Home >> Sports >> From The Field

From The Field

 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी जेम्स बाँडचा चाहता आहे की नाही हे माहित नाही. मात्र, तो जेम्स बाँडचा नंबर असलेल्या ७ आकड्याचा मोठा चाहता आहे. आपली पत्नी साक्षीपेक्षा धोनी सात नंबरला अधिक महत्त्व देतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही ९ नंबरला आपल्यासाठी लकी मानतो.धोनी आपल्यासाठी ७ नंबर भाग्यवान असल्याचे मानतो. याची प्रचिती धोनीला अनेकवेळा आली आहे. विश्वकरंडकापूर्वी धोनीने एक करार सात तारेखालाच न करण्याचे ठरविले. त्याने यापूर्वी हा करार सात वर्षांसाठी सात तारखेला...
  July 5, 01:55 PM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांनी आपल्या वैवाहिक जीवनाचे एक वर्ष हसत-खेळत पूर्ण केले. शाळेपासून धोनीबरोबर असलेली साक्षी नंतर त्याच्या जीवनाची साथीदार झाली. धोनीच्या वैवाहिक जीवनातील काही क्षणांचा आढावा छायाचित्रांमध्ये...
  July 4, 09:07 PM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी यांच्या लग्नाचा आज (सोमवार) पहिला वाढदिवस आहे. वर्षभरापूर्वी धोनीने साक्षीबरोबर डेहराडून येथे गुपचुप लग्न केले होते. धोनीच्या आय़ुष्याची जोडीदार झालेल्या साक्षीचा स्वभाव चंचल आहे. लग्नापूर्वी साक्षी आपल्या मित्रांबरोबर पार्टीमध्ये मजा करीत असे. त्यावेळी साक्षी सिगारेट पण ओढत होती. साक्षीचे लग्नापूर्वी सिगारेट ओढतानाचे फोटो इंटरनेट विश्वात प्रसिद्ध झाले होते.
  July 4, 12:43 PM
 • नवी दिल्ली - आपल्या फिरकी गोलंदाजीने मैदानावर फलंदाजांना सळो की पळो करणारा भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंगचा मैदानाबाहेरही जलवा आहे. कधी विरोधी संघातील ऍण्ड्रयू सायमंड्स याच्याशी घातलेला वाद, तर कधी आपल्याच संघातील एस श्रीसंत मारलेली थप्पड. यामुळे हरभजन कायमच चर्चेत राहिला आहे. हरभजनच्या ३१ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या याच कारकिर्दीचे केलेले फोटोंमधून वर्णन...
  July 3, 03:01 PM
 • दिल्ली - येत्या 2१ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेसाठी खांद्याच्या दुखापतीने जर्जर असलेला वीरेंद्र सेहवाग अनफिट असल्याचे चित्र आहे. याच दुखापतीच्या कारणामुळे सेहवागचा इंग्लंड दौ-यातून पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठच खेळल्या गेलेल्या आयपीएल टी-20 स्पर्धेतील अति क्रिकेट सामन्यांमुळेच गंभीरपाठोपाठ वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण व श्रीसंत हे त्रिकूटही दुखापतीने त्रस्त होते. त्यामुळे विंडीज दौयातील वन-डे व कसोटी...
  July 2, 06:08 AM
 • नवी दिल्ली - भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने आज स्वत:ला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी फिट असल्याचे घोषित केले. इंग्लंडचा आगामी दौरा अतिशय महत्त्वपूर्ण असून, तेथील वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी आपण नव्या फलंदाजीच्या प्लॅनसह खेळण्यास सज्ज असल्याचे त्याने म्हटले आहे. इंडियन प्रीमिअर लीग-४ दरम्यान गंभीरच्या खांद्याला दुखापत झाली होती. आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय फलंदाजांसाठी मेंटल अॅडजेस्टमेंट महत्त्वाची असल्याचे तो म्हणतो. इंग्लंड दौऱ्यावर चेंडू अधिक स्विंग...
  July 1, 03:29 AM
 • मुंबई - भारत-श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये झालेली २०११ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भले यशस्वी झाली असेल; परंतु आयसीसीच्या हाँगकाँग येथील बैठकीत मात्र या स्पर्धेच्या यशापेक्षाही स्पर्धेदरम्यानच्या त्रुटींबाबत काळजी व्यक्त करण्यात आली. या त्रुटी लक्षात घेऊन आयसीसीच्या पुढील स्पर्धांदरम्यान कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आयसीसीच्या पुढील प्रत्येक स्पर्धेच्या सामन्यांच्या आयोजनाचे केंद्र किंवा स्टेडियम सहा महिने आधी...
  June 30, 04:51 AM
 • मेलबर्न - माजी कसोटी यष्टीरक्षक स्टेव रिक्सन हे आगामी श्रीलंका, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. माइक यंग यांच्या जागेवर रिक्सन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा रिक्सन यांनी केली होती. १३ कसोटी व ६ एकदिवसीय सामने रिक्सन यांनी ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळलेले आहेत. ८० च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे आघाडीचे कसोटी यष्टीरक्षक म्हणून स्टेव रिक्सन यांची ख्याती...
  June 29, 04:40 AM
 • ढाका - ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट लॉ यांची बांगलादेश क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वचषकात बांगलादेशच्या सुमार कामगिरीनंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने जुने प्रशिक्षक जेमी सिडन्स यांच्या कराराचे नूतनीकरण केले नाही. लॉ सध्या श्रीलंका संघाचे सहायक प्रशिक्षक असून, इंग्लंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील. यानंतर ते जुलैमध्ये बांगलादेश संघासोबत जॉइन होतील.
  June 28, 03:46 AM
 • ब्रिजटाऊन: पहिल्या कसोटीत टीम इंडियाकडून ६३ धावांनी पराभूत झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या यजमान वेस्ट इंडीज संघाने दुस-या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. संघाचा उपकर्णधार ब्रेंडन नॅश याला दुस-या सामन्यातून वगळण्याचा धक्कादायक निर्णय या वेळी घेण्यात आला.दुस-या कसोटी सामन्याला २८ जूनपासून ब्रिजटाऊन येथे प्रारंभ होणार आहे. जमैका येथे झालेल्या पहिल्या कसोटीत खेळू न शकलेला मार्लोन सॅम्युअल्स दुसया कसोटीत नॅशच्या जागी खेळण्याची दाट शक्यता आहे. सराव न करताना नॅशने भारताविरुद्ध...
  June 27, 04:12 AM
 • ब्रिस्टॉल -पाहुण्या श्रीलंका संघाने सलामीवीर जयवर्धने (७२) व कुमार संगकारा (४३) या जोडीच्या नाबाद खेळीच्या बळावर यजमान इंग्लंडचा टी-२० सामन्यात दारुण पराभव केला. १३७ धावांच्या प्रत्युत्तरात झंझावाती फलंदाजीचा सूर गवसलेल्या जयवर्धने-संगकाराने शानदार नाबाद अर्धशतकाची भागीदारी करून संघास ९ गडी राखून विजय मिळवून दिला.पाहुण्या श्रीलंकन संघाने टी-२० सामन्यात दणदणीत विजय संपादन करून आगामी वन-डे मालिकेतही बाजी मारण्याची झलक दाखवून दिली.
  June 27, 03:59 AM
 • किंग्सटन - पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्टइंडीजचा ६३ धावांनी पराभव केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयाची विक्रमांच्या यादीत नोंद झाली आहे.- महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाला १५ कसोटी सामने जिंकून देणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून भारताला सर्वाधिक २१ कसोटी सामने सौरव गांगुलीने जिंकून दिले आहेत.- प्रवीण कुमारे पहिल्यांदाच पहिल्या डावात ३८ धावांत ३ आणि दुसऱ्या डावात ४२ धावांत ३ बळी मिळविले. - मधल्या फळीतील भरवश्याचा...
  June 24, 09:33 AM
 • किंग्सटन - कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्टइंडीचा पहिल्या कसोटीत ६३ धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.भारताने वेस्टइंडीजसमोर विजयासाठी ३२६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडीजचा डाव २६२ धावांत आटोपला. भारताला प्रथमच वेस्टइंडीजमध्ये मालिकेतील पहिली कसोटी जिंकण्यात यश आले आहे. भारताच्या विजयात राहुल द्रविड, हरभजन सिंग, सुरेश रैना, प्रवीण...
  June 24, 09:08 AM
 • किंग्सटन - 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ३५ वे शतक झळकाविले. द्रविडने या सामन्यात एकमेव षटकार मारला. कसोटीत हा षटकार द्रविडने दोन वर्षांनंतर आणि २ हजार १९२ चेंडू खेळल्यानंतर मारल्याने तो खरच भारताची वॉल असल्याचे स्पष्ट होते.द्रविडने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत संयमाने फलंदाजी करीत अनेकवेळा भारतीय संघाचा डाव सावरला आहे. गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत १५१ कसोटी सामने खेळलेल्या द्रविडने फक्त १९ षटकार आणि १५३३ चौकार...
  June 23, 01:57 PM
 • कराची-निवृत्तीची घोषणा करून अवघे काही आठवडे झाले असताना आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आक्रमक खेळाडू शाहिद आफ्रिदी पुनरागमनाच्या तयारीला लागला आहे. संघ व्यवस्थापनासोबतचा वाद शांत होत असून, परिस्थिती सुधारत आहे. यामुळे मी राष्टीय संघात लवकरच पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे, असे आफ्रिदीने स्पष्ट केले. आज आफ्रिदी इंग्लंडचा कौंटी संघ हॅम्पशायरकडून खेळण्यासाठी रवाना झाला. त्या वेळी आपली आंतरराष्टीय क्रिकेट कारकीर्द अद्याप संपली नसल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानचा...
  June 23, 06:20 AM
 • किंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याला खेळपट्टीवर धावल्याने गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय गोलंदाजांनी वेस्टइंडीजचा पहिला डाव १७३ धावांत गुंडाळला. प्रवीण कुमारने तीन बळी मिळविले होते.वेस्टइंडीजच्या डावातील ५१ व्या षटकांत प्रवीण कुमारला पंचांनी गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यापूर्वी दोन वेळा त्याला इशारा देण्यात आला होता. पण, तिसऱ्या वेळेसही त्याने खेळपट्टीवरील धोकादायक भागात प्रवेश केल्याने पंच...
  June 22, 04:32 PM
 • किंग्सटन - भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात शून्यावर बाद होऊनही एक विक्रम निर्माण केला. फलंदाजीत अपयश आले असले तरी त्याने यष्टीरक्षण करताना ही विक्रम नोंदविला.वेस्टइंडीजचा फलंदाज डॅरेन ब्राव्हो याचा प्रवीणकुमारच्या गोलंदाजीवर झेल घेऊन धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये १५० झेल घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा धोनी भारताचा दुसरा यष्टीरक्षक ठऱला आहे. यापूर्वी सैयद किरमाणी यांनी ८८ कसोटींमध्ये १६० झेल घेण्याची कामगिरी केली आहे....
  June 22, 01:11 PM
 • औरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलात अॅथलेटिक्स ट्रॅकचे बांधकाम होण्यापूर्वीच २ एप्रिल २००९ रोजी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेने अचूक ट्रॅकसाठी लेखी सूचना संकुल समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्या सूचनेला क्रीडा खात्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आणि मातब्बरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चुकीचा ट्रॅक बांधण्यात आला.या चुकीच्या ट्रॅकमुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असला तरीही विभागीय क्रीडा संकुल समिती अद्याप या चुकीची जबाबदारी...
  June 22, 05:54 AM
 • वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. अभिनव मुकुंद, विराट कोहली आणि प्रवीण कुमार या तिघांनी एकत्रित संघात प्रवेश केल्याने सुमारे दहा वर्षांनंतर भारतीय संघात एकाचवेळी तीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे.अभिनव मुकुंद याने आतापर्यंत भारतासाठी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. तर विराट कोहलीने ५९ व प्रवीण कुमारने ५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताकडून कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत मुकुंद २६८ वा, विराट २६९ वा आणि प्रवीण २७० वा खेळाडू...
  June 21, 12:42 PM
 • मुंबई- श्रीलंका प्रीमियर लीग (एसएलपीएल) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेटपटू न पाठवण्याच्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामागे खेळाडूंची सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. बीसीसीआयच्या पदाधिकार्याने या संदर्भात दिव्य मराठीशी बोलताना सांगितले, भारतीय क्रिकेट बोर्डाला खेळाडूंसोबत करण्यात येणारा करार हा त्रिमार्गी करार असावा असे वाटते. खेळाडू खेळणार ती फ्रँचायझी, र्शीलंका बोर्ड आणि खेळाडू यांच्यात हा करार असावा अशी अपेक्षा बीसीसीआयची आहे. नेमकी हीच गोष्ट एसएलपीएलमधून गायब आहे. खेळाडूंशी...
  June 21, 05:55 AM
 
जाहिरात

RECOMMENDED