आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक:टीम इंडियाला आज सलग दुसऱ्या विजयाची संधी, भारत-स्कॉटलंड सामना आज रंगणार

मुंबई / चंद्रेश नारायणनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गत सामन्यातील विजयाने फाॅर्मात आलेल्या भारतीय संघाला आज शुक्रवारी आयसीसीच्या टी-२० विश्वचषकामध्ये सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे. भारत आणि स्कॉटलंड यांच्यात आज संध्याकाळी दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून टीम इंडियाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. आता विजयाची हीच लय कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. विराट काेहलीच्या नेतृत्वात आता विजय संपादन करण्यासाठी खेळाडू मेहनत घेण्याचे चित्र आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचे पारडे जड मानले जात आहे. कारण आतापर्यंत स्काॅटलंड टीमला आपल्या गटात विजयाचे खाते उघडता आले नाही. त्यामुुळे स्काॅटलंड टीमवर आता सलग चाैथ्या पराभवाचे सावट आहे.

न्यूझीलंड-नामिबिया सामना रंगणार : विलियम्सनच्या नेतृत्वात आता गटामध्ये तिसरा विजय संपादन करण्यासाठी न्यूझीलंड संघाचे खेळाडू उत्सुक आहेत. न्यूझीलंडचा गटातील चाैथा सामना आज शुक्रवारी नामिबियाशी हाेणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडला विजयाचा दावेदार मानले जात आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघ आता विजय संपादन करत उपांत्य फेरीतील प्रवेशाचा आपला मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...