Home >> Sports >> From The Field

From The Field

 • काेलकाता-आयपीएल लिलावात इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सलग दुसऱ्या वर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला. १२.५ कोटी रुपयांची बोली लावून राजस्थान रॉयल्सने त्याला खरेदी केले. भारताकडून सर्वात महागडे मनीष पांडे, लोकेश राहुल यांच्यावर ११ कोटींची बोली लावण्यात आली. फॉर्म गमावलेल्या खेळाडूंमध्ये विविध संघांनी रस दाखवला नाही. त्यामुळेच ट्वेंटी-२० मध्ये ३२३ सामने खेळून ११०६८ धावा करणाऱ्या ख्रिस गेल आणि २४८ सामने खेळून ३३१ बळी घेणाऱ्या गोलंदाज लसिथ मलिंगावर बोली लावण्यात आली नाही. फॉर्ममध्ये असलेले...
  January 28, 02:38 AM
 • जाेहान्सबर्ग- टीम इंडियाला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या दक्षिण अाफ्रिका संघाचा तिसऱ्या कसाेटीतील विजयासाठी एल्गार माे. शमी (५/२८), जसप्रीत बुमराह (२/५७) अाणि ईशांत शर्माने (२/३१) हाणून पाडला. या युवांच्या धारदार गाेलंदाजीने अाफ्रिकेची दुसऱ्या डावात १७७ धावांवर दाणादाण उडाली. त्यामुळे टीम इंडियाने ६३ धावांनी शानदार विजय संपादन केला. यामुळे भारताला मालिकेचा शेवटही गाेड करता अाला. युवा गाेलंदाजांच्या चमकत्कारिक कामगिरीच्या बळावर भारताने वेळीच सामन्याला कलाटणी...
  January 28, 12:02 AM
 • बेंगळुरू - आयपीएलच्या 11 व्या हंगामासाठीचा लिलाव बेंगळुरुत सुरू आहे. या लिलावात क्रिकेटपटुंवर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला असल्याची माहिती मिळाली आहे. बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क सारख्या विदेशी खेळाडुंना यावेळी तगडी रक्कम मिळालीच आहे. पण भारतीय क्रिकेटपटुही त्यांच्या तोडीला मोठ्या रकमांना विकले जात असल्याचे दिसले आहे. मनीष पांडे आणि लोकेश राहुल अकरा कोटींसह सर्वात महागडे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ख्रिस गेलला पहिल्या दिवशी खरेदीदार मिळाला नाही. तर इशांत...
  January 27, 04:39 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलच्या 11 व्या पर्वासाठी लिलावाला आजपासून सुरुवात होणार आहे. या लिलावामध्ये क्रिकेटपटुंच्या यादीतील युवराजसिंगवर पुन्हाएकदा अनेकांची नजर असणार आहे. आयपीएलमध्ये युवराजला हवे तसे यश मिळालेले नाहीत. तरीही त्याच्यावर अनेकांना विश्वास आहे. त्यामुळे आजही अनेक संघमालकांची नजर युवराजवर असेल. या पॅकेजद्वारे आम्ही युवराजच्या फॅन्ससाठी असे फोटो दाखवणार आहोत, जे कदाचित त्यांनी यापूर्वी पाहिलेलेही नसतील. पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराज सिंहचे काही रेअर PHOTOS..
  January 27, 10:32 AM
 • नवी दिल्ली- येत्या २७ व २८ जानेवारी आयपीएल संघ आणि क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दोन्ही दिवशी आयपीएलचे आठ संघांसाठी १८२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. २८ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत सर्व संघांचे चित्र स्पष्ट होईल. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने केवळ एक-एक खेळाडू परत पाठवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकता नाइटरायडर्स हे संघ आपल्या जुन्या खेळाडूंवर विश्वास दाखवू शकतात. कारण, त्यांची जुनी चांगली टीम होऊ शकते. त्यांच्या चांगला ताळमेळ देखील...
  January 26, 03:01 PM
 • जोन्हासबर्ग- भुवनेश्वरकुमार आणि जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव १९४ धावांवर संपुष्टात आणला. द. आफ्रिकेला नाममात्र ७ धावांची आघाडी मिळाली. भारताचा पहिला डाव १८७ धवांवर आटोपला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत सामन्यात रंगत आणली. दक्षिण अाफ्रिकेने कालच्या १ बाद ६ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. नाबाद रबाडा खेळपट्टीवर दोन तासांपेक्षा जास्त वेळ टिकून राहिला. त्याने ८४ चेंडूत ६ चौकारांसह...
  January 26, 02:00 AM
 • जोहान्सबर्ग- भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकेच्या अंतिम कसोटीत पहिल्याच दिवशी ढेपाळला. भारताचा डाव १८७ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिका टीम भारतीय संघाला व्हॉइटवॉश देण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. भारताने नाणेफेक जिंकून हिरव्यागार खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी घेतली. रात्री आणि सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. अशा परिस्थितीतही भारताने फलंदाजीचा कठीण निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा...
  January 25, 02:00 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील टेस्ट सीरीजमधील तिसरा आणि अखेरची मॅच सध्या जोहान्सबर्ग येथे खेळली जात आहे. मॅचमध्ये चेतेश्वर पुजाराच्या स्लो बॅटिंगवरून सोशल मीडियात त्याची खूप खिल्ली उडविली जात आहे. लोकेश राहुल शून्यावर बाद होताच पुजारा बॅटिंग करायला आला, मात्र तो खूपच स्लो खेळत होता. त्याच्या या स्लो बॅटिंगचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता जेव्हा त्याला पहिली धाव काढण्यासाठी तब्बल 54 बॉल खेळावे लागले. त्यामुळे क्रिकेट फॅन्सनी त्याची खूपच खिल्ली उडविली. फॅन्सने...
  January 24, 05:06 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर रोहित शर्मा याला पीएम नरेंद्र मोदींचे कौतूक करणे चांगलेच महागात पडले. फॅन्सच्या त्याला आपल्या खेळावर फोकस कर असे सांगत सुनावले. फॅन्सने हे सुद्धा म्हटले की, रोहितने यासाठी मोदींचे कौतूक केले जेणेकरून कोहली त्याला पुढील सामन्यासाठी टीममध्ये ठेवेल. बुधवारपासून भारत- साउथ अफ्रिका यांच्यात टेस्ट सीरीजचा तिसरा आणि अखेरची कसोटी जोहान्सबर्गमध्ये खेळली जात आहे. काय म्हटले होते रोहित शर्माने.... - रोहितने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दावोसमध्ये दिले...
  January 24, 04:50 PM
 • काेलकाता- सुपरस्टार अाॅलराउंडर सुरेश रैनाने (१२६) साेमवारी मुश्ताक अली चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुपर लीगमध्ये झंझावाती शतकी खेळी केली. यासह त्याने भारताच्या युवा टीमचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदच्या विक्रमालाही मागे टाकले. याशिवाय या शतकाने त्याने दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध अागामी वनडे मालिकेसाठी निवड समितीचेही लक्ष वेधून घेतले अाहे. या तुफानी शतकाच्या बळावर उत्तर प्रदेश संघाने सुपर लीगमध्ये बंगालचा पराभव केला. उत्तर प्रदेश टीमने ब गटातील सामन्यात बंगालवर ७५ धावांनी मात केली. सुरेश...
  January 23, 05:43 AM
 • सिडनी- माेर्गनच्या नेतृत्वाखाली पाहुण्या इंग्लंड संघाने रविवारी यजमान अाॅस्ट्रेलियावर मालिका विजय संपादन केला. इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या वनडेत अाॅस्ट्रेलियावर १६ धावांनी मात केली. यासह इंग्लंडला पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी अाघाडी मिळाली. यजमान अाॅस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर मालिकेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. यामुळे यजमानांना मालिका पराभवाच्या नामुष्कीला सामाेरे जावे लागले. जाेस बटलरच्या (१००) नाबाद झंझावाती शतकाच्या बळावर इंग्लंडने यजमान...
  January 22, 03:30 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- तिस-या कसोटीसाठी दक्षिण अफ्रिकेत बोलावलेल्या विकेटकीपर दिनेश कार्तिकबाबत खूप कमी क्रिकेट फॅन्सला माहित असेल की, त्याची सासू क्रिकेटर होती. दिनेशची सासू सुसान इटिचेरिया महिला टीम इंडियाकडून क्रिकेट खेळली आहे. भारताकडून 7 कसोटी आणि 2 वनडे मॅच खेळली आहे. सुसान बॅट्समन आणि फास्ट बॉलर होती. दिनेश कार्तिकने सुसानची मुलगी दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले आहे जी स्क्वॅश प्लेयर आहे. असे राहिले करियर.... - सुसान इटिचेरियाने 31 ऑक्टोबर, 1976 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी डेब्यू केला...
  January 21, 07:22 PM
 • वेलिंग्टन- कर्णधार विलियम्सनच्या नेतृत्वाखाली यजमान न्यूझीलंडने अापल्या घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवताना शुक्रवारी पाकिस्तान टीमचा धुव्वा उडवला. यजमान न्यूझीलंडने मालिकेत सलग पाचव्या विजयाची नाेंद केली. न्यूझीलंडने १५ धावांनी पाचव्या वनडेत पाकवर विजय संपादन केला. यासह न्यूझीलंडने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा ५-० ने सुफडासाफ केला. यजमानांचा मार्टिन गुप्तिल सामनावीर अाणि मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याची वनडे सिरीजमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली....
  January 20, 05:48 AM
 • जाेहान्सबर्ग- सलगच्या दाेन पराभवांमुळे टीम इंडियावर दाैऱ्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध कसाेटी मालिका गमावण्याची नामुष्की अाेढवली अाहे. अाता याच मालिकेतील अापला शेवट गाेड करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे. यासाठी पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघात तिसऱ्या कसाेटीसाठी माेठा बदल हाेण्याचे संकेत अाहे. येत्या २४ जानेवारीपासून भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसाेटीला जाेहान्सबर्ग येथे सुरुवात हाेईल. यासाठी संघातून युवा फलंदाज राेहित शर्मा, पार्थिव पटेल,...
  January 20, 05:43 AM
 • माउंट- पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली भारतीय युवांनी शुक्रवारी अायसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय संपादन केला. भारताने स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव केला. भारताने २१.४ षटकांत १० गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने अापल्या गटाच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवले. अनुकूल राॅय (४/२०), अर्शदीप सिंग (२/१०) अाणि अभिषेक शर्मा (२/२२) यांच्या धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेचा १५४ धावांत खुर्दा उडाला. प्रत्युत्तरात...
  January 20, 05:39 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानी क्रिकेटर आणि इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक नुकताच न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या वनडेत जखमी झाला. फील्डरचा थ्रो थेट त्याच्या डोक्यावर आदळला. ज्यानंतर तो मॅच खेळू शकला नाही. त्याला झालेल्या दुखापतीनंतर इंडियन स्टार क्रिकेटर शिखर धवनने ट्वीट करत शोएबच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. धवनचा हा अंदाज दोन्ही देशांतील बहुतेक फॅन्सला खूप भावला. मात्र, काही फॅन्स असेही आहेत ज्यांनी धवनला पाकिस्तानी...
  January 19, 03:28 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षाखालील विश्वकरंडक युवा क्रिकेट स्पर्धेत आपल्याजवळ थांबलेला बॉल फलंदाजाने यष्टिरक्षकाकडे दिला. त्याच्या या कृतीबद्दल त्याला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल पंचांनी बाद दिले. यामुळे आता आता या नियमात बदल करण्याची सूचना बादचा निर्णय मिळवलेल्या विंडीजच्या माजी क्रिकेटपटूंसह अनेकांनी केली आहे. काय घडले, कसे दिले बाद.... - दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जीवेशन पिल्ले याने विडींजच्या हॉयते याला कव्हरमधून फटकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू...
  January 19, 09:54 AM
 • नवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने अाता पुन्हा एकदा विक्रमाला गवसणी घातली. त्याने अापल्या उल्लेखनीय कामगिरीची लय कायम ठेवताना अायसीसीच्या पुरस्कारांमध्ये विक्रम केला. त्याने एकाच वर्षात अायसीसीच्या चार पुरस्कारांचा बहुमान पटकावला. अशा प्रकारे काेहली हा विराट पाच पुरस्कारांचा एकाच वेळी मानकरी ठरलेला पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने चार गटात बाजी मारली. याशिवाय त्याने पहिल्यांदा ताे अायसीसीच्या कसाेटी फलंदाजांच्या क्रमवारीत ९०० गुणांचा अाकडा पार केला अाहे....
  January 19, 02:00 AM
 • दुबई- दक्षिण अफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका बुधवारीच गमावल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी एक गुड न्यूज आली आहे. विराट ICC क्रिकेटर ऑफ द ईयर 2017 ठरला आहे. विराटला सर गॅरफील्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाईल. सोबतच त्याला 2017 साठी ICC ODI प्लेयर ऑफ द ईयर सुद्धा निवडले आहे. पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इतर ICC अवॉर्ड्समध्ये कोणी कोणी मारली बाजी...
  January 18, 02:55 PM
 • सेंच्युरियन- दक्षिण अाफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी १३५ धावांनी विजय मिळवत भारताचे २५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंग केले. कसोटीत पदार्पण करणाऱ्या लुंगी एनगिडीने (३९ धावांत ६ बळी) भेदक मारा करत २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला १५१ धावांवर रोखले. भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत केपटाऊन कसोटी गमावल्यानंतर २-० ने पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली. भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण अाफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला...
  January 18, 06:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED