जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • औरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलात अॅथलेटिक्स ट्रॅकचे बांधकाम होण्यापूर्वीच २ एप्रिल २००९ रोजी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेने अचूक ट्रॅकसाठी लेखी सूचना संकुल समितीचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्या सूचनेला क्रीडा खात्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आणि मातब्बरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चुकीचा ट्रॅक बांधण्यात आला.या चुकीच्या ट्रॅकमुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला असला तरीही विभागीय क्रीडा संकुल समिती अद्याप या चुकीची जबाबदारी...
  June 22, 05:54 AM
 • वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले. अभिनव मुकुंद, विराट कोहली आणि प्रवीण कुमार या तिघांनी एकत्रित संघात प्रवेश केल्याने सुमारे दहा वर्षांनंतर भारतीय संघात एकाचवेळी तीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे.अभिनव मुकुंद याने आतापर्यंत भारतासाठी एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. तर विराट कोहलीने ५९ व प्रवीण कुमारने ५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारताकडून कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत मुकुंद २६८ वा, विराट २६९ वा आणि प्रवीण २७० वा खेळाडू...
  June 21, 12:42 PM
 • मुंबई- श्रीलंका प्रीमियर लीग (एसएलपीएल) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेटपटू न पाठवण्याच्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निर्णयामागे खेळाडूंची सुरक्षितता हे मुख्य कारण आहे. बीसीसीआयच्या पदाधिकार्याने या संदर्भात दिव्य मराठीशी बोलताना सांगितले, भारतीय क्रिकेट बोर्डाला खेळाडूंसोबत करण्यात येणारा करार हा त्रिमार्गी करार असावा असे वाटते. खेळाडू खेळणार ती फ्रँचायझी, र्शीलंका बोर्ड आणि खेळाडू यांच्यात हा करार असावा अशी अपेक्षा बीसीसीआयची आहे. नेमकी हीच गोष्ट एसएलपीएलमधून गायब आहे. खेळाडूंशी...
  June 21, 05:55 AM
 • कोलंबो - गत मार्च महिन्यात झालेल्या विश्वषचक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात डोंपिंग करणार्या विपुल थरंगा आता आयसीसीच्या जाळ्यात अडकला आहे. लवकरच विपुलवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयसीसीने दिले आहेत. डोंपिग टेस्ट पॉझिटिव्ह असल्यामुळेच थरंगावर आयसीसीने कारवाईचा बडगा उगारण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच लवकरच विपुल थरंगा कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
  June 21, 05:50 AM
 • नवी दिल्ली - भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी जोरदार सराव करताना दिसत आहे. सुमारे एक आठवडा आराम केल्यानंतर युवराज पुन्हा मैदानावर उतरला आहे.युवराजने ट्विटरवर लिहिले आहे की, गेल्या एक महिन्यापासून घेतलेल्या आरामानंतर मैदानावर घाम गाळताना चांगले वाटत आहे. मी आता संघात पुनरागमनासाठी तयार आहे. युवराजने न्यूमोनियामुळे वेस्टइंडीज दौऱ्यातून माघार घेतली होती. भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, चार सामन्यांची कसोटी मालिका २१...
  June 20, 07:47 PM
 • दुबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यात आराम करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परीणाम त्याच्या कसोटी क्रमवारीवर होणार आहे. वेस्टइंडीजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात खेळत नसल्याने त्याच्याबरोबर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला जॅक कॅलिस पहिल्या स्थान मिळविणार आहे.येत्या पंधरा दिवसांत कोणताही सामना खेळणार नसल्याने सचिनच्या क्रमवारीवर परीणाम होणार आहे. गेल्या वर्षी आयसीसीकडून देण्यात येणारा क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. सचिनचे दुसरे स्थानही...
  June 20, 04:19 PM
 • सबिना: सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच गोलंदाजीसाठी घातक असलेली खराब खेळपट्टी असल्याचे दिसून येताच भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर मैदान समितीवर जाम भडकले. मैदान चांगले असल्याचा दावा करणा-या विंडीज क्रिकेट बोर्डाच्या टेक्निकल समितीच्या अधिका-यांनाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले. आज, सोमवारपासून भारत विरुद्ध यजमान विंडीज यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याच्या सरावासाठी मैदानावर जमले असतानाच प्रशिक्षक डंकन यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळेच...
  June 20, 04:30 AM
 • किंगस्टन: सोमवारपासून कसोटी क्रमवारीतील नंबन वन टीम इंडियाला यजमान वेस्ट इंडीजचे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आव्हान असेल. वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाया खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. गोलंदाजांची तंदुरुस्ती भारतासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. विश्वचषक आणि आयपीएलच्या धूमधडाक्यानंतर महेंद्रसिंग धोनी ब्रेक घेऊन पुन्हा संघात परतला आहे. धोनीशिवाय भारतीय भिंत राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघात परतल्याने टीम इंडियाची फलंदाजी मजबूत झाली...
  June 20, 04:23 AM
 • नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये कोणत्याही संघातील खेळाडू आपल्या संघाला विजयी करण्यासाठी कायम प्रयत्न करीत असतात. कधी-कधी क्षेत्ररक्षक एक-दोन धावा वाचविण्यासाठी सर्वस्व झोकून देतात. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने वेस्टइंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात चौकार वाचविण्यासाठी असे क्षेत्ररक्षण केले की, प्रेक्षक बघतच राहिले. सीमारेषेवर थांबलेल्या मॅथ्यूजने सुरवातीला चौकार वाचविण्यासाठी झेल घेण्याचा प्रय़त्न केला. सीमारेषेबाहेर पडणाऱ्या चेंडूला त्याने हाताने उडवून पुन्हा...
  June 19, 06:38 PM
 • नवी दिल्ली - आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी (यूडीआरएस) वापरण्यात प्रणालीला विरोध करण्यावर बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी ललित मोदी सध्या लंडन येथे राहत आहेत. ललित मोदींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला याबाबत कठोर पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. मोदी यांनी आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे की, यूडीआरएस प्रणाली विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान विश्वासार्ह ठरली होती आणि आता तिचा वापर पूर्णपणे व्हायला हवा. अन्यथा,...
  June 19, 05:09 PM
 • मुंबई : श्रीलंका प्रीमियर लीग या बहुचर्चित क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट बोर्डाकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमी दिसते. येत्या १८ जुलैपासून श्रीलंकेत होणा-या या प्रीमियर लीग स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाला अद्याप कोणतीही माहिती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना सहभागी होऊ देण्याची परवानगी देण्याबाबत क्रिकेट बोर्ड सध्या फारसे उत्सुक नाही. आज मुंबईत आय. पी. एल. संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोर्डाचे...
  June 19, 05:20 AM
 • किंगस्टोन: येत्या २० जून रोजी होत असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी धोनी, द्रविड, लक्ष्मणसह सर्वच खेळाडू नेटवर सराव करताना दिसून आले. मात्र, यामध्ये मुनाफ दिसत नव्हता. त्यामुळेच पहिल्या सामन्यात मुनाफला विश्रांती देण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट होते आहे. एकदिवसीय मालिकेतील देदीप्यमान यशानंतर मायदेशात विंडीजला कसोटी मालिकेतही पराभवाची धूळ चारण्याची आशा भारतीय संघ बाळगून आहे. कर्णधार महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाया भारतीय संघाचे...
  June 19, 05:10 AM
 • बॉलीवूड अभिनेत्री गीता बसरा हिला चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी, प्रत्यक्ष जीवनात मात्र तिला भरपूर यश मिळत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगची गीताला योग्य साथ मिळत असून, तिने ग्लॅमर जग सोडले तरी तिला फरक पडणार नाही. या दोघांमध्ये असलेल्या संबंधांबद्दल सुरु असलेल्या चर्चा खऱ्या असल्याचे स्पष्ट होत आहे.काही दिवसांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय संघातील सर्व सदस्यांचा ग्रुप फोटो घेण्यात...
  June 18, 01:35 PM
 • नवी दिल्ली - पाकिस्तान क्रिकेट मंडळाशी घातलेल्या वादानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या शाहिद आफ्रिदी यापुढे मैदानावर दिसेल की नाही हे कोणालाच माहित नाही. उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला आफ्रिदी मैदानावरही तेवढाच आनंद लुटतो. एका एकदिवसीय सामन्यात आफ्रिदीने प्रतिस्पर्धी गोलंदाज जॅक कॅलिस याला फ्लाईंग किस दिला होता. तर एकदा संघातील खेळाडूंचे प्रदर्शन पाहून आफ्रिदीने शोएब मलिक आणि कामरान अकमल यांचा किस घेतला होता. त्यामुळे आफ्रिदी पाकिस्तान...
  June 17, 04:56 PM
 • नवी दिल्ली - वेस्टइंडीजमंडळाने ख्रिस गेलवर केलेल्या कारवाईमुळे त्याचे भविष्य संकटात सापडले आहे. गेलचे हे प्रकरणी पाहता अशीच कारवाई करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍण्ड्रयू सायमंड्स याची आठवण येते. गेल प्रमाणेच सायमंड्स आडमुठ्या वागण्यामुळे संघाबाहेर झाला होता.सुरवातीला बांगलादेश दौऱ्यावेळी संघाची बैठक सोडून मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सायमंड्सला संघाबाहेर जावे लागले होते. यानंतर त्याची भारत दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव...
  June 17, 12:27 PM
 • किंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताचा वेस्टइंडीजने 7 गडी राखून पराभव केला. यामुळे शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताला सलग पराभव स्वीकारावा लागला. रामनरेश सरवन आणि डैरन ब्रावो या दोघांच्या अर्धशतकी खेळीचा वेस्टइंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता.भारताने वेस्ट इंडिजसमोर 251 धावांचे आव्हान उभे केले, परंतु वेस्ट इंडिजने 8 चेंडू शिल्लक ठेवत 3 विकेटवर 255 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर...
  June 17, 10:04 AM
 • किंग्सटन - वेस्टइंडीजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळविला. गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताचा वेस्टइंडीजने 7 गडी राखून पराभव केला. यामुळे शेवटच्या दोन्ही सामन्यात भारताला सलग पराभव स्वीकारावा लागला. रामनरेश सरवन आणि डैरन ब्रावो या दोघांच्या अर्धशतकी खेळीचा वेस्टइंडीजच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. भारताने वेस्ट इंडिजसमोर 251 धावांचे आव्हान उभे केले, परंतु वेस्ट इंडिजने 8 चेंडू शिल्लक ठेवत 3 विकेटवर 255 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर...
  June 17, 08:41 AM
 • नवी दिल्ली - मैदानावर प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाचा आनंद घेत असतो. तसेच मैदानावरील प्रेक्षकांचाही चौकार किंवा षटकार मारल्यावर मनोरंजन होत असते. मात्र, कधीकधी प्रेक्षकांतील काहीजण खेळाडूंना घायाळ करतात. पाकिस्तानविरुद्ध कोलकता येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज झहीर खानच्या बाबतीतही असेच काही झाले. त्यामुळे झहीरही हैराण झाला होता. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलीने झहीर आय लव यू असे पोस्टर लिहून आणले होते. कॅमेरा त्या मुलीवर गेल्यावर ती लाजली. ड्रेसिंग...
  June 16, 01:10 PM
 • मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज काल क्रिकेट सोडून वेगळ्याच गोष्टीत व्यस्त आहे. तो इतका व्यस्त आहे की, त्याला दुसऱ्यांना फोन करण्यासही वेळ मिळत नाही.माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार सचिन सध्या आपल्या स्वप्नातील घरात रहायला जाणार आहे. पैरा क्रॉस रोडवर असलेल्या या बंगल्यात सचिन लवकरच रहायला जाणार आहे. सचिनच्या या घराची रचना वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. बाहेरून हे घर तीन मजली दिसते, पण आत गेल्यावर पाच मजली असल्याचे कळून येते. सचिनने बंगल्यात आपल्या कारकिर्दीत...
  June 15, 03:25 PM
 • कराची - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिलासा दिला आहे. पीसीबीने आफ्रिदीला कौंटी क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. पण, आफ्रिदीला सिंध न्यायालयात पीसीबीविरुद्ध दाखल केलेली याचिका मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. आफ्रिदीने असे केले तर त्याला ना हरकर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पीसीबी आणि आफ्रिदी यांच्यात वेस्टइंडीज दौऱ्यापासून वाद सुरु आहे. प्रशिक्षक वकार युनूस यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने आफ्रिदीची कर्णधारपदावरून हाकलपट्टी करण्यात आली...
  June 15, 02:30 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात