आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामन्यापूर्वीच पाकिस्तानला झटका:सेमीफायनलपूर्वी शोएब मलिक आणि मोहम्मद रिझवानच्या तब्येतीत बिघाड, दोघांनी केली कोरोना टेस्ट

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 वर्ल्डकपचा सेमी फायनल सामना आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात खेळला जाणार आहे. आज जिंकणारा संघ 14 नोव्हेंबरला ऩ्यूझीलंडसोबत अंतिम सामना खेळणार आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तान संघाची चिता वाढलेली पाहायला मिळत आहे.

कारण शोएब मलिक आणि मोहम्मद रिझवान यांची तब्येत अचानक खराब झाली आहे. त्यांनी बुधवारी सराव सामन्यात आपली हजेरी लावली नाही. त्यामुळे जर या दोघांपैकी एक जण जरी प्लेइंग इलेवनमध्ये नसला तर पाकिस्तान संघासमोर मोठे आव्हान आहे.

2010 साली झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये देखील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात सेमीफायनलचा सामना झाला होता. त्यामध्ये पाकिस्तानच्या टीमने चांगले प्रदर्शित केले होते. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या माइक हसीने कमालीची भुमिका निभावल्याने ऑस्ट्रेलिया संघाचा विजय झाला होता.

कोरोना टेस्ट करण्यात आली
शोएब मलिक आणि मोहम्मद रिझवान या दोघांची प्रकृती अचानक खराब झाल्याने पाकिस्तान संघ चिंतेत आहे. कारण आज सेमीफायनल खेळला जाणार आहे. अशातच शोएब आणि रिझवान या दोघांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. सध्या त्याचे अहवाल प्राप्त झाले नसून, पाकिस्तान संघाला हे दोघेही खेळाडू अतिशय महत्त्वाचे आहे. आजच्या सेमीफायनल सामन्यात जर पाकिस्तानला विजय प्राप्त झाला तर, पाकचा अंतिम सामना न्यूझीलंडसोबत असणार आहे.

एडम जम्पाचे जोरदार प्रदर्शन
ऑस्ट्रेलियांचा लेग स्पिनर एडम जम्पा वर्ल्डकपमध्ये कमालीची कामगिरी करतांना पाहायला मिळत आहे. पाकिस्तान विरुद्ध आज त्यांचा सामना होणार आहे. अशातच आजच्या सेमीफायनलमध्ये जो जिंकेल तो संघ न्यूझीलंडसोबत अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कोणत्याही परिस्थितीत हा सामना आपल्या बाजूने करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

बातम्या आणखी आहेत...