जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • लॉर्ड््स - विश्वचषकात शनिवारी दुसऱ्या सामन्यात मिचेल स्टार्कच्या ५ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला. यापूर्वी न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत प्रवेशासाठी इंग्लंडला हरवावे लागेल. हा सामना ३ जुलै रोजी होईल. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव ४३.४ षटकांत सर्वबाद १५७ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून विलियम्सनने सर्वाधिक ४० धावा केल्या. गुप्टिलने २० आणि टेलरने ३० धावा काढल्या. इतर फलंदाजांनी...
  June 30, 09:09 AM
 • चेस्टर ली स्ट्रीट -श्रीलंका संघ विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ९ गड्यांनी पराभूत झाला. श्रीलंका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर झाला. तीन वेळचा फायनलिस्ट श्रीलंकेचा हा तिसरा पराभव ठरला. श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने ३७.२ षटकांत एक गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. उपांत्य फेरीतच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या श्रीलंकेचे गणित चुकवले. सामनावीर ठरलेला वेगवान गोलंदाज प्रिटोरियसने २५ धावा देत ३ विकेट...
  June 29, 10:34 AM
 • मँचेस्टर -विराट कोहली (७२) व महेंद्रसिंग धोनी (५६*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर १२५ धावांनी विजय मिळवला. भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला. मो. शमीने करिअरमधील (१६/४) सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ बाद २६८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा डाव १४३ धावांवर ढेपाळला. विराट विश्वचषकात ४ सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने २०१९ मध्ये आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार...
  June 28, 12:30 PM
 • मँचेस्टर -सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता यंदाच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया ही सेमीफायनलच्या प्रवेशापासून अवघ्या एका पावलावर आहे. त्यामुळे एका विजयाने भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित हाेणार आहे. भारताचा स्पर्धेतील सहावा सामना आज गुरुवारी हाेणार आहे. या सामन्यात भारत आणि विंडीज हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. भारतीय संघाने मागील २७ वर्षांपासून विंडीज संघाविरुद्धची विजयी माेहीम कायम ठेवली आहे. १९९२ च्या...
  June 27, 09:54 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय महिला हॉकी टीमने रविवारी वुमन्स सिरीज फायनल्समध्ये विजय मिळवला. याच विजयातील खरी हिरो लालरेमसियामी आता भारतात परतली आहे. फायनल सामना होणार त्याच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी लालरेसियामीचे वडील लालथनसंगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तरीही भारताची ही हॉकीटपटू मोठ्या धाडसाने देशासाठी खेळली. केवळ खेळलीच नाही, तर जपानला 3-1 ने पराभूत देखील केले. मायदेशी परतताच तिने आईला मिठी मारली आणि मन भरून रडली. पंतप्रधानांनी दिल्या होत्या शुभेच्छा लालरेमसियामी...
  June 26, 10:51 AM
 • बर्मिंगहॅम - जबरदस्त फाॅर्मात असलेला गुणतालिकेतील नंबर वन न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात विजयी षटकारासाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा वर्ल्डकपमधील सातवा सामना आज बुधवारी पाकिस्तानशी हाेणार आहे. न्यूझीलंड संघाला अद्याप यंदाच्या विश्वचषकात पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे ही विजयी माेहीम कायम ठेवण्यासाठी टीम उत्सुक आहे. दुसरीकडे पाकचा संघ यंदा १९९२ च्या विश्वचषकासारखी कामगिरी करत आहे. १९९२ आणि यंदा २०१९ च्या विश्वचषकात पाकला दाेन विजयांपूर्वी विंडीजविरुद्ध पराभव पत्करावा...
  June 26, 10:36 AM
 • लंडन -५० षटकांत २२४ धावा. डावाचा रनरेट ४.४८. हे अफगाणिस्तानविरुद्ध शनिवारी साउथम्प्टनमध्ये झालेल्या सामन्यातील भारतीय टीमचे प्रदर्शन आहे. आकड्यानुसार २०१० नंतर ५० षटकांच्या सामन्यात भारताची ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचे असे प्रदर्शन आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना न गमावल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झाले. भारत आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांत आकाश-पाताळाचे अंतर आहे. भारतीय टीम वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे....
  June 24, 10:20 AM
 • स्पोर्ट डेस्क- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आईसीसी)ने विराट कोहलीला आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी करार केले आहे. शनिवारी अफगानिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात अनावश्यक अपील केल्यामुळे कोहलीवर त्याच्या सामन्यातील फीसच्या 25% दंड भरावा लागणार आहे. कोहली आयसीसीच्या कलम धारा 2.1 अंतर्गत दोषी करार दिला गेला आहे. सामन्यात भारताने अफगानिस्तानला 11 रनाने पराभुत केले. अफगानिस्तानच्या इनिंगच्या वेळी 29व्या ओव्हरमध् जसप्रीत बुमराहचा चेंडू फलंदाज रहमतच्या पायावर लागला होता. यावेळी...
  June 23, 06:00 PM
 • साऊथम्पटन-काेहली (६७) व केदार जाधव (५२) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर माे. शमीच्या (४/४०) शानदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने शनिवारी विश्वचषकात चाैथा विजय नाेंदवला. भारताने स्पर्धेतील आपल्या पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाने ११ धावांनी राेमहर्षक विजय मिळवला. यासह भारताने विश्वचषकात विजयाचे अर्धशतक साजरे केले. भारताचा हा ५० वा विजय ठरला. तसेच अफगाणचा हा सलग सहावा पराभव ठरला. भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकात सुरुवातीचे पाच सामने गमावले नाही. यापुर्वी, २०१५ च्या...
  June 23, 09:49 AM
 • साऊथम्पटन-जगातील सर्वात फिट क्रिकेट संघ म्हणून टीम इंडियाची अाेळख अाहे. त्यामुळे या टीमच्या कामगिरी अाणि स्टॅमिनाची सर्वाधिक चर्चा असते. मात्र, हे सर्व काही तयार हाेण्यासाठी वर्ष-सहा महिन्यांचा कालावधी लागला, असे नाही. यासाठी तब्बल चार वर्षांपर्यंत प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या माेहिमेला गत विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर लगेच सुरुवात करण्यात अाली. सीनियर खेळाडू अाणि सपाेर्ट स्टाफ यांनी ठरवून एक माेठा निर्णय घेतला. यात फलंदाजी, गाेलंदाजी, फिल्डिंगसारखीच फिटनेसवरही प्रचंड मेहनत...
  June 22, 11:01 AM
 • साऊथम्पटन-टीम इंडिया विश्वचषकात आपल्या पाचव्या सामन्यासाठी शनिवारी अफगाणिस्तानशी दोन हात करेल. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास विश्वचषकाच्या इतिहासात ५० वा विजय ठरेल. आतापर्यंत केवळ दोनच संघ अशी कामगिरी करू शकले आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६७ आणि न्यूझीलंडने ५२ सामने जिंकले. टीम इंडियाने चालू विश्वचषकात एकही सामना गमावला नाही, दुसरीकडे अफगाणिस्तानने एकही सामना जिंकला नाही. दोन्ही संघ पहिल्यांदा विश्वचषकात समोरासमोर असतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये...
  June 22, 10:41 AM
 • लंडन - गत रविवा री भारत आणि पाकिस्तान या दाेन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषकाचा सामना अधिक लाेकप्रिय आणि चर्चेचा ठरला. या सामन्यातील गमती-जमतींनीही साेशल मीडियावर धुमाकूळ घातला. या सामन्यादरम्यान पाकचा कर्णधार सरफराज अहमद जांभई देताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. हाच क्षण अंत्यत स्पष्ट आणि व्यवस्थितपणे कॅमेऱ्याने टिपला. त्यानंतर सरफराजच्या याच मुव्हमेंटची आता साेशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना जगभरातील १०० काेटी चाहत्यांनी पाहिला....
  June 21, 10:32 AM
 • नाॅटिंघम -ऑस्ट्रेलिया संघाने गुरुवारी विश्वचषकात पाचव्या विजयाची नाेंद केली. या संघाने स्पर्धेतील आपल्या सहाव्या सामन्यात बांगलादेशवर ४८ धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत १० गुणांसह अव्वल स्थानावर धडक मारली. वाॅर्नर आणि उस्मान ख्वाजा (८९) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील आपल्या सहाव्या सामन्यात गुरुवारी बांगलादेशसमाेर ३८२ धावांचे टार्गेट ठेवले. यंदाच्या स्पर्धेत चाैथ्यांदा ३५०+ धावांच्या स्काेअरची नाेंद झाली. प्रत्युत्तरात...
  June 21, 10:28 AM
 • बर्मिंघम-बुधवारी विश्वचषक २०१९ मध्ये कर्णधार केन विलिम्सनचे (१०३*) शतक आणि ग्रॅडहोमच्या (६०) अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून शानदार विजय मिळवला. द. आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते जवळपास बाहेर होतील. न्यूझीलंड ५ सामन्यांत ९ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला. द. आफ्रिकेने दिलेल्या २४१ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीवीर गुप्टिलने ५९ चेंडूत ३५ धावा केल्या. विलिम्सनने कर्णधाराला साजेशी संयमी खेळी करत १३८ चेंडूत ८ चौकार व १ षटकारासह...
  June 20, 10:26 AM
 • इस्लामाबाद - भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा उडाल्यानंतर नाराज पाक समर्थकांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोक पाकिस्तानी कर्णधाराच्या पिझ्झा खाण्यावर तर काही चुकीच्या निर्णयावर आपला रोष व्यक्त करत आहेत. परंतु, एका पाकिस्तानी चाहत्याने कहरच केला. आपल्या टीमच्या पराभवावर तो इतका नाराज झाला की त्याने पाकिस्तानच्या एका न्यायालयात या क्रिकेट टीमवर बंदीची याचिका दाखल केली. एवढेच नव्हे, तर अशा टीमची निवड करणाऱ्या निवड समितीची सुद्धा हकालपट्टी करण्यात यावी असे त्याने...
  June 19, 11:19 AM
 • लंडन - विश्वचषक २०१९ मधील २३ सामने म्हणजे जवळपास ५० टक्के लढती संपल्या आहेत. अर्ध्या स्पर्धेतील फलंदाजांची कामगिरी पाहता टीम इंडिया सरासरीत अव्वलस्थानी आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी ६४ च्या सरासरीने धावा काढल्या. इतर संघ ५० ची सरासरीदेखील गाठू शकले नाहीत. न्यूझीलंड ४८ च्या सरासरीने दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीत न्यूझीलंड संघ सर्वाधिक चिवट आहे. टीम प्रत्येक षटकात केवळ ४.४७ च्या रनरेटने धावा देत आहे. इतर संघांची सरासरी ५ पेक्षा अधिक आहे. अफगाणिस्तान ५.२६ च्या सरासरीने दुसऱ्या स्थानी...
  June 19, 10:32 AM
 • मॅनचेस्टर- भारताचा वेगवान गोलांदाज भुवनेश्वर कुमार रविवारी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात स्नायुंमध्ये आलेल्या तणावामुळे जखमी झाला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत भुवनेश्वर पुढील 2 ते 3 सामन खेळू शकणार नाही, अशी माहिती दिली. त्याचा जागेवर आता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात जागा देण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या जखमेचा अंदाज यावरून लावता येईल की, तो त्याची तिसरी ओव्हरी पूर्ण करू शकला नाही आणि फक्त 2 चेंडू टाकून मैदानातून बाहेर गेला....
  June 17, 05:20 PM
 • मँचेस्टर - समानावीर राेहित शर्माच्या (१४०) झंझावाती २४ व्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने रविवारी विश्वचषकात आपल्या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. भारताने डकवर्थ लुईसच्या आधारे ८९ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नाेंद केली. आता भारताचा चाैथा सामना २२ जून, शनिवारी अफगाणविरुद्ध हाेईल. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या माेबदल्यात पाकसमाेर ३३७ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकला ४० षटकांत ३०२...
  June 17, 10:08 AM
 • मँचेस्टर -१२ व्या विश्वचषकातील सर्वात मोठा सामना रविवारी होणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आहेत. आजपर्यंतच्या विश्वचषकातील सर्व सामन्यांत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले आहे. यापूर्वी १९९९ च्या विश्वचषकातील सामन्यात भारताने पाकचा ४४ धावांनी पराभव केला होता. सामन्यावेळी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. मँचेस्टरमध्ये पाकने प्रथम फलंदाजी केल्यास पाक पराभूत होतो : मँचेस्टरमध्ये पाकिस्तानने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी केली आणि...
  June 16, 09:39 AM
 • स्पोर्ट डेस्क- विश्वचषकात 16 जूनला भारतचा सामना पाकिस्तानसोबत होत आहे. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडिअममध्ये होणाऱ्या या सामन्यात पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. तरीदेखील प्रेक्षक जास्त किमतीत सामन्याचे तिकीट खरेदी करत आहेत. या सामन्याचे तिकीट काही वेळातच विकले गेले. ज्या लोकांनी तिकीट खरेदी केले होते, आता तेच लोक वियागो वेबसाइटवर त्याच तिकीटांना विकून दुप्पट पैसे मिळवत आहेत. शुक्रवारी गोल्ड लेव्हलचे टिकीट 4.20 लाख रूपयांना (6 हजार डॉलर) विकले गेले. वास्तविक किमतीपेक्षा जास्त आहे...
  June 14, 07:07 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात