जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीजचा तुफान फलंदाज ख्रिस गेल लवकरच निवृत्त होत आहे. आगामी क्रिकेट वर्ल्ड कप झाल्यानंतर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. वेस्ट इंडीजच्या क्रिकेटरने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. येत्या मे ते जुलै पर्यंत इंग्लंड आणि वेल्स येथे वर्ल्ड कप रंगणार आहे. 1999 मध्ये डेब्यू करणारा ख्रिस गेल वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक शतक लावणारा फलंदाज आहे. तो वेस्ट इंडीजचा ब्रायन लारानंतर सर्वाधिक धावा काढणारा क्रिकेटर आहे. 10 हजार धावा पूर्ण...
  February 18, 11:30 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभूत केले आहे. यासोबत भारताला 2-1 च्या फरकाने मालिका सुद्धा किवींनी आपल्या नावे केली आहे. भारताने हा सामना जिंकल्यास न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. परंतु, अवघ्या काही धावांनी भारताने स्वप्न भंगले आहे. एवढेच नव्हे, तर भारताचा गेल्या 10 टी-20 मालिकांमध्ये अजेय राहण्याचा विक्रम सुद्धा मोडला आहे.मॅचच्या सुरुवातीला रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी...
  February 10, 04:20 PM
 • ऑकलंड - पहिल्या टी 20 सामन्यातीलमोठ्या पराभवाचा बदला घेत भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट राखत विजय मिळवला आहे. त्यांनी भारतासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 7 विकेट राखून विजयी कामगिरी केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. क्रुणाल पांड्याने 3विकेट घेतल्या. न्यूझीलंडने टॉस जिंकतप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर उभारणाऱ्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या...
  February 8, 03:00 PM
 • वेलिंग्टन - वन डे मालिकेमध्ये भारताकडून सपाटून पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने टी 20 मालिकेची सुरुवात मात्र दणक्यात केली आहे. वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 80 धावांनी मोठा पराभव केला. या विजयामुळे त्यांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण किवी फलंदाजांनी या निर्णय सार्थ ठरू दिला नाही. पहिल्या विकेटसाठी सैफर्ट आणि मनरो यांनी 86 धावांची भागीदारी केली. त्यांनी डावाची...
  February 6, 04:03 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात 35 धावांनी विजय मिळवला. यासोबत भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 4-1 ने काबिज केली आहे. यात युजवेंद्र चहलने 3 आणि मोहम्मद शमीने 2 गडी बाद केले. भारताकडून मॅचमध्ये सर्वाधिक 90 धावा अंबाती रायडूने काढल्या. तसेच ऑलराउंडर विजय शंकर आणि हार्दिक पंड्याने 45-45 धावा जोडल्या. तर एमएस धोनी फक्त एक धाव काढून बाद झाला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिले. परंतु,...
  February 3, 06:28 PM
 • हॅमिल्टन - न्यूझीलंड दौऱ्यातील चौथ्या वन डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडने 8 विकेट राखून भारताला मोठा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा संपूर्ण संघ 30.5 ओव्हरमध्ये 92 धावांवर गारद झाला होता. तर किवी संघाने हे लक्ष्य 2 विकेट गमावत 15 ओव्हरमध्येच गाठले. पाच सामन्यांची मालिका भारताने आधीच जिंकली असली तरी या मोठ्या विजयाने किवी संघाचा आत्मविश्वास दुणावला असणार हे नक्की. किवी गोलंदाजांसमोर आणि विशेषतः ट्रेंट बोल्टसमोर भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सात...
  January 31, 11:20 AM
 • माॅनगानुई : भारतीय पुरुष संघापाठाेपाठ आता महिला टीमने मंगळवारी यजमान न्यूझीलंडला घरच्या मैदानावर धूळ चारली. भारतीय महिलांनी आपला दबदबा कायम ठेवताना मालिका विजय संपादन केला. मितालीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने दुसऱ्या वनडेत शानदार विजय मिळवला. भारताने ८ गड्यांनी सामना जिंकला. भारताच्या विजयात महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृतीने (नाबाद ९०) माेलाचे याेगदान दिले. यासोबतच भारताच्या महिलांनी २४ वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये मालिका विजयाची नाेंद केली. यापूर्वी भारताने १९९५ मधील...
  January 30, 08:54 AM
 • लंडन : फुटबॉल क्लब टॉटेनहम हॉट्सचे नवीन स्टेडियम तयार झाले आहे. यासाठी तब्बल ७१ काेटींचा खर्च करण्यात आला. यातून ६२ हजार ०६२ चाहत्यांना या ठिकाणी बसून सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. आसनक्षमतेच्या आधारे विचार केल्यास हे मैदान इंग्लंडमधील सर्वात माेठ्या पाच स्टेडियमपैकी एक मानले जाते. या मैदानावर यजमान टाॅटेनहॅमचा संघ २ मार्च राेजी विजयी सलामी देण्यासाठी उतरणार आहे. यादरम्यान टाॅटेनहॅम आणि आर्सेनल यांच्यात सामना हाेईल. या ईपीएलच्या सामन्यात हे दाेन्ही संघ नव्या मैदानावर पहिल्या...
  January 30, 08:49 AM
 • बे ओव्हल - सलग तिसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारताने पाच सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत किवी संघाला 243 धावांत गुंडाळले. या सामन्यात हार्दीकने किवी संघाचा कर्णधार केन विल्यम्सनची हवेड उडून अप्रतिम कॅच घेतली. त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. सोशल मीडिया यूझर्सने तर ही सुपरमॅन कॅच होती असे म्हणत पांड्याला सुपरमॅन ठरवले आहे. भारताने सुरुवातीला किवी...
  January 29, 01:03 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंड विरोधातील तिसरा वन डे सामनाही अगदी सहज जिंकत भारताने पाच सामन्यांची मालिका खिशात घातली आहे. या संपूर्ण सामन्यामध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिल्याचे पाहायला मिळाले. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सगळ्याच आघाड्यांवर भारतीय संघ वरचढ ठरला. असे असतानाही भारताचा कर्णधार कोहलीने एक अगदी सोपा झेल सोडला आणि चाहत्यांची निराशा झाली. पण पुढच्याच चेंडूवर कोहलीने असे काही केले की सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. कोहलीने 48 व्या ओव्हरमध्ये शमी गोलंदाजी करत होता...
  January 29, 01:01 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने निलंबित झालेल्या हार्दीक पांड्यांचे न्यूझीलंडविरोधातील तिसऱ्या सामन्यात पुनरागमन झाले. या मॅचमध्ये त्याने घेतलेल्या एका कॅचमुळे त्याचे चांगलेच कौतुक होत आहे. त्याचा व्हिडिओदेखिल प्रचंड व्हायरल होत आहे. पण त्याचबरोबर पांड्याचा या मॅचमधील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तो शिखर धवनवर रागावल्याचा आहे. शिखर धवनने पांड्या गोलंदाजी करताना चुकीचा थ्रो केला आणि त्यामुळे ओव्हर थ्रो झाल्याने पांड्या चिडला होता. त्याने...
  January 29, 12:59 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. यासोबतच, 5 सामन्यांची ही सिरीज 3 सामन्यांत संपवून 3-0 अशा आघाडीने मालिका आपल्या नावे केली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये मालिका विजय मिळवण्याची 10 वर्षांतील ही पहिली वेळ आहे. यापूर्वी भारताने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात 2009 मध्ये वनडे मालिका जिंकली होती. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, अख्खी टीम 49 ओव्हर खेळून 243 धावांवर सर्वबाद झाली. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने...
  January 28, 04:14 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने किवी संघाचा 90 धावांनी पराभव केला. भारताने न्यूझीलंडसमोर325 धावांचे आव्हान ठेवले होते. पण त्यांचा संपूर्ण संघ 234 धावांतच गारद झाला. भारताच्या कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर चहल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शमी आणि केदार जाधवने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने आता 2-0 ची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा डाव - भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची...
  January 26, 02:59 PM
 • नेपियर -अत्यंत हुशार आणि फलंदाज किंवा गोलंदाजांच्या मेंदूशी खेळणारा किंवा त्यांच्याविषयी सर्वकाही माहिती असणारा फलंदाजी अशी महेंद्रसिंह धोनी याची ख्याती आहे. त्यामुळेच विराट कोहलीही वारंवार त्याचे सल्ले घेत असतो. कारण धोनीचे सल्ले हे अगदी तंतोतंत फायद्याचे असतात. धोनी गोलंदाजांनाही स्टंपच्या मागून अनेकदा सल्ले देताना दिसतो. त्याचा फायदाही नेहमीच होत असतो. बुधवारी नेपियरच्या वनडे मध्येही पुन्हा एकदा याचा प्रयत्य आला आणि धोनीला बॉस असे का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सर्वांना पटले....
