Home >> Sports >> From The Field

From The Field

 • नॉटिंगहॅम । भारताविरुद्ध दुस-या कसोटीत इंग्लंडचा युवा खेळाडू टीम ब्रेसननने ९० धावांची खेळी करून पाच विकेट घेतल्या. या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडला भारतावर सहज विजय मिळविता आला. या कामगिरीमुळे मी आनंदी आहे. दुसरा कोणी निराश झाला असेल, तर मला माहीत नाही. मी तर मुळीच निराश नाही. आता तिस-या कसोटीत मला खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा ब्रेसनने व्यक्त केली. पुढील सामन्यात कोणाला निवडायचे आहे याचा निर्णय निवड समिती आणि कर्णधार घेतील. हा निर्णय कठोर असला तरीही मी संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मी...
  August 4, 04:47 AM
 • लंडन - इंग्लंडचा इयान बेल धावबाद झाल्यानंतरही त्याला परत फलंदाजीला बोलाविल्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, याचा खरा मानकरी आहे तो सचिन तेंडुलकर. इंग्लंडमधील एक वर्तमानपत्र डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडचा कर्णधार स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अॅण्डी फ्लॉवर यांनी भारताकडे बेलला परत फलंदाजीस संधी देण्याची विनंती केली होती. मात्र, धोनीने त्यांची ही विनंती धुडकावली होती. मात्र, सचिन तेंडुलकरने धोनीशी चर्चा केली आणि त्याचे मन वळविले. सचिनच...
  August 3, 02:57 AM
 • नॉटिंघम- इंग्लंडचा फलंदाज इयन बेल याला फलंदाजीसाठी परत बोलाविण्याच्या निर्णयामुळे टिम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर साहेबांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु, बेलला परत बोलाविण्यामागे सचिनची शिष्टाई असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेंट ब्रिज कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इयन बेल नाट्यमय रित्या धावबाद झाला होता. परंतु, चहापानानंतर तो फलंदाजीसाठी परत आल्यानंतर कर्णधार धोनीवर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला होता. परंतु, बेलला परत बोलाविण्यास धोनीचा विरोध होता. त्याने नकारही दिला होता....
  August 2, 12:32 PM
 • नॉटिंघम- इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी भारताचा स्टार फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आहे. हॉट स्पॉट तंत्रज्ञानापासून बचाव करण्यासाठी लक्ष्मणने बॅटवर व्हॅसलीन लावल्याची खोचक टिप्पणी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ट्विटरवर केली. बॅटच्या कडेला लावलेल्या व्हॅसलीनने लक्ष्मणला वाचविले काय?, असा सवाल त्याने केला. त्याच्या या टिप्पणीनंतर एकच वादळ उठले. दुसऱ्या दिवसाच्या खेळच्या...
  July 31, 06:10 PM
 • लंडन - भारतीय संघात 'वॉल' नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट ४०० झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे. अशी कामगिरी करणारा द्रविड हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.श्रीसंतच्या गोलंदाजीवर मॅट प्रायरचा झेल घेत द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० झेल पूर्ण केले. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये १५५ सामन्यात २०५ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३३९ सामन्यात १९६ झेल घेतले आहेत. सध्या त्याच्या झेलांची संख्या ४०१ झाली आहे. तसेच ४०० झेल घेणारा द्रविड हा एकमेव...
  July 30, 04:27 PM
 • लंडन - भारतीय संघातील जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याला मैदानावर पंचांच्या निर्णयाविरोधात आक्षेप नोंदविणे महागात पडले आहे. प्रवीणकुमारला सामन्याच्या मानधनातील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.प्रवीण कुमारला ज्या कृत्यामुळे दंड करण्यात आला असेच कृत्य इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने ल़ॉर्डस कसोटीत केले होते. मात्र, त्याला त्यावेळी कोणताही दंड ठोठावण्यात आला नव्हता. यातून आयसीसीचे दुपट्टी धोरण स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे. सामनाधिकारी रंजन मदगुले यांनी...
  July 30, 12:07 PM
 • लंडन - भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावर जास्तच आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याने केलेले पायचीतचे अपील पंच मरेस एरासमस फेटाळल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी हरभजनने हस्तक्षेप करून प्रवीण कुमारला शांत केले.दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात १८ व्या षटकात प्रवीण कुमारने पीटरसनविरुद्ध पायचीतचे अपील केले. प्रवीणचे हे अपील पंचांनी धुडकाविले. त्यावेळी प्रवीणने षटक पूर्ण केले, पण षटक संपल्यानंतर थेट...
  July 29, 06:59 PM
 • लंडन- आयपीएलच्या चौथ्या सत्राच्या टवेन्टी-20 स्पर्धेनंतर क्रिकेटला अलविदा म्हणणार्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज व सिनेतारका शिल्पाच्या राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधार शेन वॉर्नची पुन्हा एकदा गर्लफ्रेन्ड एलिझाबेथ हर्लेने विकेट घेतली आहे.नुकतेच डायटवर असलेल्या हर्लेने आपल्या सौंदर्यातच मोठा अप्रतिम असा बदलच घडून आणला आहे. त्यामुळेच तिला पाहताच शेन वॉर्नला पुन्हा एकदा अजूनही यौवनात मी असल्याचे म्हणण्याची वेळ आली आहे. पुन्हा ही जोडी नवप्रेमीयुगलांसारखी प्रेमाच्या सागरात रममाण...
  July 29, 05:56 AM
 • ट्रेंटब्रिज - लॉर्डस कसोटीत लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटीपूर्वी एक आनंदाची बातमी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सलामीवीर गौतम गंभीर दुसऱ्या कसोटीसाठी तुंदुरुस्त झाले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्या शुक्रवारपासून (२९ जुलै) दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात होत आहे.स्नायू ताणले गेल्याने पहिल्या कसोटीतून बाहेर गेलेल्या झहीर खानच्या खेळण्याविषयी मात्र संदिग्धता आहे. झहीर दुसऱ्या कसोटीतून बाहेर गेल्यास एस श्रीसंतची संघात समावेश होण्याची शक्यता...
  July 28, 12:27 PM
 • लंडन - इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसर याला सचिन तेंडुलकरला नेट प्रॅक्टीसवेळी मदत न करण्यास सांगितले आहे.फ्लॉवर म्हणाले, पानेसरने लॉर्डस कसोटीपूर्वी सचिनला नेट प्रॅक्टीस करताना मदत केली होती. त्यामुळे मला वाटतेय की संघातील कोणत्याही खेळाडूने विरोधी संघातील खेळाडूला मदत करणे चुकीचे आहे. पानेसरशी मी या विषयाबाबत बोलणार असून, मला आशा आहे की तो यापुढे असे करणार नाही. चार सामन्यांपैकी एक सामना आम्ही जिंकला असून, शुक्रवारपासून सुरु होणारा दुसरा...
  July 27, 04:51 PM
 • लंडन - लॉर्डसवरील विजयामुळे उत्साहीत झालेला इंग्लंडचा कर्णधार ऍण्ड्रयू स्ट्रॉस याने इंग्लंड लवकरच भारताचे कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान मिळविण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रात स्ट्रॉसने लिहिल्यानुसार, क्रमवारीत अव्वल होण्यासाठी आमच्या संघाला प्रत्येक संधीचा फायदा घेणे आवश्यक आहे. सांघिक प्रदर्शनामुळेच आम्हाला यश मिळाले आणि आता कोणत्याही संघासमोर कमी नाही. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी पाहिल्या डावात ४७४ धावा केल्यानंतर आमच्या गोलंदाजांनी चांगली...
  July 27, 01:47 PM
 • लॉर्ड्स, लंडन- अलीकडच्या काळात पाऊस पडतोय आणि तो थांबल्यानंतर क्रिकेट सामना लागलीच सुरू झाल्याची फारशी उदाहरणे सापडत नाहीत. लॉर्ड्सवर मात्र पाऊस थांबताच तत्काळ खेळ सुरू करता येतो. याचे प्रमुख कारण म्हणजे लॉर्ड्सचे आगळेवेगळे मैदान. या मैदानावर 2003 मध्ये वाळूमिर्शित माती टाकण्यात आली. ही वाळू अतिशय उत्तम दर्जाची आणि महागडी होती. मात्र, त्याचा लाभ लॉर्ड्स स्टेडियमला झाला. आता वर्षाचे 365 दिवस तेथे क्रिकेट होऊ शकते. कित्येक वर्षांपासूनचे मैदान खणून काढताना त्यांनी शतकापासून राखलेल्या...
  July 27, 04:18 AM
 • लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शतकांचे शतक पूर्ण करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर सचिनला शतक करण्याची संधी होती. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी सचिनला शतक करण्यापासून रोखण्यासाठी प्लॅन आखले होते आणि त्यात ते यशस्वी झाले.सचिन लॉर्डसवर शतक तर दूरच पण अर्धशतकही करू शकला नाही. पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सचिनला अखूड टप्प्याची गोलंदाजी करण्यास सुरवात केली. ब्रॉडचे पाहून इंग्लंडच्या इतर गोलंदाजांनीही सचिनला अखूड टप्प्याचे आणि...
  July 26, 02:47 PM
 • नवी दिल्ली - भारताला पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून १९६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या या पराभवासाठी प्रामुख्याने चार खेळाडू व्हिलन ठरले आहेत.भारताला सर्वात मोठा धोका झहीर खानने दिला आहे. तर कर्णधार महेंद्रसिंह दोनी आणि गौतम गंभीर आणि हरभजन सिंग या चार खेळाडूंचा भारताच्या पराभवात मोठा वाटा आहे. या चार खेळाडूंबरोबरच भारताच्या पराभवामागील पाच प्रमुख...
  July 26, 02:08 PM
 • लंडन - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर शतक करण्याची संधी हुकली. सचिनने पहिल्या डावात ३४ आणि दुसऱ्या डावात १२ धावा केल्या. सचिनला मोठी धावसंख्या उभारण्यात येत असलेल्या अपयशामागे त्याने बदललेली बॅट असल्याचे बोलले जात आहे.सचिनने २०१० साली चांगली कामगिरी करीत गेल्या २० वर्षातील सर्वांधिक धावा केल्या होत्या. सचिनच्या या चांगल्या कामगिरीमागे त्याची लकी बॅट कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. मात्र, सचिनने आपली बॅट बदलली असून, बॅट बरोबर...
  July 25, 07:55 PM
 • सिडनी - ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. बिग बॅश स्पर्धेत सहभागी असलेल्या ब्रिस्बेन हीट या संघातून हेडन मैदानात उतरणार आहे. हेडनने ३९ व्या वर्षी जानेवारी २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. या स्पर्धेतील सहभागाबरोबरच हेडनने आपण संघाच्या मालकीत काही हिस्सा खरेदी करण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले. स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची माझी...
  July 25, 05:13 PM
 • लंडन - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने लॉर्डस कसोटीत चौथ्या दिवशी ईशांत शर्माला गोलंदाजी करण्यापासून थांबविल्याने या निर्णयावरून वाद सुरु झाले आहेत. मात्र, धोनीच्या या निर्णयाचे खुद्द ईशांत शर्मानेच समर्थन केले असून, गोलंदाजीपासून दूर राहण्याचा निर्णय माझा असल्याचे ईशांतने सांगितले.ईशांत म्हणाला, मला आराम हवा होता, यासाठी मी गोलंदाजी थांबविण्याचा निर्णय घेतला. षटकांची गती राखण्यासाठी धोनीने गोलंदाजांशी चर्चा केली आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त षटके टाकण्यावर आम्ही...
  July 25, 03:33 PM
 • सचिन तेंडुलकरला शतकांच्या महाशतकासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. यासाठी त्याला या पहिल्या कसोटीच्या दुस-या डावात संधी असेल. सचिन पहिल्या डावात ३४ धावा काढून बाद झाला. यामुळे त्याचे लाखो चाहते निराश झाले. भारताच्या ७७ धावा झाल्या असताना दुसरी विकेट पडली. यावेळी सचिन मैदानावर खेळण्यासाठी आला. त्याने अतिशय आत्मविश्वासाने आपल्या खेळीला सुरुवात केली. इंग्लंडचा ब्रॉड डावातील ४४ व्या षटकात गोलंदाजी करीत होता. ब्रॉडच्या एका बाहेर जाणा-या चेंडूवर सचिनने फटका मारण्याचा...
  July 24, 03:37 AM
 • लॉर्ड्स (लंडन). भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा सुरू झाला आणि सचिनचा मुलगा अर्जुन याची लॉर्ड्सवरील क्रिकेटची शाळा संपली. भारतीय संघाच्या नेट्सशेजारी वडिलांप्रमाणे भरपूर सराव करणारा अर्जुन नेट्स गुंडाळल्यानंतर नाइलाजाने बाहेर पडला. उद्या तो भारतात परतणार आहे. गेला महिना तो लॉर्डस क्रिकेट अकॅडमीत सराव करत होता. त्याने हंगामी सदस्यत्वही घेतले होते. या महिन्याभराच्या काळात त्याला दुर्मिळ असा मार्गदर्शक लाभला होता. दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकरच अर्जुनला...
  July 22, 04:27 AM
 • भारताचा आक्रमक गोलंदाज जहीर खानने इंग्लंडचे सलामीवीर अॅलेस्टर कुक (१२) ला जेवणच्या वेळेपूर्वी आणि कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसला (२२) जेवणाच्या ब्रेकनंतर बाद केले. स्थिरावलेल्या सलामीवीर जोनाथन ट्रॉटला 70 धावावर प्रविणकुमारने बाद केले. त्यानंतर केविन पीटरसनने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लंडला सुस्थितीत आणले. तसेच 10 चौकारासह शतक झळकावले. लॉडर्सच्या एतिहासिक मैदानाबरोबरच २००० व्या कसोटीत शतक केल्याने पीटरसन पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे. त्याने प्रथम ट्रॉटबरोबर ९८...
  July 22, 04:25 AM
 
जाहिरात

RECOMMENDED