Home >> Sports >> From The Field

From The Field

 • टीम इंडियाने शानदार कामगिरी करून २००९ मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत नंबर वनचे स्थान पटकाविले. कसोटी पाठोपाठ भारताने वनडेतही विजय लय कायम ठेवून २८ वर्षानंतर विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले. सर्व काही चांगले सुरू असताना इंग्लंडचा दौरा आला. बघता-बघता टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख घसरला. 22 महिन्यांच्या कालावधीतच अव्वल स्थान गमाविण्याची नामुष्की भारतीय संघावर आली. येथूनच टीम इंडियाच्या सुवर्ण युगाचा अस्त होतोय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे....
  August 15, 06:28 AM
 • बर्मिंगहॅम. कसोटी मालिका गमावल्याच्या दु:खात बुडालेल्या भारतीय संघाला काडीचा आधार देण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीचा फॉर्म पुन्हा परतल्याचे चित्र दिसत आहे. तिसरी कसोटी वाचवण्याच्या प्रयत्नात असलेली आघाडीची चौकडी अपयशी ठरल्यानंतर धोनीने संयमी खेळीसाठी कंबर कसली. तिस-या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज म्हणूनही धोनीची कामगिरी श्रेष्ठ ठरली. यामध्ये धोनीने पहिल्या डावात ७७ तर दुस-या डावात नाबाद ७४ धावांची खेळी केली. २००९ मध्ये...
  August 15, 06:09 AM
 • बर्मिंघम- टीम इंडियाच्या वीरेंद्र सेहवागकडून क्रिकेटप्रेमींना खुप आशा होती. तो धावांचा पाऊस पाडताना खुप धावा काढेल आणि नवे विक्रम रचेल, असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, भलताच विक्रम नोंदवून सेहवाग तिस-या कसोटीच्या दोन्ही डावात बाद झाला. कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम सेहवागने रचला आहे.वीरेंद्र सेहवाग इंग्लंडविरुद्ध तिसया कसोटीच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने तर दुसया डावात...
  August 14, 01:46 AM
 • बर्मिंगहॅम-सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कुकच्या शानदार द्विशतकानंतर जलदगती गोंलदाज जेम्स अँडरसनच्या घातक गोलंदाजीने इंग्लंडने भारताला एक डाव आणि २४२ धावांनी पराभव केला आहे. या विजयाबरोबर इंग्लंडने मालिकेत ३-० ने आघाडी घेतली आहे. इंग्लंड आता आयसीसीच्या कसोटी मानांकनात क्रमांक एकचा संघ बनला आहे. चौथ्या कसोटीचा काहीही निकाल लागला तरी या मानांकनावर काहीही परिणाम होणार नाही.भारताने आपल्या पहिल्या डावात २२४ धावा जमवल्या होत्या. त्यास उत्तर देताना इंग्लंड संघाने अॅलिस्टर कुकच्या...
  August 13, 07:59 PM
 • लंडन- मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरवर केलेली स्तुतिसुमनांची उधळण मूळ भारतीय वंशाचा इंग्लिश क्रिकेटपटू रवी बोपाराला अडचणीत आणणारी ठरत आहे. यजमान इंग्लंड संघ संकटात सापडलेला असतानाच पाहुण्या भारतीय संघाचा घातक फलंदाज मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची तोंडभरून स्तुती करत असलेल्या बोपाराची माजी कर्णधार मायकल वॉनने चांगलीच कानउघाडणी केली आहे. इंग्लंडचा संघ अव्वल स्थानासाठी शर्थीची झुंज देत आहे आणि रवी बोपारा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचे गोडवे गातो, हे संघाच्या दृष्टीने घातक...
  August 13, 03:55 AM
 • बर्मिंगहॅम - सलग दोनदा पराभवाची धूळ चाखल्यानंतर आपले अव्वल स्थान राखण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होताच भारताचा उपकर्णधार गौतमला गंभीरला साक्षात्कार झाला. घरच्या मैदानावर आक्रमक खेळी करून विजयी आघाडी घेणारी यजमान टीम इंग्लंडच नं. 1 असल्याची गंभीर घोषणा दुसया दिवसअखेरच्या पत्रकार परिषदेत गौतमने केली. लढण्याआधीच शस्त्र टाकण्यासारख्या या वक्तव्यावर संघातून तीव्र नाराजीचे सूर निघत आहेत. तसेच भारतीय संघाला अजूनही आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी संधी आहे. त्या संधीचे चीज करत...
  August 13, 03:47 AM
 • नवी दिल्ली- क्रिकेटमध्ये काही खेळाडू आपल्या प्रदशर्नाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असतात. सर्वात जास्त अजब कारनामे असतात क्षेत्ररक्षकांचे. क्षेत्ररक्षक धावा वाचवण्यासाठी, झेल टिपण्यासाठी काय करतील हे सांगता येत नाही.ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँडी बिचेलने न्यूजीलँड विरूध्दच्या एकदिवसीय सामन्यात असाच एक अफलातून झेल पकडला. बिचेलने काईल मिल्सचा सीमारेषेवर असा झेल पकडला की बघणारे सर्वजण हैराण झाले. सगळयांना वाटलं की मिल्सचा हा षटकार असेल परंतु बिचेलने आपल्या अनोख्या अंदाजात तो...
  August 12, 08:46 PM
 • बर्मिंगहॅम-सचिन तेंडुलकरची बॅट इंग्लंडमध्ये अचानक शांत झाली आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघेनाशा झाल्या आहेत. सचिनच्या या बिघडलेल्या लयीचे कारण माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी शोधून काढले आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर गेल्या वर्षापर्यंत जबरदस्त फॉर्मात होता. त्याने मागच्या वर्षी एका कॅलेंडर वर्षात तीन द्विशतके झळकावली. यात त्याने एक द्विशतक वन डेत ठोकले. इतकेच नव्हे, तर सचिनने या वर्षी झालेल्या विश्वचषकात दोन शतके ठोकली. मात्र, इंग्लंडच्या दौर्यावर अचानक तो संघर्ष करताना...
  August 12, 05:59 AM
 • बर्मिंगहॅम - दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणार्या वीरेंद्र सेहवाग याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष होते. पण, तो पहिल्याच चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. सेहवागच्या कारकिर्दीत तो पाचव्यांदा पहिल्या चेंडूवर बाद झाला.सेहवागच्या ग्लोव्हजला चेंडू लागून यष्टीरक्षक मॅट प्रायरकडे गेला होता हे यूडीआरएस प्रणालीत उघडकीस आले. सेहवागला सुरवातील पंचांनी नाबाद ठरविले होते. पण इंग्लंडचा कर्णधार स्ट्रॉसने तिसर्या पंचांकडे दाद मागितली आणि सेहवागला बाद देण्यात आले. सेहवाग...
  August 11, 01:58 PM
 • नवी दिल्ली - क्रिकेटमधील ऑस्कर समजल्या जाणार्या आयसीसी पुरस्कारांच्या तीन श्रेणींमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानला नामांकन देण्यात आले आहे. आयसीसी पुरस्कारांचे वितरण १२ सप्टेंबरला लंडनमध्ये होणार्या कार्यक्रमात होणार आहे.झहीर खान व्यतिरिक्त आयसीसी पुरस्कारांच्या नामांकन यादीत राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांना प्रत्येकी दोन श्रेणींमध्ये नामांकन देण्यात आले आहे. झहीरला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर, सर्वोत्कृष्ठ कसोटीपटू आणि सर्वोत्कृष्ठ एकदिवसीय खेळाडू...
  August 11, 01:02 PM
 • पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोंलदाज डेनिस लिलीने पाकिस्तानचा फलंदाज जावेद मियांदादला लाथ मारली. त्यावेळेस जावेदने लगेचच त्याच्यावर बॅट उगारली. पंचांच्या हस्तक्षेपामुळे पुढील कटू प्रसंग टळला. या घटनेमुळे जगभरातून लिलीवर टीका करण्यात आली होती. या कृत्यामुळे लिलीला १२० डॉलरचा दंड आणि दोन सामन्यांवर बंदी घालण्यात आली होती.पाहा या घटनेचा व्हिडिओ ........
  August 10, 07:17 PM
 • बर्मिंगहॅम- भारताच्या सचिन तेंडुलकरला बाद तेवढे करणे हे पाहिजे तसे सोपे नसल्याची प्राजंळ कबुली इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने यांने केली आहे. गोलंदाजीमधील मोठ्या तपश्चर्येनंतरच या महान फलंदाजाला बाद करण्याचे भाग्य एकदाच मिळते असेही त्याने या वेळी स्पष्ट केले. कसोटी मालिकेतील दोन सामन्यात महाशतकाच्या प्रयत्नात असलेल्या सचिनला इंग्लंडच्या जेम्स अॅँडरसनने बाद करण्याचा बहुमान पटकावला. याविषयी अंडरसन म्हणाला की, क्रिकेट विश्वातील देव मानल्या जाणा-या सचिन तेंडुलकरची विकेट घेणे...
  August 10, 01:49 AM
 • बर्मिंघम - इंग्लंडचा जलदगती गोलंदाज ख्रिस ट्रेमलेट हा दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळू शकणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेमलेटच्या पाठीला दुखापत झाली आहे.इंग्लंडने जाहीर केलेल्या तेरा सदस्यांच्या संघात ट्रेमलेटचा दुखापतीमुळे समावेश करण्यात आलेला नाही. ट्रेमलेट चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना १८ ऑगस्टपासून ओव्हल येथील मैदानावर होणार आहे. ट्रेमलेटच्या जागी...
  August 9, 06:31 PM
 • नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टवेंटी-२० सामन्यात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंथा मेंडीसने सहा बळी घेत विश्वविक्रम नोंदविला. मेंडीसने १६ धावांत ६ बळी मिळविल्याने श्रीलंकेने दुसरा टवेंटी-२० सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. टवेंटी-२० क्रिकेटमध्ये सहा बळी मिळविण्याची कामगिरी यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. यापूर्वी टवेंटी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी पाकिस्तानच्या उमर गुलने केली होती. गुलने न्यूझीलंडविरुद्ध ६ धावांत...
  August 9, 03:05 PM
 • लंडन- इंग्लंडविरुद्ध वन डे आणि टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेला राहुल द्रविड ३ सप्टेंबर रोजी आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घालेल. हा विक्रम असेल वन डेत खेळणारा सर्वाधिक वयस्क खेळाडूचा. ३ सप्टेंबर रोजी द्रविड या यादीत दुस-या क्रमांकावर पोहोचेल. इंग्लंडविरुद्ध ३ सप्टेंबर रोजीच भारताचा पहिला वन डे होणार आहे. त्या दिवशी द्रविड ३८ वर्षे आणि २३५ दिवसांचा असेल. मुळात हा विक्रम मोहिंदर अमरनाथ यांच्या नावे आहे. त्यांनी आपला अखेरचा वन डे १९८९ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता. त्या वेळी...
  August 9, 01:25 AM
 • लंडन- मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय शतकांच्या महाशतकाची प्रतीक्षा कोट्यवधी चाहत्यांना असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि जगविख्यात गोलंदाज वसीम अक्रमने हे महाशतक तिस-या नव्हे तर चौथ्या कसोटीत होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आतापर्यंत झालेल्या दोन कसोटींत भारतीय संघ आणि सचिन तेंडुलकरलाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. आता तिस-या कसोटीत सचिन शतकांचे महाशतक झळकावेल काय, याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता आहे. अक्रम म्हणाला, सचिन आपले महाशतक तिसया नव्हे तर चौथ्या...
  August 9, 01:14 AM
 • लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकची संघातील पुनरागमन निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या इंटिग्रिटी समितीने शोएब मलिकवरील सर्व आरोप मागे घेण्याचे ठरविले असल्याने त्याला पुन्हा संघात स्थान देण्यात येणार आहे.शोएबवर त्याच्या बँक खात्यात ९० हजार पौंड रक्कम आढळल्याने अडचणीत आला होता. मात्र, आता पीसीबीने या आरोपातून त्याला मुक्त करण्याचे ठऱविले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात त्याच्याकडे...
  August 8, 02:16 PM
 • नॉर्थम्पटन- युवा खेळाडूंना संधी देण्याच्या नावाखाली ज्या राहुल द्रविडला निवड समितीने संघाबाहेर केले होते, त्याची द्रविडची आठवण संघ संकटात असताना झाली. वनडे संघात पुनरागमनाची आशा सोडलेल्या द्रविडची संघात निवड झाल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. वनडे आणि टी-२० तून निवृत्तीची घोषणा करताना द्रविड म्हणाला, या निवडीमुळे मला धक्काच बसला. मी गेल्या दोन वर्षांत एकही वनडे सामना खेळलेला नाही. यामुळे मला माझ्या निवडीची आशा नव्हतीच. खरे बोलायचे झाल्यास या निवडीमुळे आश्चर्यचकित झालो,...
  August 8, 02:31 AM
 • पल्लिकेल - ट्रेंटब्रिज कसोटीत इंग्लंडचा फलंदाज इयान बेलविरुद्धची धावबादची अपील पुन्हा मागे घेणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने मुक्तकंठाने स्तुती केली आहे. धोनीच्या या खिलाडूवृत्तीमुळे आपण खूप प्रभावित झाल्याचे पाँटिंगने सांगितले.धोनीला नेहमी चांगल्या खिलाडूवृत्तीसह खेळावे वाटते. ज्यावेळी तुमची भावना चांगली असते, त्यावेळी परिणामही चांगले येतात. तुम्ही बघू शकता की, धोनीने कशा पद्धतीने बेलला फलंदाजीस परत बोलाविले. असे...
  August 7, 08:42 AM
 • नॉर्थम्पटन - इंग्लंड दौऱयावर नॉर्थम्पटनशायरविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीच्या जागी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे. धोनी या संघात केवळ यष्टिरक्षक म्हणून सामील आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेल्या संघाच्या यादीत गंभीरला कर्णधार म्हणून नमूद करण्यात आले होते. ही कदाचित चूक असू शकते. मात्र, या चुकीने सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली. २००५ मध्ये झालेल्या झिम्बाब्वे दौयावर टीम इंडियाचे तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग...
  August 7, 04:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED