आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ॲनालिसिस:विजेत्या संघाच्या यशाचे अचूक समीकरण; पॅावर हिटर गोलंदाज, गेमचेंजर खेळाडूंची भूमिका महत्त्वपूर्ण!

मुंबई / चंद्रेश नारायणन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा टी-२० मध्ये विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला. फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने फायनलमध्ये रविवारी न्यूझीलंडवर आठ गड्यांनी मात केली. यातूनच पाॅवर हिटर आणि शानदार गाेलंदाज, स्पेशलिस्ट खेळाडूंच्या सहभागातून संघाला विश्वविजेतेपदाचा बहुमान सहज मिळू शकताे, हे आता सिद्ध झाले. तसेच हीच या विश्वचषकातून शिकवण मिळाली. आता याच समीकरणाच्या आधारे पुढील वर्षी हाेणाऱ्या विश्वचषकासाठीचे डावपेच आखता येतील.

गती गरजेची : वेगवान गाेलंदाजांमुळे धावसंंख्येला ब्रेक
वेगवान गाेलंदाजांच्या चेंडूंतील गती महत्त्वपूर्ण असते. याच बळावर यशाचा पल्ला गाठत मैदानावर दबदबा निर्माण करता येऊ शकताे, याचाच प्रत्यय आता १९ वर्षीय युवा वेगवान गाेलंदाज शाहीन आफ्रिदीसह नाेर्टेजे, पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कने आणून दिला. डावाच्या सुरुवातीला व शेवटी या गाेलंदाजांची भूमिका लक्षवेधी ठरते. हे गाेलंदाज भेदक माऱ्यातून धावसंख्येला ब्रेक लावतात. याशिवाय हेच गाेलंदाज निर्धाव षटके टाकण्यातही तरबेज असतात.

फिरकीची जादू : सहा गाेलंदाज ठरले संघात सरस
फिरकीची जादुही मैदानावर तेवढीच लक्षवेधी आणि याेगदान देणारी ठरते, याचे चित्र विश्वचषकादरम्यान स्पष्ट झाले. यामध्ये हंसरंगा, राशिद खान, अॅडम झम्पा, शादाब खान, ईश साेढी आघाडीवर हाेते. श्रीलंकेच्या युवा गाेलंदाज हंसरंगाची कामगिरी सर्वात लक्षवेधी ठरली. त्याने स्पर्धेत १६ बळी घेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थान गाठले. अॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया), शाकिब (बांगलादेश), आदिल (इंग्लंड), शादाब (पाक), राशिद (अफगाणिस्तान) हे आपापल्या संघात सरस ठरले.

गाेलंदाज: टॉप-१० मध्ये सहा गाेलंदाज सेमीफायनलिस्ट संघांचे
आक्रमकासह सर्वगुणसंपन्न गाेलंदाज हे विजेतेपदात माेलाचे याेगदान देऊ शकतात, हे आता या विश्वचषकातून समाेर आले. सर्वाधिक बळी घेणाऱ्या टाॅप-१० मधील सहा गाेलंदाज हे उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांतील आहेत. सर्वाेत्तम गाेलंदाजीत अॅडम झम्पाला आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. या आॅस्ट्रेलियन गाेलंदाजाने स्पर्धेत सर्वाेत्तम खेळी करताना १९ धावा देत पाच बळी घेण्याचा पराक्रम गाजवला आहे.

बिग हिटिंग: पाकचे दाेन खेळाडू सरस; ३००+ स्ट्राइक रेट
बिग हिटर्सची भूमिका ही टी-२० फाॅरमॅटमध्ये सातत्याने महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. याचाच प्रत्यय आता पाकच्या दाेन खेळाडूंनी आणून दिला. शाेएब मलिक आणि आसिफ अलीने पाॅवरप्लेत सर्वाेत्तम खेळी केली. त्यांचा ३००+ स्ट्राइक रेट नाेंद झाला. आसिफने तीन चेंडूंत तीन षटकार खेचत अफगाणविरुद्ध आक्रमक खेळीचा प्रत्यय आणून दिला. त्याच्या नावे सर्वाेत्तम ३५७.१४ स्ट्राइक रेट नाेंद झाला. दरम्यान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंडचेही फलंदाज चमकले.

नेतृत्व : फिंचचा विश्वास वाॅर्नरने (२८९) लावला सार्थकी
टी-२० या झटपट फाॅरमॅटमध्ये कर्णधाराच्या समयसूचकतेलाही महत्त्वाचे स्थान आहे. तात्काळ आणि सकारात्मक असा निर्णय घेण्यात अनेक कर्णधारांची कसाेटी लागते. कुशल नेतृत्वातून फिंचने आपल्या डेव्हिड वाॅर्नरवर विश्वास दर्शवला. हाच विश्वास सार्थकी लावत वाॅर्नरने विजयात याेगदान दिले. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला पाच टी-२० मालिकेत पराभवाचा सामना केला. तरीही फिंचने खेळाडूंमधील क्षमतेवर अधिक विश्वास ठेवला.

तरबेज खेळाडू : चॅम्पियन व उपविजेत्या संघाला गाठून दिली फायनल
स्पेशलिस्ट वा गेमचेंजर खेळाडुंमध्ये सामन्याला कलाटणी देणारी प्रचंड क्षमता असते, हे आता टी-२० विश्वचषकादरम्यान समाेर आले. याच गेमचेंजर संघांनी उल्लेखनीय कामगिरीतन विजेत्या आणि उपविजेत्या संघाला फायनलचा पल्ला गाठून दिला. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोइनिस आणि मॅथ्यू वेड तसेच उपविजेत्या न्यूझीलंड टीमच्या डेरिल मिचेल व जिमी नीशामने हीच महत्वपूर्ण भुमिका बजावत सामन्याला कलाटणी दिली.

बातम्या आणखी आहेत...