Home >> Sports >> From The Field

From The Field

 • स्पोर्ट्स डेस्क - भारताने टी20 सिरिजच्या पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ची लीड घेतली आहे. हा सामना टीम इंडिया ने जिंकला पण त्याचा फायदा पाकिस्तानला झाला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. या मॅचच्या आधी टी20 रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा संघ 125 अंकांसह पहिल्या क्रमांकावर होता. तर पाकिस्तान 124 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होता. पण भारताकडून पराभवामुळे न्यूझीलंडला 4 गुण गमवावे लागले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ आपोआप पहिल्या...
  November 2, 07:21 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंडच्या विरोधात सिरीजमधील पहिली टी 20 मॅच खेळून क्रिकेटला अलविदा म्हणणाऱ्या आशीष नेहराने चिफ सिलेक्टर एमएसके प्रसादवर हल्ला केला आहे. प्रसाद यांनी म्हटले होते की, दिल्लीच्या सामन्यात नेहरा खेळेल की नाही, याबाबत नक्की काहीही सांगता येणार नाही. त्याला उत्तर देताना नेहराने मॅचनंतर म्हटले की, मी माझ्यासाठी कोणत्याही फेयरवेल मॅचची डिमांड केली नव्हती. तसेच मी सिलेक्टर्सना विचारून खेळायला सुरुवात केली नव्हती तर निवृत्तीसाठी परवानगी का घेईल, असेही नेहरा म्हणाला....
  November 2, 05:41 PM
 • नवी दिल्ली- शिखर धवन आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने तब्बल १० वर्षांनी न्यूझीलंडला टी-२० सामन्यात पहिल्यांदा पराभूत केले. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर ५३ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे फिरोजशहा कोटला मैदानावरील पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना झाला, त्यात भारताने बाजी मारली. सलामीवीर शिखर धवन सामनावीर ठरला. फिरोजशहा कोटला मैदानावरील सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०२ धावा उभारल्या. सलामीवीर...
  November 2, 01:33 AM
 • नवी दिल्ली- टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज अाशिष नेहरा अाता अांतरराष्ट्रीय करिअरचा विक्रमी पल्ला गाठून निवृत्त हाेत अाहे. ताे बुधवारी करिअरमधील शेवटचा अांतरराष्ट्रीय सामना खेळणार अाहे. त्याने दाेन अाठवड्यांपूर्वीच १ नाेव्हेंबर राेजी निवृत्तीची घाेषणा केली हाेती. त्यामुळे अाता ताे घरच्या फिराेजशहा काेटला मैदानावर करिअरमधील शेवटचा सामना खेळून अांतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल. या मैदानावर त्याच्या नावे भारतीय गाेलंदाजांमध्ये सर्वात लांब करिअरच्या विक्रमाची नाेंद...
  November 1, 12:13 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे. अॅक्ट्रेस सागरिका घाटगे 27 नोव्हेंबरला कोर्ट मॅरेज करणार आहे. मुंबईत त्या दोघांचे लग्न होईल. यापूर्वी झहीरच्या होमचाऊनमध्ये म्हणजेच पुण्यात लग्नाचे विविध विधी होतील. जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठीही पार्टी आयोजित करण्यात येणार आहे. लग्नाच्या काही दिवसांनी सागरिकाच्या गावी म्हणजे कोल्हापुरातही काही इव्हेंट्स होणार आहेत. दुसऱ्या धर्मातील पार्टनरबाबत काय म्हणाला झहीर... - एका मुलाखतीत झहीर म्हणाला,...
  October 31, 07:44 PM
 • दुबई- झंझावात कायम ठेवताना फाॅर्मात असलेला विराट काेहली सातत्याने विक्रमांना गवसणी घालत अाहे. यातूनच त्याने क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांना पिछाडीवर टाकण्याची किमया साधली. काेहलीने अापल्या तुफानी शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाला नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका जिंकून दिली. यातील शतकी खेळी विराट काेहलीसाठी विक्रमाला गवसणी घालण्यासाठी फायदेशीर ठरली. या शतकाच्या बळावर त्याने अायसीसीच्या वनडे क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन गाठले. यासाठी त्याने दक्षिण अाफ्रिकेच्या...
  October 30, 11:51 PM
 • कानपूर- भारत-न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील अखेरचा तिसरा सामना ग्रीन पार्क स्टेडियमवर रविवारी खेळला जाईल. १९९५ पासून आजपर्यंत २२ वर्षांदरम्यान भारतीय मैदानावर चौथ्यांदा यजमान टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा निकाल अखेरच्या सामन्यावर लागेल. यापूर्वी १९९५, १९९९ व २०१६ मध्ये दोन्ही संघांत अखेरच्या सामन्यात बरोबरी झाली होती. विजयानंतरही नंबर वन नाही : हा सामना जिंकला तरी भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहील. सध्या आफ्रिका संघ १२० गुणांसह अव्वल...
  October 29, 03:00 AM
 • पुणे- सलामीच्या पराभवाने भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर काहीसा दबावात अाला अाहे. पाहुण्या न्यूझीलंडच्या टीमने पहिला सामना जिंकून मालिकेत अाघाडी घेतली. त्यामुळे अाता यजमानांसाठी निर्णायक असलेल्या दुसऱ्या वनडेत बाजी मारण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू उत्सुक अाहेत. पुण्याच्या मैदानावर बुधवारी भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना हाेणार अाहे. भारतासाठी हा सामना करा वा मरा, असा अाहे. त्यामुळे अापली प्रतिष्ठा जपण्यासाठी विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली यजमान टीम...
  October 25, 05:46 AM
 • एंटरटेनमेंट डेस्क - अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. अनुष्का आणि विराट यांचे अफेयर हे कायम ग्लॅमर आणि चर्चेचा विषय ठरले आहे. भारतीय क्रिकेट संघातीलच नव्हे तर कोहली सध्या जगातील अव्वल क्रिकेटपटू आह. तर अनुष्काही बॉलिवूडच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. पण नुकताच विराट कोहलीनी सुटीसाठी बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. सुट्यांसाठी खासगी कामाचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे...
  October 25, 12:04 AM
 • फरिदाबाद- रवी चाैहान हे एका पायाने दिव्यांग हाेते. बालपणापासूनच त्यांना क्रिकेट खेळण्याचा भारी छंद हाेता. मात्र, सामान्य खेळाडू त्यांना साेबत खेळू देत नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक वेळ निराशेला सामाेरे जावे लागले. मात्र, यादरम्यान त्यांनी अापल्यासारख्या दिव्यांग असलेल्यांच्या मनातील क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडाच उचलला. अापणही या खेळाडूंसाठी काही तरी सकारात्मक करावे, असे त्यांनी ठरवले. यातून त्यांनी दिव्यांगांच्या भारतीय फिजिकल चॅलेंज क्रिकेट असाेसिएशनची स्थापना...
  October 24, 07:38 AM
 • मुंबई- आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी हा संघ निवडला आहे. सोबतच न्यूझीलंडविरूद्धच्या दोन टी-20 सामन्यासाठीही संघ निवड केली गेली आहे. कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेंची निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीला डिसेंबर-जानेवारी महिन्यात मोठी सुटी हवी असल्याचे कळते. त्यामुळे रहाणेंकडे उपकर्णधारपद सोपवले आहे तर विराटच्या अनुपस्थितीत तो...
  October 23, 12:52 PM
 • मुंबई- कर्णधार विराट काेहलीच्या द्विशतकी सामन्यात यजमान टीम इंडियाला वनडे क्रमवारीत नंबर वन हाेण्याची संधी अाहे. काेहली रविवारी करिअरमधील २०० वा वनडे सामना खेळणार अाहे. या सामन्यातील विजयाने भारतीय संघ नंबर वनचे सिंहासन गाठू शकेल. सलगच्या मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ अाता न्यूझीलंडविरुद्धची अापली माेहीम फत्ते करण्यासाठी सज्ज अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात हाेणार अाहे. सलामीचा वनडे सामना...
  October 22, 03:00 AM
 • मुंबई- सॅटनर (३/४४) अाणि मुन्राे (२/२५) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या सराव सामन्यात यजमान बाेर्ड अध्यक्षीय एकादश टीमचा पराभव केला. न्यूझीलंडने गुरुवारी ३३ धावांनी विजयश्री खेचून अाणली. यासह पाहुण्या न्यूझीलंड टीमने दमदार पुनरागमन केले. या टीमला पहिल्या सराव सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. टेलर (१०२) अाणि लॅथम (१०८) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना युवा टीमसमाेर ३४४ धावांचेे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात बाेर्ड...
  October 20, 03:00 AM
 • ढाका- बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 3-1 ने  पराभव केला आहे. या सामन्यात विजय मिळवत भारताने अ गटात आपले पहिले स्थान कायम राखले आहे. भारताकडून 17 व्या मिनीटाला चिंगलीन सानाने गोल झळकावत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर भारताने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही, संपूर्ण खेळावर आपले वर्चस्व कायम राखत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला.   पाकिस्तानवर सलग सहावा विजय भारताच्या खेळाडूंनी  अतिशय सफाईदार खेळ केला. विशेषकरुन...
  October 16, 03:07 AM
 • स्पोर्ट डेस्क- क्रिकेटपटू अाशिष नेहराची संपूर्ण कारकीर्द जखमा, त्रास शस्त्रक्रियांचा सामना करण्यातच गेली अाहे. क्रिकेट कारकीर्दीत त्याच्यावर १२ वेळा शस्त्रक्रिया झाली अनेकदा लहान-माेठे उपचारही झाले अाहेत. एवढ्या जखमांबाबत विचारले असता तो विनाेदाने म्हणाला की, माझ्या शरीरात जखमा नाहीत, तर जखमांमध्ये माझे शरीर अडकले अाहे. नेहरा जेव्हा विशेषत: दिल्लीतील हिवाळ्यात झाेपेतून उठताे, तेव्हा त्याच्या गुडघ्यात खूप त्रास हाेताे. त्याला अंथरुणावरून उठण्यास चालण्यासच सुमारे अर्धा तास...
  October 15, 10:15 AM
 • नवी दिल्ली - वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव आणि फलंदाज लोकेश राहुलला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन वनडे सामन्यासाठी संघातून बाहेर ठेवले आहे. शनिवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वैयक्तिक कारणांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून बाहेर राहिलेला सलामीवीर शिखर धवन, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले. दुसरीकडे भारातीय संघाचा अाघाडीचा फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची सलग पाचव्यांदा मालिकेसाठी निवड झाली नाही....
  October 15, 05:12 AM
 • हैदराबाद- तिसऱ्या सामन्यात विजय संपादन करून मालिका विजयाचा भारत अाणि अाॅस्ट्रेलियाच्या अाशेवर पाणी फेरल्या गेले. पावसामुळे हैदराबाद येथील मैदान पुर्णपणे पाण्याखाली हाेते. त्यामुळे येथे हाेणारा तिसरा अाणि शेवटचा निर्णायक टी-२० सामना रद्द करण्यात अाला. त्यामुळे ही तीन टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बराेबरीत राहिली. मैदान पुर्णपणे अाेले असल्याने पंचांनी हा निर्णय जाहीर केला. भारताने सलामीचा सामना जिंकून मालिकेत अाघाडी घेतली हाेती. मात्र, त्यानंतर अाॅस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात...
  October 14, 12:12 AM
 • हैदराबाद- भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा अाणि शेवटचा टी-२० सामना शुक्रवारी हैदराबादच्या मैदानावर रंगणार अाहे. प्रत्येकी एका विजयासह दाेन्ही संघांनी अातापर्यंत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. त्यामुळे अाता दाेन्ही संघांसाठी हा शेवटचा सामना निर्णायक अाहे. गत सामन्यातील विजयाने पिछाडीवर पडलेल्या अाॅस्ट्रेलियाला मालिकेत बराेबरी साधता अाली. मात्र, वनडेपाठाेपाठ अाता अाॅस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका विजयाकडे टीम इंडियाची नजर अाहे....
  October 13, 03:00 AM
 • स्पोट्रर्स डेस्क- टीम इंडियाचा गोलंदाज आशिष नेहरा हा व्यावसायिक क्रिकेटमधून आता रिटायर होणार आहे. न्युझीलंडविरोधात 1 नोव्हेंबरला होणारा सिरीजमधील पहिला टी-20 सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.याबाबत त्याने टीमचा कप्तान विराट कोहली आणि टीमचा हेड कोच रवी शास्त्री यांना सांगितले आहे. नुकताच परतला होता टीममध्ये - आशिष नेहराला ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सुरु असणाऱ्या टी-20 सिरीजमध्ये टीममध्ये सामील करण्यात आले होते. आठ महिन्यानंतर तो टीममध्ये परतला होता. - या मालिकेपुर्वी तो...
  October 11, 09:33 PM
 • रांची- सलगच्या मालिका विजयाने टीम इंडिया सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे अाता हीच लय अाॅस्ट्रेलियाविरुद्ध हाेणाऱ्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतही कायम ठेवण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक अाहे. या दाेन्ही संघांतील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात हाेणार अाहे. सलामीचा सामना रांचीच्या मैदानावर रंगणार अाहे. यातून यजमानांना अापल्या मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची माेठी संधी घरच्या मैदानावर अाहे. भारताने यापूर्वी पाहुण्या...
  October 7, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED