जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> From The Field

From The Field

 • नवी दिल्ली - पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने अखेरच्या व पाचव्या वनडेत टीम इंडियाला ३५ धावांनी पराभूत करत ३-२ ने मालिका विजय मिळवला. शतकवीर उस्मान ख्वाजा सामनावीर व मालिकावीर ठरला. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे (१००) शानदार शतक आणि हँडसकाॅम्बच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद २७२ धावा उभारल्या. यात ख्वाजाने मालिकेतील दुसरे शतक झळकावले. तो भारताविरुद्ध द्विपक्षीय...
  March 14, 09:21 AM
 • मुंबई - लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे २०१९च्या आयपीएल स्पर्धेच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, देशभरातील सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा आणि ठिकाणांचा मेळ घालताना कसरत करावी लागणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला सलामी आणि अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार चेन्नईतील मतदान दुसऱ्या टप्प्यातील तारखांना होणार आहे. याचाच अर्थ अंतिम सामन्याच्या आयोजनाचा चेन्नई...
  March 12, 03:05 PM
 • मोहाली - पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या यजमान टीम इंडियाला रविवारी धक्का दिला. टर्नरच्या (नाबाद ८४ ) झंझावाती खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने चाैथ्या वनडेत ४ गड्यांनी राेमहर्षक विजयाची नाेंद केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३५८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सहा गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय संपादन केला. यासह टीमने मालिकेत २-२ ने बराेबरी साधली. आता मालिकेतील पाचवा व शेवटचा...
  March 11, 09:28 AM
 • चंदिगड - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथा वनडे सामना आज रविवारी चंदिगडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सलगच्या दाेन विजयांतून भारताने या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. आता भारताची नजर या सामन्यात बाजी मारून मालिका विजयावर लागली आहे. रांचीच्या मैदानावरील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयाची नाेंद केली. त्यामुळे आता हीच लय कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. आघाडीवर असलेल्या भारतीय संघाची रांचीच्या मैदानावरील तिसऱ्या सामन्यातील कामगिरी...
  March 10, 09:58 AM
 • मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2018-19 साठी खेळाडूंच्या कराराची यादी जाहीर केली. यामधून मुरली विजय आणि सुरेश रैनासह सहा खेळाडू बाहेर पडले आहेत. दुसरीकडे युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतसह चार नव्या चेहऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आला. यंदा २५ खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले. तसेच महिलांच्या गटात २० खेळाडूंना ही संधी मिळाली आहे. ग्रेड अ + मधून शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दाेघेही बाहेर झाले आहेत. त्यांना आता ब गटात स्थान मिळाले. तसेच शमी, कुलदीप आणि ईशांत यांनी प्रगती साधताना अ गटात...
  March 9, 11:03 AM
 • रांची - सलगच्या दाेन पराभवांनंतर सावरलेला ऑस्ट्रेलिया संघ शुक्रवारी विजयी ट्रॅकवर परतला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि आपल्या निर्णायक वनडेत यजमान भारतावर मात केली. ऑस्ट्रेलियाने ३२ धावांनी ४८.२ षटकांत सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेिलयाने भारताचे मालिका विजयाचे मनसुबे उधळून लावले. आता मालिकेतील चाैथा वनडे सामना उद्या रविवारी हाेणार आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा (१०४) व अॅराेन फिंच (९३) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमाेर ३१४ धावांचे माेठे लक्ष्य ठेवले....
  March 9, 10:44 AM
 • रांची - सलगचे दाेन सामने जिंकल्यानंतर जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता आपल्या घरच्या मैदानावर विक्रमी मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. भारताला ३५ वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी हॅट््ट्रिकसह द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी आहे. यापासून टीम इंडिया अवघ्या एका पावलावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना आज शुक्रवारी रांचीच्या मैदानावर रंगणार आहे. भारताने सलगच्या दाेन विजयांच्या बळावर या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी...
  March 8, 11:46 AM
 • नवी दिल्ली - हॉकी इंडियाने २८ व्या सुलतान अझलान शाह कपसाठी १८ सदस्यीय भारतीय हॉकी संघाची घोषणा केली. संघातील ९ वरिष्ठ व प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे संघात युवा व नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. मिडफिल्डर मनप्रीत सिंगला कर्णधारपदी आणि डिफेंडर सुरेंदर कुमारला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आले. अझलान शाह कप इपोह (मलेशिया) येथे २३ ते ३० मार्चदरम्यान होईल. भारताची लढता २३ मार्च रोजी जपानशी होईल. असे आहे संघ गोलरक्षक -पीआर श्रीजेश, कृष्ण बी. पाठक. डिफेंडर - गुरिंदर सिंग, सुरेंद्रर...
  March 7, 11:12 AM
 • माद्रिद - स्पेनचा फुटबॉल क्लब रियल माद्रिद गेल्या पाच वर्षांत चार वेळा युरोपियन चॅम्पियन होता. मात्र, यंदा टीम आपल्या घरच्या मैदानावर चॅम्पियन लीगच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभवासह स्पर्धेतून बाहेर झाली. ११ हजार कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू असलेल्या क्लब रियल माद्रिदला १३८० कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू असलेल्या अजाक्सने मंगळवारी रात्री दुसऱ्या लेगमध्ये ४-१ ने हरवले. हॉलंडचा क्लब अजाक्सने ५-३ ने एकूण गुणांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. रियल माद्रिद एकूण १३ वेळा युरोपियन चॅम्पियन...
  March 7, 10:53 AM
 • नागपूर - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या सामनावीर विराट काेहलीने (११६) शानदार शतकी खेळी करून विक्रमाला गवसणी घातली. त्याने मंगळवारी पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा वनडे सामना गाजवला. याच्या शतकाच्या बळावर यजमान टीम इंडियाने ८ धावांनी ऑस्ट्रेलियावर मात केली. यासह भारताने वनडेमध्ये ५०० व्या विजयाची नाेंद केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमाेर विजयासाठी खडतर २५१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला २४२ धावांवर राेखले. भारताकडून कुलदीप (३/५४), शंकर (२/१५)...
  March 6, 10:18 AM
 • मुंबई - विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आली की जगभर वेगवेगळा स्पर्धा, लॉटऱ्या, क्रिकेट शब्दकोड्यांचा, क्रिकेट कल्पनांचा पुरस्कार, आर्थिक आमिषाच्या योजनांचे पेव फुटते. भारतात किंवा आशिया खंडात तर अशा योजनांचा सुळसुळाट होत असतो. प्रगत राष्ट्रांमधील क्रिकेटप्रेमीही या मोहापासून अलिप्त राहू शकत नाहीत. अशा अतिउत्साही, अतिमहत्त्वाकांक्षी क्रिकेटशौकिनांना कुणी नव्हे तर यावे ळी चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी ) सावधगिरीचा इशारा दिला आहे. यापूर्वीच्या स्पर्धांच्या वेळेचे अनुभव...
  March 5, 10:33 AM
 • नागपूर - सलामीच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ आता आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यातही पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना आज मंगळवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. भारताने सलामीचा सामना जिंकून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता या सामन्यात बाजी मारून भारताला वनडेत ५०० व्या विजयाची नाेंद करण्याची संधी आहे. वनडेत विजयाचा हा आकडा गाठणारा भारत जगातील दुसरा संघ ठरेल....
  March 5, 10:30 AM
 • दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट काैन्सिलने (आयसीसी) दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांशी संबंध तोडण्याच्या बीसीसीआयची मागणी फेटाळली. तसेच पाकला वर्ल्डकपमध्ये खेळू देण्याच्या निर्णयावरची आपली भुमिकाही ठाम ठेवली. त्यामुळे पाकिस्तानचा विश्वचषक खेळण्याचा मार्ग माेकळा झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जून रोजी सामना होणार आहे. या सामन्यात खेळण्याचा निर्णय आता आयसीसीने भारताच्या केंद्र सरकारवर साेपवला. यातूनच आता टीम इंडियाला विश्वचषकात पाकिस्तानशी सामना खेळायचा की नाही, हा...
  March 4, 11:09 AM
 • अमरावती - राहायला घर नाही, हाती पैसा नाही, कशीतरी जुळवाजुळव करायची, अशा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीच्या चेंडूला जिद्द, इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवण्याच्या निर्धाराने बेधडकपणे फटकारून भारती फुलमाळीने भारतीय महिला संघात स्थान पटकावले. या संधीचे सोने करीत तिने आजपासून गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० संघातही स्थान मिळवले आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात राहणाऱ्या सर्वसाधारण शिक्षक कुटुंबातील भारतीने सहाव्या वर्गापासून झपाटल्याप्रमाणे हाती क्रिकेटची बॅट व...
  March 4, 11:06 AM
 • हैदराबाद - माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनी (नाबाद ५९) अणि केदार जाधव (नाबाद ८१) यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारताने शनिवारी वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. टी-२० मालिका पराभवातून सावरलेल्या यजमान भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात केली. यासह टीम इंडियाने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर रंगणार आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद २३६ धावा काढल्या हाेत्या....
  March 3, 09:49 AM
 • क्रिस गेलला लोक फिटनेसबाबत नेहमी प्रश्न विचारत असत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०६ षटकार मारणारा टी-२० चा धडाकेबाज फलंदाज गेल खेळासोबतच पार्टीतही धमाल करतो. त्यामुळे तंदुरुस्तीबाबतचे त्याचे रहस्य नेहमी जिज्ञासा निर्माण करत होते, पण स्वत: गेलने विविध मुलाखतींत त्याचे उत्तर दिले आहे. गेलने सांगितले की, आळस हे माझ्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. बालपणापासूनच लोक त्याला क्रॅम्पी म्हणत असत. क्रॅम्पीचा अर्थ आहे मर्यादेपेक्षा जास्त आळशी व्यक्ती. संधी मिळते तेव्हा विश्रांती घेणे गेलला आवडते....
  March 2, 12:09 PM
 • नवी दिल्ली - टी-२० मालिकेतील अपयशातून सावरलेला यजमान भारतीय संघ आता वनडे मालिकेत पाहुण्या आॅस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला आज शनिवारपासून सुरुवात हाेत आहे. भारतासाठी ही विश्वचषकासाठीची तयारी करण्याची शेवटची संधी आहे. कारण, येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये वनडेच्या वर्ल्डकपला सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे या मालिकेच्या माध्यमातून आता टीम अव्वल कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तसेच भारतीय...
  March 2, 10:25 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ७ गड्यांनी पराभूत करत मालिका २-० ने आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाने ११ वर्षांनी भारताला टी-२० मालिकेत हरवले. यापूर्वी २००८ मध्ये भरताला १-० ने मात दिली होती. ऑस्ट्रेलियाने १९१ धावांचे लक्ष्य २ चेंडू राखून गाठले. ग्लेन मॅक्सवेलने ५५ चेंडूत तुफानी फटकेबाजी करत नाबाद ११३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ सणसणीत चौकार व ९ उत्तुंग षटकार खेचले. तो सामनावीर आणि मालिकावीर ठरला. शॉर्टने ४० धावा आणि हँडकोम्बने नाबाद २० धावांचे...
  February 28, 12:19 PM
 • दुबई - आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीला आज बुधवारपासून दुबई येथे सुरुवात हाेत आहे. ही बैठक २ मार्चपर्यंत चालणार आहे. यादरम्यान आगामी काळातील विविध स्पर्धांसह आयाेजनाच्या विषयावर चर्चा हाेईल. या बैठकीमध्ये भारत-पाक सामन्याचा विषय अधिक लक्षवेधी ठरणारा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सीइआे राहुल जाेहरी हे या बैठकीदरम्यान उपस्थिती असतील. त्यामुळे ते पाकविरुद्ध सामना खेळण्याबाबतच्या विषयासह आपल्या संघाला विश्वचषकादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत...
  February 27, 10:48 AM
 • बंगळुरू - भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टी-२० सामना आज बुधवारी बंगळुरूच्या मैदानावर रंगणार आहे. सलामीच्या विजयाने पाहुणा आॅस्ट्रेलियन संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे या टीमची नजर आता मालिका विजयावर लागली आहे. मात्र, भारतीय संघाने गत ११ वर्षांपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२०ची एकही मालिका गमावली नाही. त्यामुळे या दशकातील मालिका पराभवाची सिरीज खंडित करण्याचा आॅस्ट्रेलियन टीमचा प्रयत्न असेल. मात्र, त्यांना ही मालिका खंडित करण्यासाठी माेठी कसरत करावी लागेल. भारताला...
  February 27, 10:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात