आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक 2021:नवा विश्वविजेता मिळणार, ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांनी पाकिस्तानला हरवले

दुबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट जगताला नवा टी-२० विश्वविजेता मिळेल. ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ ठरला. आता रविवारी त्यांचा सामना न्यूझीलंडशी होईल. दोन्ही संघ अद्याप टी-२० विश्व चॅम्पियन बनले नाहीत. ऑस्ट्रेलिया २०१० चा उपविजेता व न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत खेळेल. दुबईत झालेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानला ५ गड्यांनी हरवले. स्पर्धेत आतापर्यंत अजेय राहिलेल्या पाकिस्तानने ४ बाद १७६ धावा उभारल्या. फलंदाज मो. रिझवानने ६७ आणि फखर जमानने नाबाद ५५ धावांची खेळी केली.

बुधवारी रिझवानची रात्री तब्येत खराब झाली होती. त्याला रुग्णालयात घेऊन जावे लागले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत विजय मिळवला. हा सामना बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्या लढतीप्रमाणे झाला. त्या सामन्यात अखेरच्या २ षटकांत २० धावांची गरज होती. या सामन्यातही तशी कामगिरी झाली. आॅस्ट्रेलियाला अखेरच्या २ षटकांत २२ धावा हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात लक्ष्य गाठले. मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीला अखेरच्या ३ चेंडूंवर ३ षटकार खेचले.

बातम्या आणखी आहेत...