जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • लंडन - पाकिस्तानने विश्वचषकातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करत आपला स्पर्धेतील शेवट गोड केला. शोएब मलिकने सामन्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शोएबला बांग्लादेश विरोधात खेळण्याची संधी देखील मिळाली नव्हती. बांग्लादेशवरील विजयानंतर संपूर्ण संघाने शोएबला सन्मानार्थ निरोप दिला. ✅ Hugs galore ✅ Guard of honour ✅ Plenty of applause Pakistan gave Shoaib Malik a fitting send-off as he retired from ODI cricket 👏#CWC19 pic.twitter.com/ESA4q1sLUM Cricket World Cup (@cricketworldcup) 5 July 2019 विश्वचषकात खेळला फक्त 3 सामने शोएब मलिकने या...
  July 6, 01:37 PM
 • लंडन- क्रिकेट विश्वचषक 2019 मधील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर चौथा संघ ठरणार होता, पण यासाठी पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानला मोठ्या अग्निपरीक्षेतून जावे लागणार होते. अखेर पाकिस्तानला चमत्कार घडवणारी खेळी करण्यात अपयश आल्याने न्यूझीलंड चौथा संघ म्हणून सेमीफायनलसाठी क्वालीफाय झाला आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने...
  July 5, 08:32 PM
 • चेस्टर-जॉनी बेयरस्टो (१०६) आणि जेसन रॉय (६०) यांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला आहे. न्यूझीलंडच्या आशा संपुष्टात आल्या. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ बाद ३०५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड डावा १८६ धावांवर ढेपाळला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने १०६ व जेसन रॉयने ६० धावा काढल्या. बेयरस्टोचे हे चालू विश्वचषकात सलग दुसरे शतक ठरले. तिसरी शतकी भागीदारी करून दिली. बेयरस्टो कोणत्याही...
  July 4, 09:41 AM
 • लंडन- आयसीसी विश्व चषक 2019 मध्ये भारताचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहित शर्माने विश्वचषकातील आणखीन एक शतक मारले आहे. त्याने 92 चेंडूत 7 चौके आणि 5 छक्क्याच्या मदतीने 104 रन काढले. या शतकानंतर त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. सामना संपल्यानंतर त्याने आपली हॅट आपल्या चाहतीला दिली. ही फॅन साधीसुधी नसून, रोहितच्या 6 छक्क्यांपैकी एक छक्का या चाहतीला लागला होता. त्यानंतर कृतज्ञता दाखवत रोहितने तिला आपली हॅट गिफ्ट केली. रोहितचा चेंडू लागलेल्या महिलेची नाव मीना आहे. तिला चेंडू...
  July 3, 02:01 PM
 • लंडन- बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात मंगळवारी भारताने बांग्लादेशला पराभूत करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली. या संपूर्ण सामन्यादरम्यान अनेकवेळा कॅमेऱ्याची नजर एका आजीवर पडत होती. कॅमेरात अनेक वेळा त्यांना दाखवले जात होते. काही वेळातच त्या आजी इंटरनेटवर व्हायरल झाल्या. सामना संपल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने त्या आजींची भेट घेतली. त्यानंतर त्या आजी नेमक्या कोण आहेत, हा प्रश्न सगळ्यांना पडला. या 87 वर्षीय आजी अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीमच्या समर्थक आहेत. त्या...
  July 3, 12:30 PM
 • बर्मिंगहॅम - रोहित शर्माच्या (१०४) शानदार शतक आणि बुमराह (४ बळी), शमीच्या (३ बळी) जोरावर भारतीय संघाने बांगलादेवर २८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. बांगलादेश यापूर्वीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेला आहे. प्रथम खेळताना भारताने ५० षटकांत ९ बाद ३१४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश ४८ षटकांत सर्वबाद २८६ धावा करू शकला. तत्पूर्वी, रोहित शर्माने विश्वचषकात आतापर्यंत ४ शतके झळकावली. एका विश्वचषकात चार शतके झळकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला....
  July 3, 09:03 AM
 • बर्मिंगहॅम - टीम इंडिया विश्वचषकात आपला आठवा सामना मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळेल. टीमने सामना जिंकल्यास सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करेल. गेल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर टीमच्या प्रदर्शनावर टीका होत आहे. कारण पाच विकेट शिल्लक असतानादेखील टीमने अखेरच्या ५ षटकांत वेगवान धावा काढण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे बांगलादेश पराभूत झाल्यास उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होईल. प्रत्येक टीम इतिहासातील चांगल्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करू इच्छित आहे. टीम...
  July 2, 10:31 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड कपमध्ये रविवारच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 31 धावांनी पराभूत केले. या पराभवाचे दुख जितके भारत आणि भारतीय प्रेक्षकांना आहे, त्याहून कितीतरी पटीने अधिक शोक पाकिस्तानी व्यक्त करत आहेत. भारताच्या पराभवावर नाराज झालेल्या पाकिस्तानी फॅन्समध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तरची देखील भर पडली. विशेष म्हणजे, या पाकिस्तानी क्रिकेटरने सामन्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट करून भारताची मदत मागितली होती. मात्र, इंग्लंडचा विजय झाल्यानंतर आता तो तीव्र नाराज आहे. ही नाराजी त्याने...
  July 1, 04:45 PM
 • लंडन - शिखर धवन, भुवनेश्वर कुमार पाठोपाठ आता भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यामुळे विश्वचषकातून बाहेरू पडला आहे. यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होण्याची भीती आहे. त्याच्या जागी मयंकअग्रवालला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. मयंक आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. सरावादरम्यान झाली होती दुखापत सरावादरम्यान वेगवान गोलंदाज बुमराहचा चेंडू विजयच्या पायाच्या अंगठ्याला लागल्यामुळे दुखापत झाली होती. पण ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले...
  July 1, 02:49 PM
 • बर्मिंगहॅम-यजमान इंग्लंडने विश्वचषकात अखेर विजयी ट्रॅकवर पुनरागमन केले. रविवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने टीम इंडियाला ३१ धावांनी पराभूत केले. हा त्यांचा दोन पराभवांनंतर पहिला विजय ठरला. दुसरीकडे भारताचा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३३७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३०६ धावा करू शकला. इंग्लंडने...
  July 1, 08:09 AM
 • बर्मिंगहॅम -इंग्लंडने भारताला ३१ धावांनी हरवून उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा कायम राखल्या. इंग्लंडचा हा ५वा विजय असून ३ जुलैला इंग्लंडने आपल्या अंतिम लढतीत न्यूझीलंडला हरवले तर तो उपांत्यफेरीत पोहचेल. दुसरीकडे पाक स्पर्धेतून बाद होईल. भारताचे ११ गुण असून त्याच्या २ जुलैला बांगलादेश व ६ रोजी लंकेशी लढती शिल्लक आहेत. एक सामना जरी जिंकला तरी भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. टीम इंडिया ११ गुणांवरच उपांत्य फेरी गाठू शकतो. परंतु, या ठिकाणी रनरेट महत्त्वाचा असेल. नवे समीकरण इंग्लंडचे ८...
  July 1, 08:02 AM
 • हे छायाचित्र बर्मिंगहममध्ये झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सरावाचे आहे. संघ शनिवारी तेथे आजच्या भारत-इंग्लंड सामन्याआधी सराव करण्यासाठी मैदानावर आला होता. त्या वेळी चेंडू झाडांत हरवला. सामान्यपणे सराव करत असलेले सहकारीच चेंडू आणून देतात, पण येथे धोनी स्वत: बॅटिंग पॅडमध्ये चेंडू शोधताना दिसला. त्याच्यासोबत प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्रीही चेंडू शोधत होते. लहानपणी गल्लीत खेळताना जो बॅटिंग करत असेल तोच हरवलेला चेंडू आणत असे. त्या दिवसांची यावरून आठवण झाली.
  June 30, 11:34 AM
 • विश्वचषकात आता महत्त्वाच्या टप्प्यात सामना जिंकल्यानंतर प्रत्येक टीमला सतत सुधारणा करावी लागेल, अन्यथा मोठ्या सामन्यात त्याचा फटका बसू शकतो. टीम इंडियाची फलंदाजी गेल्या २ सामन्यांत रंगात दिसली नाही. फलंदाजांची चूक पुन्हा होऊ नये. या चुका टाळाव्या लागतील... विराट कोहली : आऊटसाइड ऑफ स्टम्प लाइन व गुड लेंथ कर्णधार कोहलीमध्ये जास्त उणिवा नाहीत. तरी आऊटसाइड ऑफ स्टम्प लाइन व गुड लेंथ चेंडूवर थोडे लक्ष द्यावे लागेल. ऑफ स्टम्पपासून स्विंग होणाऱ्या चेंडूविरुद्ध स्ट्राइक रेट ६०.९७ असतो....
  June 30, 09:12 AM
 • लॉर्ड््स - विश्वचषकात शनिवारी दुसऱ्या सामन्यात मिचेल स्टार्कच्या ५ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत प्रवेशासाठी इंग्लंडला हरवावे लागेल. हा सामना ३ जुलै रोजी होईल. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव ४३.४ षटकांत सर्वबाद १५७ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून विलियम्सनने सर्वाधिक ४० धावा केल्या. गुप्टिलने २० आणि टेलरने ३० धावा काढल्या. इतर फलंदाजांनी...
  June 30, 09:09 AM
 • चेस्टर ली स्ट्रीट -श्रीलंका संघ विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ९ गड्यांनी पराभूत झाला. श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाला. तीन वेळचा फायनलिस्ट श्रीलंकेचा हा तिसरा पराभव ठरला. श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने ३७.२ षटकांत एक गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. उपांत्य फेरीतच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या श्रीलंकेचे गणित चुकवले. सामनावीर ठरलेला वेगवान गोलंदाज प्रिटोरियसने २५ धावा देत ३ विकेट...
  June 29, 10:34 AM
 • मँचेस्टर -विराट कोहली (७२) व महेंद्रसिंग धोनी (५६*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर १२५ धावांनी विजय मिळवला. भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला. मो. शमीने करिअरमधील (१६/४) सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २६८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा डाव १४३ धावांवर ढेपाळला. विराट विश्वचषकात ४ सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने २०१९ मध्ये आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार...
  June 28, 12:30 PM
 • मँचेस्टर -सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता यंदाच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया ही सेमीफायनलच्या प्रवेशापासून अवघ्या एका पावलावर आहे. त्यामुळे एका विजयाने भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित हाेणार आहे. भारताचा स्पर्धेतील सहावा सामना आज गुरुवारी हाेणार आहे. या सामन्यात भारत आणि विंडीज हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. भारतीय संघाने मागील २७ वर्षांपासून विंडीज संघाविरुद्धची विजयी माेहीम कायम ठेवली आहे. १९९२ च्या...
  June 27, 09:54 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय महिला हॉकी टीमने रविवारी वुमन्स सिरीज फायनल्समध्ये विजय मिळवला. याच विजयातील खरी हिरो लालरेमसियामी आता भारतात परतली आहे. फायनल सामना होणार त्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी लालरेसियामीचे वडील लालथनसंगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तरीही भारताची ही हॉकीटपटू मोठ्या धाडसाने देशासाठी खेळली. केवळ खेळलीच नाही, तर जपानला 3-1 ने पराभूत देखील केले. मायदेशी परतताच तिने आईला मिठी मारली आणि मन भरून रडली. पंतप्रधानांनी दिल्या होत्या शुभेच्छा लालरेमसियामी...
  June 26, 10:51 AM
 • बर्मिंगहॅम - जबरदस्त फाॅर्मात असलेला गुणतालिकेतील नंबर वन न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात विजयी षटकारासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा वर्ल्डकपमधील सातवा सामना आज बुधवारी पाकिस्तानशी हाेणार आहे. न्यूझीलंड संघाला अद्याप यंदाच्या विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे ही विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी टीम उत्सुक आहे. दुसरीकडे पाकचा संघ यंदा १९९२ च्या विश्वचषकासारखी कामगिरी करत आहे. १९९२ आणि यंदा २०१९ च्या विश्वचषकात पाकला दाेन विजयांपूर्वी विंडीजविरुद्ध पराभव पत्करावा...
  June 26, 10:36 AM
 • लंडन -५० षटकांत २२४ धावा. डावाचा रनरेट ४.४८. हे अफगाणिस्तानविरुद्ध शनिवारी साउथम्प्टनमध्ये झालेल्या सामन्यातील भारतीय टीमचे प्रदर्शन आहे. आकड्यानुसार २०१० नंतर ५० षटकांच्या सामन्यात भारताची ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचे असे प्रदर्शन आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना न गमावल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झाले. भारत आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांत आकाश-पाताळाचे अंतर आहे. भारतीय टीम वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे....
  June 24, 10:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात