आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्डकप 2021:विश्वविजेता आज ठरणार; पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्यासाठी रंगणार चुरस; ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा फायनल खेळणार

मुंबई / चंद्रेश नारायणन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ पहिल्यांदा आयसीसीच्या टी-२० फाॅरमॅटमध्ये विश्वविजेत्याचा बहुमान आपल्या नावे करण्यासाठी आज रविवारी मैदानावर उतरणार आहे. दुबईच्या मैदानावर आयसीसीच्या विश्वचषकाची फायनल रंगणार आहे. दर्जेदार क्रिकेट खेळून अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहे. मात्र, न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला आणि न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. विल्यम्सनचा संघ २०१५ मधील एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेऊ इच्छितो. दोन्ही संघ या प्रकाराच्या क्रिकेटमधील विश्वचषकात केवळ दुसऱ्यांदा भिडतील. प्रथमच न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. दोन्ही संघांत ८ महिन्यांपूर्वी टी-२० खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौरा केला होता.

४४ सामन्यांत २८ वेळा पाठलाग करणारा विजेता
या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल. कारण सध्याच्या विश्वचषकात आतापर्यंत ४४ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी २८ सामने पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

विश्वविजेत्यांसह न्यूझीलंड हाेईल नंबर वन टी-२० संघ
विलिम्यसन अँड कंपनी सध्या जगाच्या क्रिकेटवर राज्य करत आहे. तो कसोटीत जगज्जेता आहे आणि क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीतही संघ अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड रविवारी टी-२० चा वर्ल्ड चॅम्पियन बनला तर या लहान प्रकारातही तो नंबर-१ वर पोहोचेल. असे झाल्यास न्यूझीलंड हा तिन्ही प्रकारात अव्वल स्थान गाठणारा पहिला संघ ठरेल.

दुबळेपण : दाेन्ही संघांची मधली फळी
- ऑस्ट्रेलियाची मधली फळी सर्वात कमजोर आहे. उपांत्य सामन्यात पाकविरुद्ध हे जगजाहीर झाले. मधल्या फळीने दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध संघर्ष केला होता. मार्श, स्टोइनिस व वेडने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे स्मिथवर दबाव असेल.
- कॉन्वे नसल्याने न्यूझीलंडसाठी चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळे मधली फळी मजबूत होती. संघाची मधली फळी पाक, स्कॉटलंड व नामिबियाविरुद्ध अपयशी राहिली. कॉन्वेच्या अनुपस्थितीत संघर्ष करावा लागू शकतो.

अडसर : ऑस्ट्रेलियाला फिरकी ठरेल डाेकेदुखी
- ऑस्ट्रेलियाला सोढी व सँटनर या फिरकी जोडीचा मोठा धोका आहे. ते फलंदाजांना मोकळेपणाने खेळू देत नाहीत. त्यांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मॅथ्यू वेडला बढती द्यावी लागेल, तो आक्रमकपणे फटकेबाजी करून धावा करू शकेल.
- न्यूझीलंडसाठी चिंता हेजलवूड आणि स्टार्क यांची सलामीची गोलंदाजी जोडी असेल. हेजलवूड धावा देण्यात खूप चिकट आहे. स्टार्कच्या यॉर्कर आणि वेगामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात फायदा होतो. झम्पाच्या लेगस्पिनमुळे फलंदाज अडचणीत येतात.

बलस्थान : ऑस्ट्रेलियन गोलंदाजी मजबूत
- ऑस्ट्रेलियाचे बलस्थान हे मजबूत गोलंदाजी आहे. मिचेल स्टार्क, हेजलवूड व मिल लयीत आहेत. मॅक्सवेल विशेष ठरू शकतो. झम्पा स्पर्धेत सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. त्याने उत्कृष्ट ५/१९ प्रदर्शन केले. १२ बळी घेत ताे ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.
- न्यूझीलंडकडे गोलंदाजी व फलंदाजीत पर्याय आहेत. फलंदाजी मजबूत आहे. मिचेलला फलंदाजीत बढती देणे फायद्याचे ठरले. तो १९७ धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

प्लेयर्स टू वॉच- मार्क्स स्टाेइनिस व डेरिल मिचेलवर खास नजर
- न्यूझीलंड : डेरिल मिचेल सलामीवीर नाही, टी-२० चा खेळाडू नाही. स्पर्धेत त्याला उत्सुकतेपोटी बढती देण्यात आली. तो किवी संघाचा सर्वाधिक (१९७) धावा करणारा फलंदाज आहे.
- ऑस्ट्रेलिया : स्टोइनिसने सावधगिरीने सुरुवात केली आहे. तो दबाव घेत नाही, मिळालेली जबाबदारी पूर्ण करतो. त्याची स्पर्धेत ८० ची सरासरी आहे. तो उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीदेखील करतो.

बातम्या आणखी आहेत...