आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:न्यूझीलंड जगातील सर्वोत्तम संघ - कारण, त्यांनी क्षेत्ररक्षण-गोलंदाजीसह कर्णधाराच्या प्रगतीवर आठ वर्षे काम केले; तिन्ही प्रकारांत संघाची शानदार कामगिरी

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलंडने बुधवारी प्रथमच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत सर्वांना धक्का दिला. आवडत्या प्रतिस्पर्धी इंग्लंडचा सामना करताना डॅरिल मिशेल आणि जिमी निशमच्या वादळी खेळीने संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने न्यूझीलंडची गेली अनेक वर्षे कठोर मेहनत आणि एकजुटीने खेळण्याची भावना सिद्ध केली. या संघाने गेल्या काही वर्षांत अशी कामगिरी केली आहे की, त्याला जगातील सर्वोत्कृष्ट संघ म्हटले जाऊ लागले आहे.

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुपरमॅनशी तुलना
न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण जगातील सर्वोत्तम आहे. संपूर्ण टी-२० विश्वचषकात विल्यम्सन, गुप्टिल, मिशेल, कॉन्वे, फिलिप्सने काही अप्रतिम झेल घेतले. कॉन्वे व मिशेलचे झेल “कॅच ऑफ द टुर्नामेंट’च्या शर्यतीत आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध रशीदने डीप मिडविकेटवर चौकार मारला, परंतु मिशेलने हवेत जबरदस्त झेप घेत चेंडू सीमापार जाण्यापासून रोखला. त्यांच्या सुपरमॅनशी तुलना केली.

तिन्ही प्रकारांत सर्वोत्कृष्ट सलग तिसरी अंतिम फेरी
हा संघ सलग तिसऱ्यांदा आयसीसीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. ब्लॅककॅप्स म्हणून प्रसिद्ध असलेला न्यूझीलंड २०१९ च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरी गाठली होती. २०२१ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा एकतर्फी हरवले. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात विल्यम्सनच्या संघाला प्रथमच टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी असेल.

वादापासून दूर राहणारा किवी संघ
केन विल्यम्सन अँड कंपनी नेहमीच वादांपासून दूर राहते, त्यामुळे हा जगात सर्वांचा आवडता संघ आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत यासारख्या आक्रमक संघांसमोर व त्यांच्या आक्रमक चाहत्यांसमोरही संघ त्रास होईल अशी प्रतिक्रिया देत नाही. ब्लॅक कॅप्स नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन खेळतात. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा हावभाव किंवा पराभवाचा परिणाम दिसत नाही. खेळाडू त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित देतात.

लॉइडच्या बरोबरीत पोहोचला विल्यम्सन
विल्यम्सनने न्यूझीलंडसाठी तिन्ही प्रकारांत सातत्य राखले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तिन्ही प्रकारांच्या प्रमुख स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, तर २०१६ मध्ये जेव्हा संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला तेव्हापासून विल्यम्सन कर्णधार आहे. संघाला सलग ३ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात त्याने क्लाइव्ह लॉइड व सौरव गांगुलीशी बरोबरी केली. त्याच्याकडे एका वर्षात २ प्रकारांत जागतिक विजेता बनण्याची संधी आहे.

उत्कृष्ट गोलंदाजी बळी घेणारे गोलंदाज
एकीकडे विल्यम्सनने फलंदाजीचे नेतृत्व केले, तर टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी गोलंदाजीत आघाडी घेतली. या दोघांनी मिळून सध्या विश्वचषकात १९ बळी घेतले. तसेच निर्धाव चेंडू देखील टाकले. साउदीने ७९ व बोल्टने ७१ चेंडू निर्धाव टाकले. या जोडीला वेगनर, जेम्सन व फर्ग्युसन यांची साथ लाभली. त्यांच्या गोलंदाजी आक्रमणाला धार आहे. तसेच ईश सोढी व मिचेल सेंटरने फिरकीची जबाबदारी संभाळत आहे.

२०१३ पासून संघात बदल सुरू झाला, प्रशिक्षक-कर्णधाराने ‘संघ प्रथम’ वृत्ती आणली
न्यूझीलंड कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान संघ आहे, ज्याचा वार्षिक महसूल अनेक काउंटी क्रिकेट क्लबपेक्षा कमी आहे. २०१३ च्या “रॉक बॉटम’मधून सावरल्यानंतर ब्लॅक कॅप्सने स्वतःला इतके बदलले आहे की, संघाने बिग थ्रींना पराभूत केले. संघातील बदलाची सुरुवात जानेवारी २०१३ मध्ये झाली. तेव्हा संघ द. आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी अत्यंत वाईटरीत्या पराभूत झाला होता.

ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली किवी संघाची पहिली कसोटी होती आणि संघ २० षटकांत ४५ धावांत ढेपाळला. काही मिनिटांनंतर प्रशिक्षक माइक हेसन, सहायक प्रशिक्षक माइक बॉब कार्टर आणि संघ व्यवस्थापक माइक सेंडल कर्णधाराच्या खोलीत आले. इथेच या सर्वांमध्ये चर्चा सुरू होती की, न्यूझीलंड क्रिकेटचे काय झाले आहे आणि आता आपण काय नियोजन करावे? न्यूझीलंड क्रिकेटचा तो अत्यंत वाईट काळ होता. संघात असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण होते. सेंडल आठवण करत म्हणाले की, “आम्ही कुठे चुकलो याबद्दल आम्ही चर्चा केल्यानंतर कारण कळाले की, स्वत:चा गर्व आहे. मग ठरवलं की ‘संघ प्रथम’ ही वृत्ती विकसित करायची आणि खेळाडूंना जबाबदारीची जाणीव करून द्यायची. हेसन म्हणतात, “सर्वात मोठी समस्या संस्कृतीची होती. संघात राहण्यासाठी खेळाडू काहीही करायचे. खेळाडू मेहनती होते, पण आत्मकेंद्रित होते.’ वेगवान गोलंदाज नील वेगनरने म्हटले की, “द.आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर ३ दिवसांत नवीन दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा झाली. काय बदलले संघाला प्राधान्य देण्याचे ठरले.’

बातम्या आणखी आहेत...