जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • विशाखापट्टणम - गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज शुक्रवारी आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना हाेणार आहे. हे दाेन्ही संघ विशाखापट्टणमच्या वायएसआर रेड्डी स्टेडियमवर समाेरासमाेर असतील. दिल्लीच्या युवा टीमने एलिमिनेटर सामन्यात हैदराबादचा पराभव केला. या विजयाच्या बळावर दिल्लीने फायनलमधील प्रवेशाच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. आता चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील विजेत्या टीमची फायनल रविवारी तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाेबत हाेणार आहे. चेन्नई...
  May 10, 10:27 AM
 • विशाखापट्टणम -सलामीवीर पृथ्वी शॉ (५६) आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (४९) धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद संघावर आयपीएलच्या १२ व्या सत्रात बुधवारी २ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने पहिल्यांदा प्ले ऑफचा सामना जिंकला. आता दिल्लीचा क्वालिफायर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध १० मे रोजी विशाखपट्टणम येथे होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १९.५ षटकांत ८ गडी गमावत विजयी...
  May 9, 08:21 AM
 • चेन्नई -तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने मंगळवारी यंदाच्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. या संघाने आपल्या करिअरमध्ये पाचव्यांदा आयपीएलची फायनल गाठली आहे. सामनावीर सूर्यकुमारच्या (नाबाद ७१) झंझावाती अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर सामन्यात यजमान चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबई संघाने १८.३ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह मुंबईने दिमाखदारपणे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे गत चॅम्पियन आणि यजमान चेन्नई...
  May 8, 08:32 AM
 • माेहाली - दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्स संघाने सहाव्या विजयाची नाेंद करून यंदाच्या आयपीएलमधील प्ले ऑफ प्रवेशाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. काेलकाता संघाने शुक्रवारी लीगमधील आपल्या १३ व्या सामन्यात यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. काेलकाता संघाने १८ षटकांत सात गड्यांनी सामना जिंकला. यासह काेलकाता संघाने प्ले आॅफच्या शर्यतीमधील आपले आव्हान कायम ठेवले. पंजाबच्या टीमला आपली पराभवाची मालिका खंडित करता आली नाही. प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८३ धावा काढल्या....
  May 4, 09:27 AM
 • मुंबई - तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाने गुरुवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलच्या प्ले आॅफमधील आपला प्रवेश निश्चित केला. मुंबईने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. हार्दिक पांड्या (७) आणि पाेलार्डने (२) तुफानी फटकेबाजी करून मुंबईला सुपर विजय मिळवून दिला. यासह मुंबईने आठव्या विजयाची नाेंद केली. हैदराबादचा हा सातवा पराभव ठरला आहे. मनीष पांडेने (७१) लीगमधील तिसरे वेगवान अर्धशतक ठाेकले. मात्र, पराभवाने ते व्यर्थ गेले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५ बाद १६२ धावा...
  May 3, 10:46 AM
 • बंगळुरू - मुसळधार पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलमध्ये यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान राॅयल्स यांच्यातील रंगतदार सामना रद्द झाला. पावसामुळे सामन्याला रात्री उशिरा सुरुवात झाली. दरम्यान, सामना पाच षटकांचा ठेवण्यात आला. यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकांत ७ बाद ६२ काढल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने ३.२ षटकांत एका गड्याच्या माेबदल्यात ४१ धावा काढल्या. दरम्यान, पुन्हा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यातून दाेन्ही संघांना...
  May 1, 09:21 AM
 • हैदराबाद - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या डेव्हिड वॉ्नरच्या (८१) झंझावातापाठाेपाठ राशिद खान आणि खलील अहमदच्या (प्रत्येकी ३ बळी) धारदार गाेलंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये विजयाचा षटकार मारला. यजमान हैदराबाद संघाने आपल्या घरच्या मैदानावर साेमवारी पाहुण्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. हैदराबाद संघाने ४५ धावांनी सामना जिंकला. हैदराबाद संघाचा यंदाच्या लीगमधील हा सहावा विजय ठरला. तसेच किंग्ज इलेव्हन पंजाबला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम...
  April 30, 09:18 AM
 • काेलकाता - हार्दिक पांड्याच्या (३४ चेंडूंत ९१) झंझावातानंतरही मुंबई इंडियन्स संघाला रविवारी आयपीएलमधील पाचवा पराभव टाळता आला नाही. यजमान काेलकाता नाइट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सवर ३४ धावांनी मात केली. यासह काेलकाता संघाने पराभवाची मालिका खंडित केली. प्रथम फलंदाजी करताना काेलकाता संघाने २ बाद २३२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईने सात गड्यांच्या माेबदल्यात १९८ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक चमकला : मुंबईचा हार्दिक तुफानी खेळीने चमकला. त्याने १७ चेंडूंत ५० धावा काढल्या. यासह...
  April 29, 10:29 AM
 • दिल्ली - सामनावीर शिखर धवन (५०) आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (५२) झंझावाती खेळीच्या बळावर यजमान दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलमध्ये आठव्या विजयाची नाेंद केली. यजमान संघाने रविवारी लीगमधील आपल्या १२ व्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावला. दिल्लीने १६ धावांनी सामना जिंकला. यासह दिल्लीचा संघ यंदा लीगच्या प्लेआॅफमध्ये दाखल झाला आहे.अशा प्रकारे प्ले आॅफमधील आपले स्थान निश्चित करणारा दिल्ली हा चेन्नईनंतर दुसरा संघ ठरला. दिल्लीच्या...
  April 29, 10:24 AM
 • जयपूर -संजू सॅमसन (नाबाद ४८) अाणि लाइमच्या (४४) शानदार खेळीच्या बळावर यजमान राजस्थान राॅयल्स संघाने शनिवारी अायपीएलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. राजस्थान संघाने अापल्या घरच्या मैदानावर पाहुण्या सनरायझर्स हैदराबाद संघावर ७ गड्यांनी मात केली. यासह राजस्थान संघाने यंदाच्या लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेेंद केली. यासह राजस्थानने प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने ८ बाद १६० धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने तीन गड्यांच्या...
  April 28, 10:11 AM
 • चेन्नई -तीन वेळच्या किताब विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये गतचॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबई संघाने ४६ धावांनी धाेनीच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या चेन्नईवर मात केली. यामुळे चेन्नईला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने यंदाच्या सत्रात सलग दुसऱ्यांदा चेन्नईचा पराभव केला. राेहितच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने चेन्नईसमाेर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मलिंगा (४/३७), कृणाल (२/७) अाणि बुमराह (२/१०) यांनी...
  April 27, 07:25 AM
 • कोलकाता -अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत रायन परागच्या ४७ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर आयपीएलच्या १२ व्या सत्रात गुरुवारी ३ गडी राखून विजय मिळवला. वरुण अॅरोनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ६ बाद १७५ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात राजस्थान निर्धारित १९.२ षटकांत ७ बाद १७७ धावा काढल्या. राजस्थानच्या परागने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत ३१ चेंडूत ५ चौकार व २ षटकार खेचत सर्वाधिक ४७ धावा ठोकल्या. अजिंक्य...
  April 26, 09:30 AM
 • बंगळुरू -स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स (नाबाद ८२) आणि मार्क्स स्टोइनिस (नाबाद ४६) यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर आयपीएल १२ च्या सत्रात १७ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ४ बाद २०२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाब २० षटकांत ७ बाद १८५ धावा करू शकला. स्टार फलंदाज डिव्हिलियर्स सामनावीर ठरला. बुधवारी बंगळुरूच्या डिव्हिलियर्सने ४४ चेंडूंत नाबाद ८२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ३ चौकार व...
  April 25, 09:31 AM
 • चेन्नई -गत चॅम्पियन यजमान चेन्नईचे सुपरकिंग्ज यंदाच्या १२ व्या सत्रातील आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये दिमाखदारपणे दाखल झाले आहे. अशा प्रकारे प्ले ऑफमधील प्रवेश करणारा चेन्नई सुपरकिंग्ज हा यंदा पहिला संघ ठरला आहे. शेन वाॅटसन (९६) अाणि केदार जाधवच्या (नाबाद ११) झंझावाती खेळीच्या बळावर चेन्नई संघाने आपल्या घरच्या मैदानावर मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. चेन्नई संघाने ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह चेन्नईने आठव्या विजयाची नाेंद केली. हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद...
  April 24, 09:12 AM
 • जयपूर - ऋषभ पंत (नाबाद ७८) आणि शिखर धवनच्या (५४) झंझावाती खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने साेमवारी आयपीएलमध्ये सातवा विजय संपादन केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीच्या टीमने आपल्या ११ व्या सामन्यात यजमान राजस्थान राॅयल्सचा पराभव केला. दिल्लीने १९.२ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. या सातव्या विजयाच्या बळावर दिल्ली संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. राजस्थानच्या रहाणेने (१०५) ७ वर्षंनंतर शतक ठाेकले. मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही. राजस्थान संघाने घरच्या...
  April 23, 09:03 AM
 • हैदराबाद - यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. यजमानांनी आपल्या घरच्या मैदानावर दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्सला पराभूत केले. हैदराबादने ९ गड्यांनी सामना जिंकला. जाॅनी बैयरस्ट्राेने (८०) नाबाद अर्धशतकी खेळीसह हैदराबादसाठी झटपट १५ षटकांत विजयश्री खेचून आणली. तसेच डेव्हिड वाॅर्नरने संघाच्या विजयात माेलाचे अर्धशतकाचे याेगदान दिले. पाहुण्या काेलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना क्रिस लीनच्या (५१)...
  April 22, 09:21 AM
 • जयपूर -सलगच्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी राजस्थान राॅयल्स संघाने नेतृत्वात खांदेपालट केली. याच नेतृत्वातील बदलाने राजस्थानला अायपीएलच्या १२ व्या सत्रातील नवव्या सामन्यात विजयाची पताका फडकावता अाली. राजस्थानने घरच्या मैदानावर शनिवारी तीन वेळच्या चॅम्पियन मुुंबई इंडियन्सचा ५ गड्यांनी पराभव केला. राजस्थानविरुद्ध मुंबईचा सलग चाैथा पराभव झाला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १९.१ षटकांत पाच गड्यांच्या...
  April 21, 09:58 AM
 • काेलकाता -विराट काेहलीच्या (१००) झंझावाती शतकाच्या बळावर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ईडन गार्डन मैदानावर दाेन वेळच्या चॅम्पियन काेलकाता नाइट रायडर्स संघाला धूळ चारली. बंगळुरूने १० धावांनी लीगमधील आपला नववा सामना जिंकला. यासह बंगळुरूला दुसऱ्या विजयाची नाेंद करता अाली.काेहलीचे हे ३ वर्ष आणि ३५ डावानंतरचे शतक ठरले. पाहुण्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या माेबदल्यात यजमान काेलकाता टीमसमाेर २१४ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात काेलकाता...
  April 20, 09:29 AM
 • नवी दिल्ली -पांड्या बंधू कृणाल व हार्दिकने अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर आयपीएलच्या १२ व्या सत्रात गुरुवारी ४० धावांनी विजय मिळवला. अष्टपैलूू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या सामनावीर ठरला. मुंबईने २० षटकांत ५ बाद १६८ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १२८ धावा करू शकला. मुंबईच्या १६ षटकांत एकवेळ ११० धावा होत्या. कृणाल व हार्दिकने अखेरच्या ४ षटकांत ५८ धावा ठोकल्या. हार्दिकने १५ चेंडूत २ चौकार...
  April 19, 09:01 AM
 • हैदराबाद -डेव्हिड वॉर्नर (५०) आणि जॉनी बेयरस्ट्रो (६१*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपरकिंग संघावर बुधवारी आयपीएलच्या १२ व्या सत्रात ६ गडी राखून विजय मिळवला. सामना गाजवणारा जॉनी बेयरस्ट्रो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने २० षटकांत ५ बाद १३२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १६.५ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करत २५ चेंडंूत १० चौकारांसह ५०...
  April 18, 09:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात