर्ड ECB आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड CA यांना बिग थ्री म्हटले जाते. यात BCCI वगळता या दोघात मोठ्या प्रमाणात एकमत पाहायला मिळाले. भारताप्रमाणे या दोन्ही देशातील संघाने क्रिकेटचे अनेक सामने खेळले होते.

मात्र शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी त्यांनी काही सामने रद्द करत. खेळाडूंना सुट्टया दिल्या होत्या. इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा खेळाडूंसाठी रद्द केला होता. ऑस्ट्रेलियाने देखील साऊथ आफ्रिकासोबतचे सामने रद्द करत अनेक सामने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल 2021 नंतर ऑस्ट्रेलियाने कोणतेही सामने खेळलेले नाही.

7. प्लानिंगमध्ये मोठी चूक
टी-20 वर्ल्डकप यावर्षी पार पडणार हे सर्वांना माहिती होते. असे असतांना भारतीय क्रिकेट बोर्डाने टी-20 वर फोकस न करता आयपीएलवर मोठ्या प्रमाणात फोकस केले. एप्रिल 2021 पासून साऊथ आफ्रिकाने 15, पाकिस्तान आणि वेस्टइंडीज 14-14, ऑस्ट्रेलिया 10, श्रीलंका 9, इंग्लंडने 6 टी-20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. BCCI ला अशी आशा होती की, IPL झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये चांगले प्रदर्शन करेल. मात्र असे झाले नाही. भारतीय क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...