आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्ड कप 2021:अफगाणविरुद्ध रेकॉर्डमध्ये सरस टीम इंडियाचा फॉर्म चिंताजनक, भारतीय संघाची नजर पहिल्या विजयावर

मुंबई / चंद्रेश नारायणनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडिया सलगच्या पराभवाची आपली मालिका खंडित करण्याच्या इराद्याने आज मैदानावर उतरणार आहे. रेकाॅर्डमध्ये भारतीय संघाची कामगिरी सरस आहे. मात्र, फाॅर्मच्या बाबतीत टीम इंडियाची खेळी चिंताजनक आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आज बुधवारी सामना रंगणार आहे. अबुधाबीच्या मैदानावर संध्याकाळच्या सामन्यात हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. भारतीय संघाला विश्वचषकाच्या सुरुवातीच्या दाेन सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. अफगाणविरुद्ध विजयाचे भारताचे रेकाॅर्ड चांगले आहे. मात्र, अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामन्यात विजयासाठी टीम इंडियाला माेठी कसरत करावी लागेल. गत सामन्यात अफगाणिस्तान संघानेही उल्लेखनीय कामगिरीतून पाकिस्तानला चांगलेच झंुजवले हाेते.

अफगाणिस्तान संघाचे बलस्थान असलेले राशिद, मुजीब व नबी फाॅर्मात आहे. याशिवाय अनुभवी वेगवान गाेलंदाज हादिम हसनही दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. युवा गाेलंदाज नवीनची सध्याची कामगिरी काैतुकास्पद ठरत आहे. आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवण्याचा त्याचा मानस आहे.

सलामीला मिळणार काेहलीला संधी : सलगच्या दाेन पराभवांमुळे आता संघाच्या फलंदाजीत क्रमवारीत बदल हाेण्याचे चित्र आहे. यातूनच राेहितसाेबत आता सलामीला काेहलीला संधी मिळू शकेल. यातून टीमचा माेठी धावसंख्या उभारण्याचे डावपेच यशस्वी हाेऊ शकतील.

न्यूझीलंडला विजयाची संधी; स्काॅटलंडविरुद्ध सामना : भारतीय संघावर मात करून न्यूझीलंड टीमने गत सामन्यातून स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. आता माेठ्या फरकाने सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड टीम सज्ज झाली आहे. न्यूझीलंड आणि स्काॅटलंड यांच्यात आज सामना रंगणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...