Home >> Sports >> From The Field

From The Field

 • नवी दिल्ली - डोक्याच्या दुखापतीमुळे मला अंधुक दिसू लागले होते. अशा परिस्थितीत संघात राहून संघाच्या अडचणी मला वाढवायच्या नव्हत्या. मी पूर्ण फिट नसताना, खेळण्याच्या स्थितीत नसताना खेळून मला भारताच्या पराभवाचे कारण व्हायचे नव्हते. यामुळेच मी मायदेशी उपचारांसाठी परतलो, अशी प्रतिक्रिया इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत डोक्यावर पडल्याने जखमी झालेल्या भारताच्या गौतम गंभीरने व्यक्त केली. अंधुक दिसत असताना मी खेळलो असतो तर मला चेंडूचा वेग आणि चेंडूची उसळी नीटपणे कळली नसती. अशा परिस्थितीत...
  September 5, 01:52 AM
 • नवी दिल्ली- मोहंम्मद कैफ भले ही आता भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर असला तरी त्याच्या क्षेत्ररक्षणास तोड नव्हती. तो जेव्हा संघात होता तेव्हा त्याच्या हातातून चेंडू कधी निसटून ही जात नव्हता. त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फायदाच झाला. २००३ सालच्या विश्वचषकातील इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात त्याच्या याच क्षेत्ररक्षणाचा फायदा भारतीय संघाला झाला. त्याने इंग्लंड संघाच्या निक नाईटला त्याने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने धावबाद केले होते.सामन्याच्या दुस-या षटकातील पहिल्या...
  September 4, 03:21 PM
 • गॅले- श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने शतकांच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या २९ शतकांची बरोबरी केली आहे. जयवर्धनेने गॅले येथील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १०५ धावा करून ब्रॅडमॅन यांची बरोबरी केली. २९ पेक्षा जास्त शतके करणा-यांमध्ये तो जगातील १० व्या क्रमांकाचा तर श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे.जयवर्धनेने १२० कसोटींमध्ये ५२.६८ च्या सरासरीने ९७४६ धावा केल्या आहेत. ब्रॅडमॅन यांनी ५२ कसोटीत ९९.९४ च्या सरासरीने...
  September 3, 06:11 PM
 • नवी दिल्ली- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला किक्रेटचा देव म्हटले जाते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजही त्याला गोलंदाजी करण्यास घाबरतात. सचिनने १८१ कसोटी ३९८ डावांमध्ये १४९६५ धावा केल्या आहेत तर ४५३ एकदिवसीय सामन्यांमधील ४४२ डावांमध्ये त्याने १८१११ धावा केल्या आहेत.एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकरने आतापर्यंत एकूण २५७ षटकार लगावले आहेत. त्याच्या एकूण षटकारांपैकी सर्वोत्तम तीन षटकारांचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे. सचिनने हे तीन षटकार २००३ च्या विश्वचषकामध्ये मारले होते....
  September 1, 04:56 PM
 • मँचेस्टर: कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर विजयी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा एकमेव टी-२० सामनाही ६ गड्यांनी गमावला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १६५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावा काढून विजय मिळविला. विनयच्या अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची गरज होती. समित पटेलने विनयकुमारला सलग तीन चौकार खेचून विजय साकारला. तत्पूर्वी, भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ६१ धावा...
  September 1, 03:26 AM
 • गॉले- फिरकीपटू रंगाना हेराथने घेतलेल्या तीन बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ दीडशे धावांमध्येच पॅव्हेलियन मध्ये परतला. रिकी पॉंटिंग आणि माईक हसीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वगडी बाद २७३ धावा झाल्या आहेत. माईक हसी ९५ धावांवर बाद झाला.तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोरडया आणि फिरकीला साथ देणा-या खेळफट्टीवर डावखुरा फिरकीपटू हेराथच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण उडाली. माजी...
  August 31, 05:03 PM
 • इंग्लंड- भारतीय क्रिकेट संघ उद्या (सोमवारी) लिस्टरशायर विरूध्द २०-२० सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा सराव केंट येथे सुरू आहे. केंटमध्ये बॉम्बच्या अफवेने भारतीय संघाच्या सरावापासून माध्यमांना दूर ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या सांगण्यावरून माध्यमांना दूर ठेवण्यात आल्याचे सूचना अधिका-याने सांगितले.विश्वविजेत्यांचा इंग्लंडने कसा पराभव केला याचे चर्वितचर्वणच गायले जात आहे. भारताने कसोटी कशी गमावली, गंभीरच्या दुखापतीबद्दल माध्यमांमध्ये प्रसिध्दी...
  August 28, 06:55 PM
 • कसोटी मालिका गमावून प्रतिष्ठा गमावलेल्या पाहुण्या भारतीय संघाच्या दुस-या सराव सामन्यात ऐनवेळी वरुणराजाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने बराच काळ उसंत न घेतल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. केंट विरुद्ध भारत यांच्यात दुसरा सराव सामना खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सराव सामना होऊ शकला नाही. ससेक्सविरुद्धच्या सराव सामन्यात विराट कोहली व सुरेश रैनाच्या शानदार अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने 6 गडी राखून इंग्लंडच्या धर्तीवर पहिल्यांदा विजयाची नोंद केली. त्यामुळे...
  August 27, 02:30 AM
 • नवी दिल्ली - भारतीय संघातील गोलंदाज ईशांत शर्माचे दुखापतग्रस्त होणे, झारखंडचा जलदगती गोलंदाज वरुण एरॉनसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आपल्या जलदगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वरूण आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.भारतीय गोलंदाजीला आकार देण्यासाठी वरूणचा संघात समावेश करण्यात आल्याचे निवड समितीच्या सदस्यांनी सांगितले. वरुणमध्ये सतत १४० किलोमीटर प्रतितास गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे. त्याच्या याच गतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या...
  August 22, 06:42 PM
 • लंडन - इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची परिस्थिती खराब आहे. भारतीय संघ इतिहासात प्रथमच इंग्लंडकडून ४-० असा मोठा पराभव स्वीकारण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संघात निराशेचे वातावरण आहे. परंतू, त्यातही भारतीय संघाला सचिन तेंडुलकर थोडे समाधान देऊ शकतो.ईएसपीएन वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सचिनने ओव्हल कसोटीत अखेरच्या दिवशी आणखी ९२ धावा केल्यातर तो कसोटी क्रिकेटमध्ये पंधरा हजार धावांचा टप्पा पार करणार आहे. सचिन पंधरा हजार धावा पूर्ण करताना इंग्लंडची राणी एलिझाबेथ मैदानावर...
  August 22, 03:54 PM
 • लंडन - इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासमोरिल अडचणी कमी होत नसल्याचे दिसत नाही. दुखापतीमुळे त्रस्त असलेले वीरेंद्र सेहवाग आणि ईशांत शर्मा टवेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत. या दोघांच्या जागी संघात अजिंक्य रहाणे आणि वरुण एरॉन यांचा समावेश करण्यात आला आहे.इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात प्रवेश केलेल्या सेहवागला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. तिसऱ्या कसोटीत तो दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. चौथ्या कसोटीतही तो कमाल दाखवू शकला नाही....
  August 22, 01:48 PM
 • लंडन - गणितीय पद्धतीने केलेल्या अभ्यासातून इंग्लंड संघाने सलग तीन कसोटी सामन्यांत महाशतकासाठी तीनआकडी धावांचा टप्पा गाठण्यास उतावीळ झालेल्या सचिनच्या कमजोरीचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला आहे. लेग साइडवरच खेळण्यास पसंती देत असल्यामुळे सचिन चांगल्या प्रकारे खेळत असल्याचा दावा या वेळी इंग्लंडच्या काही तज्ज्ञांनी केला आहे. ऑफ साइडवरच्या खेळीत मात्र सचिनला अपयश येत असल्याचेही त्यांनी या वेळी शोधून काढले आहे. त्यामुळेच आतापर्यंत सचिन महाशतकापासून दुरावल्याची स्पष्टोक्ती...
  August 22, 03:20 AM
 • नवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ आपली लाज वाचविण्याचा प्रयत्नात आहे, तर इंग्लंडचा संघ भारताला व्हाईटवॉश देण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघासाठी हे मैदान लकी ठरले आहे. विजयासाठी भारतीय संघ सर्व प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू जोरदार सराव करीत असताना पहा फोटोंमधून...
  August 17, 01:40 PM
 • लंडन. शानदार कामगिरी करून भारताला नमवित इंग्लंडच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीतील नंबर वनचे स्थान मिळविले आहे. मात्र, इंग्लंड संघाची अग्निपरीक्षा तर आता येथूनच सुरू होत आहे. हे नंबर वनचे स्थान टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान या संघासमोर असेल. पुढच्या वर्षी या संघाला आशियाई खेळपट्ट्या अर्थात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाप्रमाणे प्रदीर्घ काळ नंबर वनचे स्थान टिकवून ठेवेल की दक्षिण...
  August 17, 07:12 AM
 • मुंबई. भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौ-यावरील दारुण पराभव भारतीय क्रिकेट बोर्डाने फारच गंभीरपणे घेतला आहे. कार्यकारिणी सदस्य अनिल कुंबळेसह भारताच्या अनेक माजी कसोटीपटूंनी दौ-यावरील अधिक सराव सामन्यांच्या केलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे बोर्डाने ठरवले आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला प्रत्यक्ष सामन्याआधी किमान दोन सराव सामने आयोजित करण्याची विनंती करण्यात येणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळते की, याबाबत ऑस्ट्रेलिया...
  August 17, 07:07 AM
 • मुंबई. भारतीय क्रिकेट संघाची प्रथम स्थानावरून झालेली घसरण, ही बाब क्रिकेट बोर्डाने गंभीरपणे घेतली असून, किमान दोन विभागांचे निवड समिती सदस्य बदलले जाण्याचे संकेत मिळत आहेत. पूर्व विभागाने आपला प्रतिनिधी राजा वेंकट याचे नाव बदलण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचा बदल म्हणजे, पश्चिम विभागाचे प्रतिनिधी सुरेंद्र भावे यांच्या जागी दुसरा क्रिकेटपटू नियुक्त करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरेंद्र भावे यांचे पश्चिम विभागाचे प्रतिनिधी म्हणून कार्य...
  August 17, 07:04 AM
 • लंडन - भारताविरुद्ध ओव्हल मैदानावर सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात दुखापतग्रस्त ख्रिस ट्रेमलेटच्या जागी ग्रॅहम ओनीयन्सचा समावेश करण्यात आला आहे. जेम्स अँडरसनही दुखापतग्रस्त झाला असून, त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.अँडरसनच्या दुखापतीमुळे भारताला कसोटी मालिकेत ४-० असा व्हाईटवॉश देण्याच्या इंग्लंडच्या स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. निवड समितीचे अध्यक्ष जेफ मिलर म्हणाले, ट्रेमलेट तंदुरुस्त चाचणी पार करण्यात अपय़शी ठरला. त्यामुळे ओनीयन्सचा संघात...
  August 16, 02:36 PM
 • टीम इंडियाने शानदार कामगिरी करून २००९ मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत नंबर वनचे स्थान पटकाविले. कसोटी पाठोपाठ भारताने वनडेतही विजय लय कायम ठेवून २८ वर्षानंतर विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले. सर्व काही चांगले सुरू असताना इंग्लंडचा दौरा आला. बघता-बघता टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख घसरला. 22 महिन्यांच्या कालावधीतच अव्वल स्थान गमाविण्याची नामुष्की भारतीय संघावर आली. येथूनच टीम इंडियाच्या सुवर्ण युगाचा अस्त होतोय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे....
  August 15, 06:28 AM
 • बर्मिंगहॅम. कसोटी मालिका गमावल्याच्या दु:खात बुडालेल्या भारतीय संघाला काडीचा आधार देण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीचा फॉर्म पुन्हा परतल्याचे चित्र दिसत आहे. तिसरी कसोटी वाचवण्याच्या प्रयत्नात असलेली आघाडीची चौकडी अपयशी ठरल्यानंतर धोनीने संयमी खेळीसाठी कंबर कसली. तिस-या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज म्हणूनही धोनीची कामगिरी श्रेष्ठ ठरली. यामध्ये धोनीने पहिल्या डावात ७७ तर दुस-या डावात नाबाद ७४ धावांची खेळी केली. २००९ मध्ये...
  August 15, 06:09 AM
 • बर्मिंघम- टीम इंडियाच्या वीरेंद्र सेहवागकडून क्रिकेटप्रेमींना खुप आशा होती. तो धावांचा पाऊस पाडताना खुप धावा काढेल आणि नवे विक्रम रचेल, असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, भलताच विक्रम नोंदवून सेहवाग तिस-या कसोटीच्या दोन्ही डावात बाद झाला. कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम सेहवागने रचला आहे.वीरेंद्र सेहवाग इंग्लंडविरुद्ध तिसया कसोटीच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने तर दुसया डावात...
  August 14, 01:46 AM
 
जाहिरात

RECOMMENDED