Home >> Sports >> From The Field

From The Field

 • नॉर्थम्पटन- युवा खेळाडूंना संधी देण्याच्या नावाखाली ज्या राहुल द्रविडला निवड समितीने संघाबाहेर केले होते, त्याची द्रविडची आठवण संघ संकटात असताना झाली. वनडे संघात पुनरागमनाची आशा सोडलेल्या द्रविडची संघात निवड झाल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. वनडे आणि टी-२० तून निवृत्तीची घोषणा करताना द्रविड म्हणाला, या निवडीमुळे मला धक्काच बसला. मी गेल्या दोन वर्षांत एकही वनडे सामना खेळलेला नाही. यामुळे मला माझ्या निवडीची आशा नव्हतीच. खरे बोलायचे झाल्यास या निवडीमुळे आश्चर्यचकित झालो,...
  August 8, 02:31 AM
 • पल्लिकेल - ट्रेंटब्रिज कसोटीत इंग्लंडचा फलंदाज इयान बेलविरुद्धची धावबादची अपील पुन्हा मागे घेणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने मुक्तकंठाने स्तुती केली आहे. धोनीच्या या खिलाडूवृत्तीमुळे आपण खूप प्रभावित झाल्याचे पाँटिंगने सांगितले.धोनीला नेहमी चांगल्या खिलाडूवृत्तीसह खेळावे वाटते. ज्यावेळी तुमची भावना चांगली असते, त्यावेळी परिणामही चांगले येतात. तुम्ही बघू शकता की, धोनीने कशा पद्धतीने बेलला फलंदाजीस परत बोलाविले. असे...
  August 7, 08:42 AM
 • नॉर्थम्पटन - इंग्लंड दौऱयावर नॉर्थम्पटनशायरविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीच्या जागी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. धोनी या संघात केवळ यष्टिरक्षक म्हणून सामील आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या संघाच्या यादीत गंभीरला कर्णधार म्हणून नमूद करण्यात आले होते. ही कदाचित चूक असू शकते. मात्र, या चुकीने सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली. २००५ मध्ये झालेल्या झिम्बाब्वे दौयावर टीम इंडियाचे तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग...
  August 7, 04:15 AM
 • चेन्नई - द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱया ३८ वर्षीय राहुल द्रविडचे इंग्लंडविरुद्ध होणाया एकमेव टी-२० व ५ वन डे मालिकेसाठी दोन वर्षांनंतर आश्चर्यकारक पुनरागमन झाले आहे. त्यानंतर रात्री उशिरा त्याने या मालिकेनंतर वन डे आणि टी-20तून निवृत्त होण्याची घोषणाही केली. कसोटीत मात्र तो खेळत राहील. दुखापतीने त्रस्त असलेला ऑफस्पिनर हरभजनसिंग आणि अष्टपैलू युवराजसिंग यांना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. १६ सदस्यीय संघात एस. श्रीसंतलाही स्थान मिळू शकले नाही. भारत आणि इंग्लंडदरम्यान ३...
  August 7, 01:39 AM
 • लंडन । भारताचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर आता पूर्णपणे फिट झाला असून यामुळे इंग्लंड दौ-यावर असलेल्या टीम इंडियाला मजबुती मिळणार आहे. पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर आता तिस-या कसोटीत इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करण्यास गंभीर सज्ज झाला आहे. तिस-या कसोटीत तो आपला आवडता जोडीदार वीरेंद्र सेहवागसोबत सलामीला खेळेल. पहिल्या कसोटीत गंभीर खेळला होता. मात्र, दुखापतीमुळे तो अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत स्वत:च्या तंत्रामध्ये पटकन बदल करून खेळ करण्याची...
  August 6, 06:40 AM
 • एजबेस्टन - सलग दोन कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चाखणा-या पाहुण्या टीम इंडियाला तारण्यासाठी वीरेंद्र सेहवागने लंडनमध्ये गुपचूप खांद्यावर उपचार करून घेतल्याचे वृत्त आहे. याबाबतची कुणकुण कुणालाही न लागू देता वीरूने आपली मोहीम फत्ते केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संघाचा धोक्यात असलेला ताज वाचवण्यासाठी आपल्या दुखापतीवर तात्पुरता का होईना उपाय करून वीरूने संघात स्थान मिळवले आहे. तिस-या कसोटीत खेळण्याचे टार्गेट पूर्ण! - कसोटी मालिकेतील सलग दोनदा झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळेच वीरेंद्र...
