आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्ड कप आजपासून:24 तारखेला मौका मौका! भारत Vs पाकिस्तान, यांच्यातील सर्व 5 सामने भारतानेच जिंकले आहेत

मस्कत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० वर्ल्ड कप रविवारपासून सुरू होत असून स्पर्धेचा यजमान भारत असला तरी सामने मात्र ओमान व यूएईत हाेतील. रविवारी पहिली लढत ओमान वि. पापुआ न्यू गिनीत होईल. भारत २४ ऑक्टोबरला पाकविरुद्ध दुबईत खेळेल. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक यांच्यातील सर्व ५ सामने भारतानेच जिंकले आहेत. २००७ मध्ये पाकला हरवून टीम इंडियाने पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.

या ५ खेळाडूंवर जगाचे लक्ष
डेव्हिड मलान
: टी-२० मध्ये क्रमांक-१ चा फलंदाज. हा पहिला विश्वकप. टी-२० च्या ३० डावांत १२ वेळा ५०+ धावा केल्या. कधीही खाते न उघडता बाद नाही.

बाबर आझम: पाक कर्णधार बाबरने टी-२० मध्ये सर्वात कमी ५२ डावांत २००० धावा चोपल्या. यूएईमध्ये ११ सामने खेळले आहेत व सर्वात पाकला विजय मिळाला.

तबरेज शम्सी: टी-२० मध्ये जगात नंबर-१ गोलंदाज. ४२ टी-२० मध्ये केवळ ६.७९ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. जगभरात १६७ टी-२० सामने खेळण्याचा अनुभव.

जसप्रीत बुमराह : टी-२० च्या टॉप गोलंदाजांत समाविष्ट बुमराहच्या यॉर्करला कोणत्याही फलंदाजाकडे उत्तर नसते. ही त्याची दुसरी टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे.

डेवोन कॉन्व्हे : द.आफ्रिकेत जन्मलेला ३० वर्षीय कॉन्व्हे न्यूझीलंडसाठी खेळतो. ११ टी-२० डावांत ५९ च्या सरासरीने ४७३ धावा कुटल्या. तो मोठा धोका ठरेल.

बातम्या आणखी आहेत...