आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा:रोहित शर्मा कर्णधार, हर्षल पटेल आणि बुमराहचे पुनरागमन; शमी, श्रेयस, चहर स्टँडबायमध्ये

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

स्टँडबाय: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक हुडा. चहर आणि जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

15 वर्षांपासून विश्वचषक जिंकू शकलो नाही
टीम इंडियाने पहिला वर्ल्ड कप 2007 मध्ये जिंकला होता. त्यावेळी पहिल्यांदाच ही मेगा टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. यानंतर ही मेगा टूर्नामेंट 6 वेळा आयोजित करण्यात आली असून आपण एकदाही चॅम्पियन बनू शकलो नाही.

रवींद्र जडेजा संघातून बाहेर अक्षर पटेलला संधी
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा वर्ल्ड कप टीममधून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. आशिया कपमध्ये त्याला दुखापत झाली होती. जडेजा संघाबाहेर गेल्याने भारतीय संघ रुळावरून घसरला आणि सलग दोन सामने गमावून आशिया चषकातून बाद झाला.

बातम्या आणखी आहेत...