आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेसिंग रूममध्ये केक अटॅक:स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने साजरा केला कॅप्टन विराट कोहलीचा वाढदिवस, पाहा व्हिडिओ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी शुक्रवारचा दिवस खास होता. त्याचा वाढदिवस होता. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडचा आठ विकेट्सने पराभव करत कर्णधार कोहलीला वाढदिवसाची अप्रतिम भेट दिली. स्कॉटलंडविरुद्धच्या विजयानंतर विराट कोहलीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सामना संपल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यावर केकचा वर्षाव केला.

त्याच्या चेहऱ्यापासून त्याच्या संपूर्ण शरीरापर्यंत, संघसहकाऱ्यांनी त्याला केक लावला. विराटच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर केक असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तसेच, त्याच्या डोक्यावर केकचा तुकडाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये वरुण चक्रवर्ती, ईशान किशन आणि ऋषभ पंत देखील सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.

भारताचा सलग दुसरा विजय
टी-20 विश्वचषकात भारताचा हा सलग दुसरा विजय असून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. भारताने पहिले दोन सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून गमावले होते. त्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान आणि नंतर स्कॉटलंडचा पराभव केला.

7 नोव्हेंबरला न्यूझीलंडचा पराभव करण्यात अफगाणिस्तानचा संघ यशस्वी ठरला तर टीम इंडियासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा होईल. कारण न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचे 6-6 गुण असतील. त्याचवेळी भारताला नामिबियासोबत 8 नोव्हेंबरला शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्याचेही 8 गुण होतील आणि रनरेटनुसार भारतीय संघ सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करू शकेल.

नाही खेळू शकला SCO पूर्ण ओव्हर
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना SCO संघ पूर्ण 20 ओव्हरही खेळू शकला नाही आणि 17.4 षटकांच्या खेळात 85 धावांवर सर्वबाद झाला. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने 3-3 विकेट्स घेतल्या. भारताने 86 धावांचे लक्ष्य 6.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. विजयात केएल राहुलने केवळ 19 चेंडूत 50 धावांची शानदार खेळी खेळली.

बातम्या आणखी आहेत...