  January 23, 03:42 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी आणि 14 ओव्हर्स राखून पराभव केला.न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर खेळ थांबल्यामुळे डकवर्थ लुईसनुसार एका ओव्हरचा खेळ कमी करून भारताला विजयासाठी 156 धावांचेलक्ष्य देण्यात आले. ते भारताने दोन विकेट कमावत 35 ओव्हरमध्येच पूर्ण केले. शिखर धवनने नाबाद 75 धावा करत भारताचा रथ विजयापर्यंत पोहोचवला. न्यूझीलंडने टॉस जिंक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजीसमोर किवी...
  January 23, 02:39 PM
 • नेपियर -ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारताने न्यूझीलंड दौऱ्याचीही यशस्वी सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिल्या वन डे सामन्यात भारताने किवी संघाचा 8 विकेट आणि 14 ओव्हर राखून मोठा पराभव केला. त्यामुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर किवी फलंदाजांची भंबेरी उडाली. शमीचा वेग आणि चहल-कुलदीप यांच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट घेत मोठी कामगिरी पार पाडली. पण या...
  January 23, 02:39 PM
 • नेपियर - न्यूझीलंडचा फलंदाज रॉस टेलरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला वन डेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले आहे. टेलरने म्हटले आहे की, त्यांच्या टीमने विराटच्या फलंदाजीचा दबदबा विचारात घेऊन त्याच्यापासून जपून राहावे.भारताकडे कोहलीशिवाय इतरही अनेक मॅचविनर प्लेयर्स आहेत. न्यूझीलंडमध्ये भारत पाच मॅचची वन डे सिरीज खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. बुधवारपासून या मालिकेला सुरुवात होत आहे. एका वेबसाइटने टेलरच्या हवाल्याने लिहिले की, तो महान खेळाडू आहे. तो...
  January 22, 11:42 AM
 • इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाला केवळ ४ महिने राहिले. त्यापूर्वी आपल्याला २ वनडे मालिका खेळायच्या आहेत. एक न्यूझीलंडमध्ये व त्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येईल. हा विदेश दौरा आपल्यासाठी फायद्याचा ठरला आहे. नवी दिल्ली - टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. टीमला येथे ५ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. पहिला वनडे २३ जानेवारीला नेपियरमध्ये खेळवला जाईल. येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा अखेरचा विदेशी दौरा आहे....
  January 22, 11:39 AM
 • मेलबर्न - भारतीय टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी म्हटले आहे की, टीममध्ये महेंद्रसिंह धोनीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत धोनी आहे प्रत्येक भारतीयाने क्रिकेटचा आनंद लुटायला हवा. एका वृत्तपत्राशी बोलताना शास्त्री म्हणाले की, धोनीसारखे खेळाडू दशकांतून एकदा जन्म घेतात. शास्त्री म्हणाले की, त्यांनी सचिन तेंडुलकरला अनेकदा नाराज होताना पाहिले आहे, पण धोनीला नाही. धोनी लीजेंड आहे.. शास्त्री म्हणाले, तो लीजेंज आहे. आपल्या महान क्रिकेटपटुंपैकी एक आहे. मी कोणत्याही एवढा शांत...
  January 19, 02:22 PM
 • ऑस्ट्रेलिया विरोधातील वन डे मालिकेत पछाडलेल्या भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनीने विजय मिळवून देत बरोबरी मिळवून दिली. शेवटपर्यंत मैदानावर तळ ठोकून धोनीने केलेल्या अर्धशतकामुळे भारताला ही विजयश्री खेचून आणता आली. पण धोनीने फलंदाजीबरोबरच विकेटच्या मागेही त्याची कामगिरी अगदी चोखपणे पार पाडली. त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज हँड्सकॉम्बला स्टंपिंग करत बाद केले. हँड्सकॉम्ब त्यावेळी 20 धावांवर खेळत होता. 27 व्या ओव्हरमध्ये जडेजा गोलंदाजी करत होता. एका चेंडूवर हँड्सकॉम्ब बीट झाला तर धोनीने जराही...
  January 16, 11:16 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात