जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • हैदराबाद. सलग दोन सामन्यांपासून पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या किंग खान शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची प्रतीक्षा लागली आहे. मंगळवारला केकेआरचा सामना सलामी विजयासाठी उत्सुक असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. दोनदा पराभवाची धूळ चाखलेल्या केकेआरवर सलामीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दक्षिण ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाला आहे. याच पराभवातून संघाला सहीसलामत काढण्यासाठी कर्णधार दुखापतग्रस्त गौतम गंभीर मंगळवारला खेळण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाज शॉनसह ओब्रायन,...
  September 27, 05:29 AM
 • हैद्राबादमध्ये खेळण्यात आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि सॉमरसेट यांच्यातील टी-२० सामना रोमांचक झाला. अत्यंत अटीतटीचा झालेल्या या सामन्यात सॉमरसेटने नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. दोन्ही संघानी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. परंतू बाजी मारली ती सॉमरसेटने. सामन्यातील काही निवडक क्षणचित्रे पाहा फोटोंमधून....
  September 26, 03:22 PM
 • चेन्नई. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चारणा-या भज्जीच्या मुंबई इंडियन्सचा सामना सोमवारला माजी उपविजेत्या त्रिनिदाद व टोबेगोशी होणार आहे. चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत शानदार विजयासाठी सलामी देणारा मुंबई इंडियन्स आपल्या आघाडीची लय कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच पात्रता फेरीतच दोन मोठ्या विजयातून डॅरेन गंगाच्या त्रिनिदाद व टोबेगो संघाने विजेतेपदाचे संकेत दिले आहेत. लीगच्या पहिल्याच सामन्यात विजयासाठी त्रिनिदाद संघ सज्ज झाला आहे. एकूणच सोमवारी...
  September 26, 05:51 AM
 • चेन्नई- विजयाच्या 159 धावांच्या प्रत्युत्तरात हरभजन सिंग (19) व मलिंगा (37) या जोडीने केलेल्या नाबाद खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने धोनीच्या चेन्नई संघावर 3 गडी राखून सुपर विजय संपादन केला. घरच्या मैदानावर विजयाचे मनसुबे उधळून लावत मुंबईने धोनीच्या चेन्नईला पराभवाची धूळ चारली. भज्जी-मलिंगाची निर्णायक खेळीसलामीच्या जॉकोब (18) व ब्लिझर्ड (28) या जोडीने रचलेल्या विजयाच्या पायाला तळातल्या कर्णधार हरभजन व मलिंगा अधिकच बळकटी दिली. अटीतटीच्या शेवटच्या षटकात निर्णायक भागीदारीची खेळी करून या...
  September 25, 03:09 AM
 • चेन्नई. चॅम्पियन्स लीग टी-20 च्या तिस-या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. चेन्नई सुपरकिंग्जने निर्धारित 20 षटकांत 4 बळी देऊन 158 धावा केल्या. हसी याने आक्रमक खेळी करत अर्धशतक केले. आणि 81 धावा करून तंबूत परतला. मुंबई इंडियन्सला प्रोत्साहित करण्यासाठी सचिन तेंडूलकर टीमसोबत उपस्थित आहेत.हसीशिवाय मुरली विजयने 8 धावा, सुरेश रैनाने 18 धावा, एस. बद्रीनाथने 16 धावा तर धोनीने 22 धावा केल्या.
  September 24, 09:28 PM
 • पाकिस्तानची रावळपिंडी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. किंबहुना चुकीच्या रुळांवर जाऊन तिचा तोल गेला आहे, असेच म्हणावे लागेल. ही रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणजे वेगवान गोलंदाज शोएब अख्तर होय. त्याने त्याच्या आत्मचरित्रात साक्षात क्रिकेटच्या देवावरच टिका केली. एवढेच नव्हे तर त्याने भारतीय क्रिकेट संघाच्या वॉलवरही डोके आपटले आहे. परंतु, या रावळपिंडी एक्स्प्रेसच्या सचिन आणि सेहवागने चिंधड्या उडविल्या होत्या. दोन घटना यावेळी आवर्जुन सांगाव्या लागतील. दक्षिण आफ्रिकेत 2003 मध्ये झालेल्या...
  September 23, 06:05 PM
 • हैदराबाद- गुणरत्ने (27/3) व सिल्वा (29/3) याजोडीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विजयाच्या 161 धावांच्या प्रत्युत्तर देणा-या लिसेस्टशायरला 156 धावांवर रोखून रुहूना संघाने चॅम्पियन लीग पात्रता फेरीमध्ये शानदार विजय मिळवला.रझ्झाकच्या (68) अर्धशतकी खेळीनंतरही अपयशी ठरलेल्या लिसेस्टशायरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.प्रथम फलंदाजी करणा-या रुहूना संघाने चांदीमल,करुनानायकेच्या शानदार खेळीच्या बळावर 6 गडी गमावून160 धावा काढल्या होत्या. स्पर्धेतील आव्हान राखून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या...
  September 22, 12:37 AM
 • हैदराबाद- चॅम्पियन लीग ट्वेंटी-20 पात्रता फेरीत रूहुना इलेव्हनविरूद्धच्या लढतीत विजयाच्या 139 धावांच्या प्रत्युत्तरात गंगा व ब्राव्होच्या खेळीच्या बळावर त्रिनिदाद व टोबेगोने 5 गड्यांनी विजयी सलामी दिली. गंगाची निर्णायक खेळी!रुहूना इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात धुवाधार फलंदाजीचा सूर गवसलेल्या ब्राव्हो व गंगा या जोडीने केलेली खेळी निर्णायक ठरली. विजयाच्या 139 धावांच्या प्रत्युत्तरात ब्राव्होच्या (44) अर्धशतकाला हुलकावणी बसली; मात्र एस. गंगाने नाबाद 39 धावांची खेळी करत विजयश्री खेचून...
  September 19, 11:31 PM
 • कोलंबो- कसोटी मालिकेत विजयी आघाडीवर असलेल्या पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने ह्यूजच्या (122) नाबाद शतकी खेळीच्या बळावर तिस-या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी 3 गडी गमावून 209 धावांची खेळी केली.या वेळी लंकेच्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेत ह्युज संयमी खेळी करत कांगारूंनी 52 धावांची आघाडी घेतली. लंकेने पहिल्या डावात दिलशान (83) व मॅथ्यूजच्या (105) खेळीच्या बळावर 473 धावांचा टप्पा गाठला होता. चौथ्या दिवसाअखेर कांगारूची ह्युज व क्लार्क ही जोडी मैदानावर टिकून आहे. हेर्थची भेदक गोलंदाजी कांगारूंच्या मोठ्या...
  September 19, 11:21 PM
 • भारतीय क्रिकेट संघाची भिंत म्हणून ओळखल्या जाणा-या राहुल द्रविडने कार्डिफ मध्ये इंग्लंड विरूध्द अखेरचा सामना खेळून एकदिवसीय क्रिकेटचा निरोप घेतला.आपल्या शेवटच्या सामन्यात द्रविडने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या कारकिर्दितले ८३ वे अर्धशतक साजरे केले. आठवणीत राहणारी खेळी त्याने या सामन्यात केली.द्रविडने ७९ चेंडूमध्ये ६९ धावा केल्या त्यात त्याने ४ चौकार लगावले. द्रविडने आपल्या या खेळीने आपण अजूनही एकदिवसीय सामन्यासाठी फिट असल्याचे दाखवून दिले आहे.राहुल द्रविडच्या...
  September 17, 06:11 PM
 • कोलंबो - कसोटी मालिका खिशात घालण्यासाठी संयमी खेळीचा सूर गवसलेल्या मार्श (81) व हॅसीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने 5 गडी गमावून 235 धावांची खेळी केली. यजमान श्रीलंकेच्या गचाळ गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत धावसंख्येचा आलेख उंचावत असतानाच अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. या वेळी नाबाद अर्धशतक ठोकणा-यां हॅसीसोबत हॅडीन (21) मैदानावर खेळत आहे. श्रीलंकेच्या 100 व्या कसोटी सामन्याची सुरुवात केक कापून करण्यात आली. यावेळी मालिकेतील तिस-यां सामन्यात नाणेफेक...
  September 17, 04:25 AM
 • कार्डिफ- भारत-इंग्लंड यांच्यामधील पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने चार बाद २३६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आक्रमक खेळी करून आपल्या कारकिर्दितले सहावे शतक पूर्ण करून भारतीय संघाला सावरले. अंतिम सामना खेळणा-या राहुल द्रविडने आपले ८३ वे अर्धशतक पूर्ण केले. भारताने ४२ षटकात चार बाद २३६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने राहुल द्रविडच्या साथीने भारतीय संघाची पडझड रोखून दमदार अर्धशतक केले. द्रविडनेही आपले अर्धशतक पूर्ण केले असून तो ५३ धावांवर खेळत आहे. भारताने ३७...
  September 16, 07:39 PM
 • मोठी धावसंख्या उभी करावी लागेल - टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली तर संघाला इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. भारताची गोलंदाजी अतिशय दुबळी असून छोट्या धावसंख्येत इंग्लंडला रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी कठीण काम असेल. यामुळे मोठी धावसंख्या उभी करण्याखेरीज भारताकडे पर्याय नाही. सलामी चांगली झाली पाहिजे - कर्डिफ येथे जर टीम इंडियाला विजय मिळवायचा असेल तर चांगली सलामी मिळणे गरजेचे आहे. भारताला आपल्या सलामीच्या जोडीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. सेहवाग, सचिन आणि गंभीरच्या...
  September 16, 05:59 AM
 • मुंबई - क्रिकेटला वेळोवेळी सप्तरंगांची स्वप्ने पडतात. क्रिकेटपटूंच्या विविधरंगी कपड्यांनंतर आता क्रिकेटला वेध लागले आहेत, रंगीत चेंडूंचे. प्रेमाचे प्रतीक ठरलेल्या गुलाबी रंगांच्या चेंडूसोबत क्रिकेटचा हनिमून सध्या सुरू आहे. ग्लेन मॅकग्राच्या पत्नीच्या जेन मॅकग्राच्या स्मृतिदिनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ गुलाबी चेंडूने क्रिकेट खेळला होता. गुलाबी रंगाने सातसमुद्र पार करून थेट इंग्लंडचा किनारा गाठला आहे. कालपरवा कॅन्टरबरीच्या सेंट लॉरेन्स ग्राऊंडवर प्रथम दर्जाच्या क्रिकेट...
  September 16, 05:58 AM
 • कार्डिफ - भारतीय क्रिकेट संघाकडे शुक्रवारी सध्याच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध विजय मिळविण्याची अखेरची संधी असेल. दोन्ही संघादरम्यान हा मालिकेतील पाचवा एकदिवसीय सामना आहे. भारताचा अनुभवी खेळाडू राहुल द्रविडचा हा कारकीर्दीतील अखेरचा वन डे सामना ठरेल. कसोटी मालिकेत 4-0 ने सपाटून मार खाल्ल्यानंतर टीम इंडियाने वन डेत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित केला. मात्र, भारतीय संघाला नशिबाची साथ लाभली नाही. पहिल्या आणि चौथ्या वन डेत विजयाची संधी दिसत होती मात्र, हे दोन्ही सामने पावसामुळे...
  September 16, 05:56 AM
 • सामना जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षण अत्यंत महत्वाचे असते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे सामनाही फिरवता येऊ शकतो. २००९ च्या टी-२० विश्वचषक सामन्याच्यावेळेस श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अॅजलो मॅथ्यूजने आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने प्रेक्षकांच्या डोळयाचे पारणे फेडले. असे क्षेत्ररक्षण क्चचितच पाहायला मिळते. या सामन्यामध्ये अजंता मेंडिसच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचा रामरनरेश सरवानने एक जबरदस्त फटका मारला. तो षटकार होता, परंतु, मॅथ्यूजने आपल्या क्षेत्ररक्षणाने षटकार वाचवला. श्रीलंकेने...
  September 14, 04:13 PM
 • पाल्लेकल - तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुस-या सामन्यात बाजी मारून बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या यजमान श्रीलंकेच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. विजयाचा मार्ग सुकर करण्याच्या प्रयत्नात असताना ऐनवेळी आलेल्या पावसामुळेच दुसरा कसोटी सामना अनिर्णीत झाला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या 1-0 च्या आघाडीत बरोबरी साधण्याचा लंकेचा प्रयत्न उधळला गेला. पाचव्या दिवसअखेर लंकेने 6 गडी गमावून 317 धावांची खेळी केली होती. या वेळी मॅथ्यूज व रधिंव ही जोडी खेळत होती.माजी कर्णधारांची भागीदारी व्यर्थ ! -...
  September 13, 05:31 AM
 • लंडन - इंग्लंड दौ-यावर असलेल्या टीम इंडियाइतकी दयनीय अवस्था सध्या दुस-या कोणाचीच नसेल. या दौ-याला सुरुवात झाल्यापासून भारतीय संघाला एकापाठोपाठ एक पराभवाला सामोरे जावे लागत आहे. वन डे मालिकेत 2-0 ने मागे पडलेल्या भारतीय संघाला रविवारी चौथ्या वन डेत इंग्लंड संघाला सामोरे जायचे असून, या लढतीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याचे प्रयत्न संघाचे असतील. लॉर्ड्सच्या मैदानावर ही लढत होत असून, या सामन्यात विजय मिळवून वन डे मालिकाही ताब्यात घेण्याच्या इराद्याने इंग्लंडचा संघ खेळ करील, अशी...
  September 11, 05:02 AM
 • साऊथम्पटन - सलामीच्या वन डे सामन्यातील शानदार खेळीची लय कायम ठेवत अजिंक्य रहाणेने दुस-याही सामन्यात आक्रमकतेचे प्रदर्शन केले; मात्र अचानक पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागलेल्या रहाणेला आगामी दोन वन डे सामन्यांत अजिंक्य खेळी करण्याचा विश्वास आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. सरावावर अधिक भर देत असल्याचेही तो म्हणाला. त्यामुळे आगामी एकदिवसीय सामन्यांत धुव्वाधार खेळी करण्याचे त्याचे मनसुबे असल्याचे दिसते.धोनी, सचिनचे मोलाचे...
  September 10, 05:19 AM
 • साऊथम्पटन - इंग्लंड दौ-यावर टीम इंडियाची सुमार कामगिरी अजूनही सुरूच आहे. कसोटी मालिका आणि टी-20 मध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आता वन डेतही भारताच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. पहिला वन डे पावसामुळे होऊ शकला नाही. मात्र, दुस-या वन डेतही पाऊससुद्धा भारताचा पराभव वाचवू शकला नाही. पावसाचा व्यत्यय आलेल्या दुस-या वन डेत इंग्लंडने टीम इंडियावर 7 गड्यांनी मात केली. इंग्लंडकडून कर्णधार अॅलेस्टर कुकने नाबाद 80 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळेच इंग्लंडने 188 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले....
  September 8, 04:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात