आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वविजेता स्पर्धेबाहेर:न्यूझीलंड पहिल्यांदाच फायनलमध्ये; माजी विश्वविजेता इंग्लंड स्पर्धेबाहेर, न्यूझीलंड रविवारी खेळणार टी-20 वर्ल्डकप फायनल

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर डेरिल मिशेलने (७२) आपल्या झंझावाती नाबाद अर्धशतकी खेळीतून न्यूझीलंड संघाला आयसीसीच्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऐतिहासिक प्रवेश मिळवून दिला. विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने बुधवारी पहिल्या उपांत्य सामन्यात २०१० च्या विश्वविजेत्या व गत उपविजेत्या इंग्लंड टीमचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. न्यूझीलंड संघाने १९ षटकांत पाच गडी व सहा चेंडू राखून विजय संपादन केला. तसेच न्यूझीलंडने वनडे विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवाची इंग्लंड संघाला परतफेड केली.

गत उपविजेत्या इंग्लंड टीमने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड टीमने पाच गड्यांच्या माेबदल्यात झटपट विजय साकारला. संघाच्या विजयात काॅन्वेने ४६, जेम्स निशामने २७ धावांचे माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे न्यूझीलंड टीमला फायनल गाठण्याची स्वप्नपूर्ती करता आली. आता न्यूझीलंड टीम करिअरमध्ये पहिल्यांदा आयसीसी टी-२० फाॅरमॅटमध्ये विश्वविजेता हाेण्याच्या इराद्याने रविवारी फायनल खेळणार आहे. न्यूझीलंड टीमसमाेर यादरम्यान आज गुरुवारी हाेणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेता संघ असेल.

बातम्या आणखी आहेत...