  August 6, 06:32 AM
 • औरंगाबाद - इंग्लंड दौ-यावर टीम इंडियाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. अशा परिस्थितीत धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. माजी कर्णधार सुनील गावसकर, सौरव गांगुली, रवी शास्त्री यांनीही धोनीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय धोनीच्या स्वत:च्या फॉर्ममुळे तो अडचणीत आला आहे. महेंद्रसिंग धोनी संघात केवळ कर्णधार म्हणून नाही तर तो एक उत्तम फलंदाज म्हणूनही सामील आहे. अशा परिस्थितीत तो स्वत: अपयशी ठरत असेल तर मग त्याच्या संघातील उपस्थितीवर प्रश्न...
  August 5, 05:43 AM
 • नवी दिल्ली - जगातील नंबर वनचा कसोटी संघ भारत सध्या जबरदस्त संकटात सापडलेला आहे. आता आपले कसोटीतील नंबर वनचे सिंहासन वाचविण्यासाठी टीम इंडियाकडे एकच पर्याय राहिला आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत फक्त विजय. भारताने उर्वरित दोन कसोटी सामने ड्रॉ जरी केले तरीही टीम इंडियाचे सिंहासन हिसकावलो जाईल. अखेर या मालिकेत असे काय घडले की, ज्यामुळे टीम इंडिया पराभवाच्या संकटात सापडली आहे. भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे सुमार फलंदाजी. ज्या संघाकडे जगातील सर्वोत्तम फलंदाजी...
  August 5, 05:35 AM
 • नॉटिंगहॅम । भारताविरुद्ध दुस-या कसोटीत इंग्लंडचा युवा खेळाडू टीम ब्रेसननने ९० धावांची खेळी करून पाच विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडला भारतावर सहज विजय मिळविता आला. या कामगिरीमुळे मी आनंदी आहे. दुसरा कोणी निराश झाला असेल, तर मला माहीत नाही. मी तर मुळीच निराश नाही. आता तिस-या कसोटीत मला खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा ब्रेसनने व्यक्त केली. पुढील सामन्यात कोणाला निवडायचे आहे याचा निर्णय निवड समिती आणि कर्णधार घेतील. हा निर्णय कठोर असला तरीही मी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मी...
  August 4, 04:47 AM
 • लंडन - इंग्लंडचा इयान बेल धावबाद झाल्यानंतरही त्याला परत फलंदाजीला बोलाविल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, याचा खरा मानकरी आहे तो सचिन तेंडुलकर. इंग्लंडमधील एक वर्तमानपत्र डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडचा कर्णधार स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अॅण्डी फ्लॉवर यांनी भारताकडे बेलला परत फलंदाजीस संधी देण्याची विनंती केली होती. मात्र, धोनीने त्यांची ही विनंती धुडकावली होती. मात्र, सचिन तेंडुलकरने धोनीशी चर्चा केली आणि त्याचे मन वळविले. सचिनच...
  August 3, 02:57 AM
 • नॉटिंघम- इंग्लंडचा फलंदाज इयन बेल याला फलंदाजीसाठी परत बोलाविण्याच्या निर्णयामुळे टिम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर साहेबांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु, बेलला परत बोलाविण्यामागे सचिनची शिष्टाई असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेंट ब्रिज कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इयन बेल नाट्यमय रित्या धावबाद झाला होता. परंतु, चहापानानंतर तो फलंदाजीसाठी परत आल्यानंतर कर्णधार धोनीवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला होता. परंतु, बेलला परत बोलाविण्यास धोनीचा विरोध होता. त्याने नकारही दिला होता....
  August 2, 12:32 PM
 • नॉटिंघम- इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी भारताचा स्टार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आहे. हॉट स्पॉट तंत्रज्ञानापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मणने बॅटवर व्हॅसलीन लावल्याची खोचक टिप्पणी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विटरवर केली. बॅटच्या कडेला लावलेल्या व्हॅसलीनने लक्ष्मणला वाचविले काय?, असा सवाल त्याने केला. त्याच्या या टिप्पणीनंतर एकच वादळ उठले. दुसऱ्या दिवसाच्या खेळच्या...
  July 31, 06:10 PM
 • लंडन - भारतीय संघात 'वॉल' नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट ४०० झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. अशी कामगिरी करणारा द्रविड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.श्रीसंतच्या गोलंदाजीवर मॅट प्रायरचा झेल घेत द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० झेल पूर्ण केले. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये १५५ सामन्यात २०५ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३९ सामन्यात १९६ झेल घेतले आहेत. सध्या त्याच्या झेलांची संख्या ४०१ झाली आहे. तसेच ४०० झेल घेणारा द्रविड हा एकमेव...
  July 30, 04:27 PM
 • लंडन - भारतीय संघातील जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याला मैदानावर पंचांच्या निर्णयाविरोधात आक्षेप नोंदविणे महागात पडले आहे. प्रवीणकुमारला सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.प्रवीण कुमारला ज्या कृत्यामुळे दंड करण्यात आला असेच कृत्य इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने ल़ॉर्डस कसोटीत केले होते. मात्र, त्याला त्यावेळी कोणताही दंड ठोठावण्यात आला नव्हता. यातून आयसीसीचे दुपट्टी धोरण स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. सामनाधिकारी रंजन मदगुले यांनी...
  July 30, 12:07 PM
 • लंडन - भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर जास्तच आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याने केलेले पायचीतचे अपील पंच मरेस एरासमस फेटाळल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी हरभजनने हस्तक्षेप करून प्रवीण कुमारला शांत केले.दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात १८ व्या षटकात प्रवीण कुमारने पीटरसनविरुद्ध पायचीतचे अपील केले. प्रवीणचे हे अपील पंचांनी धुडकाविले. त्यावेळी प्रवीणने षटक पूर्ण केले, पण षटक संपल्यानंतर थेट...
  July 29, 06:59 PM
 • लंडन- आयपीएलच्या चौथ्या सत्राच्या टवेन्टी-20 स्पर्धेनंतर क्रिकेटला अलविदा म्हणणार्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज व सिनेतारका शिल्पाच्या राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधार शेन वॉर्नची पुन्हा एकदा गर्लफ्रेन्ड एलिझाबेथ हर्लेने विकेट घेतली आहे.नुकतेच डायटवर असलेल्या हर्लेने आपल्या सौंदर्यातच मोठा अप्रतिम असा बदलच घडून आणला आहे. त्यामुळेच तिला पाहताच शेन वॉर्नला पुन्हा एकदा अजूनही यौवनात मी असल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे. पुन्हा ही जोडी नवप्रेमीयुगलांसारखी प्रेमाच्या सागरात रममाण...
  July 29, 05:56 AM
 • ट्रेंटब्रिज - लॉर्डस कसोटीत लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटीपूर्वी एक आनंदाची बातमी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सलामीवीर गौतम गंभीर दुसऱ्या कसोटीसाठी तुंदुरुस्त झाले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्या शुक्रवारपासून (२९ जुलै) दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात होत आहे.स्नायू ताणले गेल्याने पहिल्या कसोटीतून बाहेर गेलेल्या झहीर खानच्या खेळण्याविषयी मात्र संदिग्धता आहे. झहीर दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेल्यास एस श्रीसंतची संघात समावेश होण्याची शक्यता...
  July 28, 12:27 PM
 • लंडन - इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसर याला सचिन तेंडुलकरला नेट प्रॅक्टीसवेळी मदत न करण्यास सांगितले आहे.फ्लॉवर म्हणाले, पानेसरने लॉर्डस कसोटीपूर्वी सचिनला नेट प्रॅक्टीस करताना मदत केली होती. त्यामुळे मला वाटतेय की संघातील कोणत्याही खेळाडूने विरोधी संघातील खेळाडूला मदत करणे चुकीचे आहे. पानेसरशी मी या विषयाबाबत बोलणार असून, मला आशा आहे की तो यापुढे असे करणार नाही. चार सामन्यांपैकी एक सामना आम्ही जिंकला असून, शुक्रवारपासून सुरु होणारा दुसरा...
  July 27, 04:51 PM
 • लंडन - लॉर्डसवरील विजयामुळे उत्साहीत झालेला इंग्लंडचा कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने इंग्लंड लवकरच भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान मिळविण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रात स्ट्रॉसने लिहिल्यानुसार, क्रमवारीत अव्वल होण्यासाठी आमच्या संघाला प्रत्येक संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे. सांघिक प्रदर्शनामुळेच आम्हाला यश मिळाले आणि आता कोणत्याही संघासमोर कमी नाही. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी पाहिल्या डावात ४७४ धावा केल्यानंतर आमच्या गोलंदाजांनी चांगली...
  July 27, 01:47 PM
 • लॉर्ड्स, लंडन- अलीकडच्या काळात पाऊस पडतोय आणि तो थांबल्यानंतर क्रिकेट सामना लागलीच सुरू झाल्याची फारशी उदाहरणे सापडत नाहीत. लॉर्ड्सवर मात्र पाऊस थांबताच तत्काळ खेळ सुरू करता येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे लॉर्ड्सचे आगळेवेगळे मैदान. या मैदानावर 2003 मध्ये वाळूमिर्शित माती टाकण्यात आली. ही वाळू अतिशय उत्तम दर्जाची आणि महागडी होती. मात्र, त्याचा लाभ लॉर्ड्स स्टेडियमला झाला. आता वर्षाचे 365 दिवस तेथे क्रिकेट होऊ शकते. कित्येक वर्षांपासूनचे मैदान खणून काढताना त्यांनी शतकापासून राखलेल्या...
  July 27, 04:18 AM
 
जाहिरात

RECOMMENDED