जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • कॅनबेरा- ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या सराव सामन्यात निराशाजनक प्रदर्शन केले. परंतु, फलंदाजांनी टीमला दिलासा दिला. विशेष म्हणजे सचिन चांगलाच फॉर्मात दिसला. सचिनने क्रिकेट ऑस्ट्रेलिया चेअरमन्सविरूद्धच्या दोन दिवसीय सामन्यात दुस-या दिवशी 92 धावा ठोकल्या. यावेळेस लक्ष्मण आणि रोहित शर्माने देखील चांगली खेळी खेळली. फोटोमध्ये पाहा पहिल्या सराव सामन्याची काही खास दृश्ये...
  December 17, 11:35 AM
 • कॅनबेरा- ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या टीम इंडियाच्या पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया चेअरमन्स इलेव्हनने पहिल्या दिवशीचा खेळ संपताना आपला पहिला डाव सहा गडयांच्या बदल्यात 398 धावांवर घोषित केला. रॉबिन्सन आणि कूपरच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन चेअरमन्स इलेव्हनने टीम इंडियासमोर मजबूत लक्ष्य ठेवले. टीम इंडियाकडून उमेश यादवने सर्वात जास्त विकेट मिळवल्या. त्याने तीन गडी बाद केले. त्याशिवाय प्रग्यान ओझाने दोन विकेट आणि विनय कुमारने एक विकेट घेतली. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून...
  December 15, 11:05 AM
 • सध्या चर्चेत असलेला अजित आगरकर एकेकाळी टीम इंडियाचा स्टार खेळाडू होता. त्याने गोलंदाजीबरोबर फलंदाजीमध्येही अनेक विक्रम केले आहेत. अकरा वर्षापूर्वी आजच्या दिवशीच आगरकरने एक कारनामा केला. झिम्बाब्वे विरूद्वच्या सामन्यात त्याने फक्त 21 चेंडूमध्ये अर्धशतक लगावले होते. अनेक वर्षांपासून अबाधित असलेला कपिल देवचा विक्रम त्याने मोडला. कपिल देवने 22 चेंडूमध्ये अर्धशतक लगावले होते. या खेळीत त्याने चार षटकार आणि सात चौकार मारले.अजित आगरकरची ती शानदार खेळी पाहा या व्हिडिओमध्ये...सौजन्य: दूरदर्शन...
  December 14, 03:18 PM
 • चेन्नई- चिंदबरम स्टेडियममध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा 34 धावांनी जरी पराभव केला असला तरी, एकावेळेस किरॉन पोलार्डच्या फलंदाजीने सगळयांचाच श्वास रोखला गेला होता. एका बाजूने विंडीजचे फलंदाज मैदानात हजेरी लावून जाण्याचे काम करत होते तर दुस-या बाजूने पोलार्ड षटकारांची आतषबाजी करीत होता.पहिला विक्रमआक्रमक फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेल्या पोलार्डने आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करताना 119 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्याने तब्बल 10 गगनचुंबी षटकार लगावले. भारताविरूध्द 10 षटकार मारणारा तो...
  December 12, 07:38 PM
 • चेन्नई- टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीजचा 34 धावांनी पराभव करून एकदिवसीय मालिका 4-1 ने जिंकली. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मनोज तिवारीचे पहिले शतक आणि विराट कोहलीच्या 18 व्या अर्धशतकाच्या जारोवर टीम इंडियाने 50 षटकात सहा गडयांच्या बदल्यात 267 धावा बनवल्या. उत्तरादाखल विंडीजचा 44.1 षटकात 233 धावांवर संपुष्टात आला. तिवारीने शानदार 104 धावा बनवल्या. जायबंदी झाल्यामुळे त्याला लवकरच तंबूत परतावे लागले. कोहलीने 80 धावा बनवल्या. वेस्ट इंडीजकडून पोलार्डने 119 धावा बनवलया....
  December 12, 03:35 PM
 • नवी दिल्ली- टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युवराज सिंहने आज आपल्या वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या 11 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक विक्रमांना आपल्या कवेत घेतले आहे. 12 डिसेंबर 1981 मध्ये चंदीगडमध्ये जन्मलेल्या युवराज सिंहने भारताला 2011 चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 ऑक्टोबर 2000 रोजी पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीत त्याने अनेक यशाची शिखरे काबीज केली. युवराजने 274 एकदिवसीय सामन्यातील 252 डावात 8051 धावा बनवल्या आहेत....
  December 12, 02:03 PM
 • होबार्ट- न्यूझीलंडने अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सात धावांनी पराभव करून दुसरी कसोटी जिंकली आहे. 1985 नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभवाचे पाणी पाजले आहे. किवी संघाने ऑस्ट्रेलियाचे शेवटचे आठ गडी फक्त 74 धावांत तंबूत धाडले.ऑस्ट्रेलियाला दुस-या डावात जिंकण्यासाठी 241 धावांची आवश्यकता होती आणि त्यांचा संघ दोन गडयांच्या बदल्यात 159 धावा अशा मजबूत स्थितीत होता. परंतु, जलद गोलंदाज डग ब्रासवेलच्या वादळासमोर डेव्हिड वॉर्नर (नाबाद 123) वगळता एकही...
  December 12, 11:09 AM
 • चितगाव- सलामी कसोटीच्या पहिल्या डावात बांगला देशला 135 धावांवर गुंडाळणा-या पाकने हाफिझ (143) व युनूस (96) व शफिक (40) या जोडीच्या बळावर 4 बाद 415 धावांची खेळी केली. पहिल्या डावात मैदानावरआव्हान टिकून शतकी भागीदारी करणा-या युनूस व शफिकच्या खेळीतून पाकने 280 धावांची आघाडी मिळवली आहे. मोठ्या धावसंख्येसाठी प्रयत्नशील असलेल्या पाकच्या हाफिझ व मिसबाह या जोडीला इलियस सनीने बाद करून बांगलदेशला महत्त्वाचे योगदान दिले. चितगाव येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पाकने पहिल्या डावात बांगलादेशला 135 धावांवर मैदान...
  December 11, 01:30 AM
 • होबार्ट- पहिल्या डावात 150 धावांवर तंबू गाठणा-या न्यूझीलंडने बोउल्ट (3/29), ब्रेसवेल (3/20) व (3/49) या त्रिकुटाच्या भेदक गोलंदाजीतून ऑस्ट्रेलियाला 136 धावांवर बेचिराख केले. त्यामुळे मोठ्या आघाडीचे कांगारू संघाचे स्वप्न धुळीत मिळवत किवीने दुस-या डावात 3 बाद 139 धावांची खेळी केली. टेलर (42) व विल्यमसन (34) या जोडीच्या खेळीतून किवीने ऑस्ट्रेलियावर 153 धावांनी आघाडी घेतली. सलामीचा कसोटी सामना गमावल्यामुळे मालिकेतील अस्तित्व राखून ठेवण्यासाठी न्यूझीलंड संघ अधिक अडचणीत सापडला. त्यामुळे दुस-या कसोटी सामन्यात...
  December 11, 01:26 AM
 • चितगाव- कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकच्या सलामीवीर मोहम्मद हाफिझ (74) व तौफिक उमर (53) या जोडीच्या नाबाद स्फोटक फलंदाजीमुळे बागंलादेशची चांगली दमछाक झाली.मोठ्या धावसंख्येच्या प्रयत्नात असलेल्या बांगलादेशचा सईद अजलम (3/40) व रेहमान (3/9) या जोडीच्या भेदक गोलंदाजीने 135 धावांवर धुव्वा उडाला. घातक गोलंदाजीमुळे सपाटून मार खाल्लेल्या बांगलादेशच्या गोलंदाजीला फोडून काढत पाकच्या सलामी जोडीने नाबाद शतकी भागीदारीचे प्रदर्शन केले. पहिल्या दिवसा अखेर पाकने बिनबाद 132 धावांची खेळी केली. हाफिझ व...
  December 10, 01:06 AM
 • होबार्ट- पदार्पणाच्या कसोटी सामन्यात भेदक गोलंदाजीने शानदार 9 विकेट घेण्याची कामगिरी करणा-या ऑस्ट्रेलियाच्या पॉटिसनने पुन्हा घातक खेळीचे प्रदर्शन केले. शानदार पाच विकेट काढून पॉटिसनने किवीला पहिल्या डावात 150 धावांवर गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. मालिकेतील दुस-या कसोटीत विजयाचा लय गवसण्याच्या प्रयत्नात असलेल्या न्यूझीलंडला पॉटिसन(5/51)पाठोपाठ सिडल (3/42) व स्टार्क (2/30) ही जोडी अधिक डोकेदुखी ठरली. त्यामुळे पहिल्या दिवसात खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 4.2 षटकात 1 गडी गमावून 12...
  December 10, 12:56 AM
 • नाशिक- गुरुवारला द्विशतकाच्या धमाक्याने विश्व विक्रमाला गवसणी घालणा-या वीरूच्या खेळीला जालन्याच्या विजय झोल याने सलामी दिली. 19 वर्षाखालील कुचबिहार करंडकमध्ये आसामविरुद्ध नाबाद 451 धावांची स्फोटक फलंदाजी करून विजय झोलने नव्या विक्रमाची नोंद केली. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर खेळल्या जात असलेल्या 19 वर्षाखालील कुचबिहार करंडक (ग्रुप-अ) स्पर्धेत महाराष्ट्राने चार बाद 763 वर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल आसामने दुपारनंतर एक बाद 57 धावा केल्या. अनंत कान्हेरे मैदानावर...
  December 10, 12:50 AM
 • ग्वाल्हेरला 24 फेब्रुवारी 2010 रोजी सचिन तेंडुलकरने इतिहास घडविला होता. वन डे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकाविणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्याचा विक्रम विरेंद्र सेहवागने इंदूरमध्ये काल मोडला. परंतु, आपला विक्रम वीरुच मोडेल असे भाकीत सचिनने द्विशतक ठोकले तेव्हाच वर्तविले होते. सचिनचे शब्द वीरुने खरे ठरविले. विरेंद्र सेहवाग अतिशय आक्रमक फलंदाजी करतो. तो 45-47 षटकांपर्यंत टिकल्यास माजा विक्रम सहज मोडू शकतो, असे सचिन तेव्हा म्हणाला होता. विशेष म्हणजे, फलंदाजीमध्ये सेहवाग अनेक बाबतीत...
  December 9, 12:59 PM
 • इंदूर- अविस्मरणीय, अद्भुत आणि क्रिकेटच्या फटकेबाजीचा अत्युच्च आनंद काय असतो, याची अनुभूती आज वीरेंद्र सेहवागच्या झंझावाती वनडे द्विशतकाच्या रूपाने लाखो चाहत्यांनी घेतली. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना पायदळी तुडवीत सेहवागने आज वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च 219 धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने चौथ्या वनडेत 419 धावांचा डोंगर उभा केला. प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या होळकर स्टेडियमवर सेहवागने इतिहास रचून भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदात...
  December 9, 02:10 AM
 • इंदूर- वीरेंद्र सेहवागच्या वादळी द्विशतकी खेळीने विजयासाठी दिलेल्या 419 धावांचा पाठलाग करणाया पाहूण्या विंडीजला 265 धावांवर रोखून भारताने मालिका विजयाचा डबल बार उडवला. चौथ्या वन डे सामन्यात संघाच्या विजयासाठी तळातल्या रामदीनने एकतर्फी 96 धावांची शर्थीची झुंज दिली. मात्र, राहुल शर्मा (3/43), जडेजा (3/34) च्या घातक गोलंदाजीने विंडीजचे विजयाचे मनसुबे उधळून लावले. विंडीजवर 153 धावांनी मात करणा-या भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली आहे. मालिकेतील अखेरचा सामना आता चेन्नईला होणार आहे.विजयाच्या मोठ्या...
  December 9, 02:00 AM
 • इंदूर: होळकर स्टेडियमवर भारतीय विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या तूफानी द्विशतक (219)आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा, राहुल शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 153 धावांनी विजय मिळविला आहे. या विजयासह भारतीय संघाने विंडिजविरुद्धच्या पाच एदिवसीय सामन्यांच्या मालिका खिशात घातली आहे. भारत आणि विंडिज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील हा चौथा सामना होता. भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 50 षटकांत 419 धावांचे तगडे आव्हान दिले आहे. सेहवागने...
  December 8, 07:39 PM
 • भारतीय संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने इंदूर येथील होळकर स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकून सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम केला.
  December 8, 06:42 PM
 • अहमदाबाद- रोहित शर्माच्या 95 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामन्यात आशा पल्लवित केल्या होत्या. तो बाद झाल्यानंतरही मिथूनने दोन षटकार खेचून सामन्यांत रंगत आणली. मात्र, त्याला यश मिळू शकले नाही. अखेर रोमांचक लढतीत भारताला तिस-या वनडेत विंडीजकडून 16 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. विंडीजचा मालिकेतील हा पहिला विजय ठरला. मार्लोन सॅम्युअल्सचे अर्धशतक (58) आणि अखेरच्या क्षणी कर्णधार डॅरेन सॅमी (नाबाद 41) व आंद्रे रसेल (नाबाद 40) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर वेस्ट इंडीजने येथे सुरू...
  December 6, 03:29 AM
 • ब्रिस्बेन- पदार्पणाच्या कसोटीत जेम्स पेंटिसन (5/27) याने केलेल्या घातक गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या कसोटीत 9 गड्यांनी न्यूझीलंडवर मात केली. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 12 धावांच्या खेळीतून विजयाचे 19 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले. पेंटिसन आणि लॉयनच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 427 धावांच्या खेळीसह महत्वूपर्ण 139 धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाचा दुस-या डावात अवघ्या 150 धावांत धुव्वा...
  December 4, 11:41 PM
 • विशाखापट्टनम- भारत- वेस्ट इंडीज यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दुसरा एकदिवसीय सामना कमालीचा रोमांचक झाला. पहिल्यांदा भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. विंडीजचा तळाचा फलंदाज रवि रामपॉल याने जबरदस्त फलंदाजी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. भारतीय फलंदाजांनी सुध्दा निराशजनक सुरूवात केली. परंतु, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शानदार खेळीने टीम इंडियाच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका निभावली.विराटने शानदार फलंदाजी करताना कारकीर्दीतील आठवे शतक लगावले...
  December 3, 01:55 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात