जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहायक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात येऊन वेस्ट इंडीज दौर्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती करून घेतली. दौर्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज लागेल हे त्यांनी स्पष्ट केले. डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहप्रशिक्षक ट्रेव्हर पेनी (फिल्डिंग कोच) यांनी आज क्रिकेट सेंटरमध्ये येऊन बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांची भेट घेतली.
  May 31, 01:28 PM
 • मेलबर्न - यंदाच्या चौथ्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून चमकदार कामगिरी करणार्या शेन वॉर्नचा सर्वोत्कृष्ट महान पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे. यातूनच मेलबर्न क्रिकेट क्लबच्या एमसीजी मैदानावर शेन वॉर्नचा मोठा पितळाचा पुतळाही बसवला जाणार आहे.41 वर्षीय शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एमसीजीला भेट दिली. यावेळी मूर्तिकार लुई लामेन यांची वॉर्नने भेट घेतली. आयपीएलसह 145 कसोटी सामन्यात 708 बळीचा विश्वविक्रम करणार्या...
  May 31, 01:12 PM
 • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघातून नाव मागे घेतल्यानंतर कसोटीतूनही माघार घेतली आहे. सचिनने दुखापतीचे कारण दिले असले तरी, प्रत्यक्षात त्याची माघार घेण्याचे कारण सचिनच्या मुलांनी सुट्टी आपल्या बरोबर घालविण्याचे सचिनला सांगितल्याने त्याने या दौऱ्यातून माघार घेतली आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, मी परिवारासोबत वेळ घालवायचा आहे. खासकरून मुलांबरोबर राहून मला मजा लुटायची आहे. मुलांबरोबर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मला...
  May 31, 12:01 PM
 • मुंबई - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज झहीर खान हा आपल्या केसांच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध आहे. विश्वकरंडकादरम्यान झहीरने आपले केस ब्राउन आणि ब्लॉन्ड केली होती. झहीरने आपल्याला लहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, पण आता मी केसांच्या विविध स्टाईल करण्यास मोकळा असल्याचे म्हटले आहे.मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना झहीरने हा खुलासा केला आहे. केसांना लावण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या कलरच्या एका कंपनीने त्याला आमंत्रित केले होते. झहीरने या कार्यक्रमात अनेक जणांची केस रंगविले. झहीर...
  May 30, 08:37 PM
 • कोलंबो - इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला झटका बसण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगाने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची आयसीसीकडून चौकशी करण्यात येणार आहे.थरंगा प्रेडनिसोलोन हे औषध घेताना दोषी आढळला आहे. मात्र, संडे टाईम्स या वृत्तपत्रात थरंगाने हे उत्तेजक द्रव डॉक्टरांनी सांगितल्यामुळे घेतल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयसीसी या प्रकरणाची लवकरच चौकशी सुरु करणार असून, विश्वकरंडकावेळी...
  May 29, 04:44 PM
 • मुंबई - 'आयपीएलची' झिंग बऱ्यापैकी उतरली आहे, असे गेल्या ४५ दिवसांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट, सामन्यातून झालेले उत्पन्न आणि ढासळलेल्या टीआरपीवरून दिसून आले आहे. 'टॅम' स्पोटर्स मीडिया रिसर्च या संस्थेने आयपीएल चारच्या टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा निष्कर्ष जाहीर केला आहे. भारतात झालेल्या क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २८ (आयपीएल १) मध्ये व २१ मध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरघोस पाठिंबा दर्शविला होता. 'टॅम'च्या टीआरपी पाहणीच्या...
  May 29, 02:20 AM
 • कराची - गत महिन्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारल्याच्या घटनेमुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकमधील विविध क्षेत्रावर लादेनला ठार मारल्याच्या घटनेचा विपरीत परीणाम पडला आहे.याच वाढत्या दहशतवादी कारवायामुळेच पाकिस्तानातील क्रिकेटही धोक्यात आले आहे. स्थानिक परिसरात वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळेच एकदिवसीय सामन्यांसाठी पाक दौऱ्यावर येत असलेल्या श्रीलंका संघाने नकार दिला आहे.त्यापाठोपाठच आयर्लंड संघाचा दौराही अद्याप स्पष्ट झालेला नाही.त्याआधीच इंग्लंड संघाने...
  May 28, 07:17 PM
 • नवी दिल्ली - भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्यास महत्त्व दिल्याचे आरोप होत असताना गंभीरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत मी हिच दुखापत घेऊन खेळलो होतो. तेव्हा कोणी माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नव्हेत, मग आताच का अशी सडेतोड भूमिका गंभीरने व्यक्त केली आहे.गंभीर म्हणाला, मी देशाकडून खेळण्यास कायमच प्राधान्य दिले आहे. मला माहित नव्हते की माझी दुखापत एवढी गंभीर असेल. या दुखापतीकडे दुर्लक्ष करून मी विश्वकरंडक...
  May 27, 04:56 PM
 • आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टवेंटी-२० बिग बैश स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. गिलख्रिस्टने या स्पर्धेत खेळण्यास आपल्याजवळ वेळ नसल्याचे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजक चिंता व्यक्त करीत आहेत. या स्पर्धेला यशस्वी बनविण्यासाठी आता विदेशी खेळाडूंना सहभागी करण्यात येणार असून, स्पर्धेची जोरदार प्रसिद्धी करण्यात येणार आहे....
  May 27, 12:05 PM
 • मुंबई - 'बाजीगर' चित्रपटचा नायक शाहरुख खानच्या कोलकता नाईट रायडर्स संघाला नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाने ४ गड्यांनी पराभवाचा धक्का दिला. बिल्झर्ड (५१) आणि सचिन तेंडुलकरची (३६) शानदार फलंदाजी, सोबत मुनाफच्या भेदक माऱ्याच्या बळावर आपणच 'बाजीगर' असल्याचे मुंबईने सिद्ध केले. हरभजनसिंगने (नाबाद ११) सकिबूलच्या गोलंदाजीवर शानदार षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकत्याने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य मुंबईने अखेरच्या षटकात गाठले.तत्पूर्वी, कोलकता नाईट रायडर्सकडून टेन डोयस्चेत...
  May 26, 05:45 PM
 • ऑकलंड - न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटसाठी पुनरागमनाचा विचारात आहे. स्वयंप्रेरणा मिळावी, तंदुरुस्त राहता यावे आणि प्रथमश्रेणीतील वीस हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 392 धावा करणे असे त्याचे उद्देश आहेत. त्याच्या निवृत्तीला 15 वर्षे उलटली आहेत. मार्टिन क्रो आधी कॉर्नवॉल क्लबकडून खेळणार आहे. त्यानंतर तो ऑकलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळण्याचा निर्णय घेईल. मार्टिन क्रो याने सांगितले की, तुम्ही सतत भरकटत...
  May 23, 03:34 PM
 • नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघ विश्वकरंडक पात्रता फेरीतील पहिल्या लढतीपूर्वी दोन सराव सामने खेळेल. विश्वकरंडक पात्रता सामन्यात भारताची संयुक्त अरब अमिरातीशी लढत आहे. 23 जुलै रोजी अमिरातीत; तर 28 जुलै रोजी भारतात सामना होईल. त्याआधी मालदीवविरुद्ध 10 जुलैला; तर कतारविरुद्ध 17 जुलैला भारत मित्रत्वाचे सामने खेळेल. दोन्ही सामने परदेशात होतील. जागतिक क्रमवारीत अमिरातीचा 111वा; तर भारताचा 145वा क्रमांक आहे. राष्ट्रीय संघाचे संचालक तथागत मुखर्जी यांनी सांगितले, की अमिरातीविरुद्धचे सामने आव्हानात्मक...
  May 23, 03:32 PM
 • कराची - गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तान संघात निर्माण झालेल्या अंतर्गत वादावर अखेर शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतरच पडदा पडणार आहे. चांगली कामगिरी करून संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कर्णधार शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभव आणि वेस्ट इंडीज दौऱ्यातील नाचक्कीपणामुळे उचलबांगडी झालेला आफ्रिदी अखेर निवृत्तीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तान...
  May 23, 01:24 PM
 • 'नाही' हा शब्द ज्याच्या शब्दकोशात नव्हता तो ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्नने शुक्रवारी मुंबईत अखेर स्पर्धात्मक क्रिकेटला 'नाही' म्हटले. कारकीर्दीतील अखेरची स्पर्धात्मक लढत तो मुंबईत खेळला. राजस्थान रॉयल्सच्या वतीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत अखेरच्या षटकात बळी घेऊन वॉर्नने आपल्या स्पर्धात्मक क्रिकेटची सांगता केली. त्यासाठी त्याने मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराची, भारतीय क्रिकेटचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या मुंबईची निवड केली. वॉर्नच्या रंगतदार...
  May 22, 12:40 PM
 • नवी दिल्ली - गत महिन्यात बॉब हाटन यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर वाऱ्यावर असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला प्रशिक्षक मिळाला आहे. अर्माडो कोलाको यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या जुलै महिन्यात दुबईत होणाऱ्या स्पर्धेत अर्माडो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ खेळणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोलाको यांची चार महिन्यांसाठी प्रशिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारताची कामगिरी सुधारण्यासाठी कोलाको...
  May 22, 12:38 PM
 • कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून शाहिद आफ्रिदीची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) माजी खेळाडूंनी टीका केली आहे. पाकिस्तामध्ये सामने होत नसल्याने अडचणीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचे गेल्या दोन वर्षात पीसीबीकडून 11 वेळा कर्णधार बदलण्यात आले आहेत. पीसीबीचे माजी अध्यक्ष लेफ्टनंट जनरल तौकिर झिया यांनी संघाचा कर्णधार सतत बदलत असल्याने संघात फूट पडत असल्याचे म्हटले आहे. आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी...
  May 21, 01:06 PM
 • नवी दिल्ली - भारताचा टेनिसस्टार सोमदेव देववर्मन याने जागतिक टेनिस क्रमवारीत एकेरीमध्ये ६६ वे स्थान मिळविले आहे. सोमदेव टेनिस कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानावर आहे. सोमदेवबरोबर भारताच्या इतर टेनिसपटूंनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. सानिया मिर्झा 74 व्या स्थानावर पोहचली आहे. तर रोहन बोपण्णानेही दुहेरीच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याचीही कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. महेश भुपती मिश्र दुहेरीच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आणि लिएँडर पेस सातव्या स्थानावर...
  May 19, 05:13 PM
 • सिडनी - ऑस्ट्रेलियाचा मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट क्लार्क याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.सिडनीत सुरु होणाऱ्या टवेंटी-20 स्पर्धेत सिडनी सिक्सर्स या संघाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी 35 वर्षीय क्लार्क स्वीकारणार आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. क्लार्कने आपण सिडनी विद्यापीठाकडून खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. क्लार्क म्हणाला, ''मी क्लबकडून क्रिकेट खेळत राहणार असून, या दरम्यान नवीन खेळाडूंना प्रशिक्षणही देणार आहे....
  May 19, 05:06 PM
 • मुंबई - आपल्या लेगस्पिन फिरकी गोलंदाजीने आयपीएलमध्ये आतापर्यंत छाप उमटविणारा पुणे वॉरियर्सचा गोलंदाज राहुल शर्माने लकव्यासारख्या आजारातून बाहेर पडून जिद्दीच्या जोरावर चमकदार कामगिरी केली आहे. लकव्याची शिकार झाला असतानाही राहुल शर्माने सराव चालूच ठेवला व आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. राहुलच्या याच मेहनतीचे दखल घेऊन समालोचक रवी शास्त्री यांनी राहुलमध्ये फलंदाजांना रोखून ठेवण्याची क्षमता असून, अनिल कुंबळेची शैली त्याच्या गोलंदाजीत दिसत असल्याचे म्हटले आहे.राहुल शर्माला...
  May 19, 04:45 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात