Home >> Sports >> From The Field

From The Field

 • मलाहिडे (डबलीन)- सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता दुसऱ्या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला अाहे. भारताचा दुसरा टी-२० सामना शुक्रवारी अायर्लंड संघाशी हाेणार अाहे. हे दाेन्ही संघ अाज समाेरासमाेर असतील. अायर्लंड टीमला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. भारताने सरस खेळी करताना पहिला सामना जिंकला. यासह भारताला दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी मिळाली. अाता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजयासाठी भारताच्या...
  June 29, 06:50 AM
 • डब्लिन- भारताने आपल्या १०० व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडवर ७६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २०८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात आयर्लंड संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १३२ धावा करू शकला. भारतीय टीमच्या दोन सलामीवीरांनी शानदार सुरुवात करून दिली. रोहित शर्मा आणि शिखर धवनने शानदार अर्धशतके झळकावली. रोहित शर्माने ६१ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ५ षटकार खेचत ९७ धावा काढल्या. राेहितचे हे १५ वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले. त्याचे तिसरे टी-२०...
  June 28, 08:40 AM
 • 25 जूनचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय असा दिवस आहे. 1983 मध्ये याच दिवशी कपिल देवच्या धुरंधरांनी क्रिकेटमधील त्यावेळची दबंग टीम वेस्ट इंडीजला पराभवाचे पाणी पाजून विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यानंतर जरी टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला असला तरी पहिल्या विजयाची सर त्याला येणार नाही. कारण भारताच्या या पहिल्या विश्वचषक विजयानेच सचिन, सौरव यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटुंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली होती. कुणाच्याही ध्याणीमणी...
  June 25, 11:51 AM
 • माद्रिद- सलगच्या विजयाने फाॅर्मात असलेल्या यजमान इंग्लंड संघाने मंगळवारी घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत ४८१ धावसंख्या उभी केली. सलामीवीर ब्रेयस्ट्राे (१३९), हेल्स (१४७)अाणि जेसन राॅय (८२) यांनी झंझावाती खेळी केली. त्यामुळे इंग्लंडच्या नावे विक्रमाची नाेंद झाली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ६ गड्यांच्या माेबदल्यात हा विक्रम रचला. यापूर्वीचा वनडेत सर्वाेच्च ३ बाद ४४४ धावांचा विक्रम हाेता. हा विक्रमही इंग्लंडच्या नावे हाेता. या टीमने ३० अाॅगस्ट २०१६ मध्ये...
  June 20, 09:27 AM
 • लिसेस्टर- श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय युवांनी इंग्लंड दाैऱ्यात सलग माेठ्या विजयाची नाेंद केली. भारत अ संघाने दुसऱ्या सराव सामन्यात लिसेस्टशायरचा पराभव केला. भारताने २८१ धावांनी सामना जिंकला. यासह भारताने सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. यापूर्वी भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड बाेर्ड इलेव्हन संघावर मात केली हाेती. मयंक अग्रवाल (१५१), पृथ्वी शाॅ (१३२) अाणि शुभमान गिल (८६) यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारत अ संघाने यजमानांसमाेर विजयासाठी ४५९ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले...
  June 20, 08:39 AM
 • बंगळुरू- नंबर वन टीम इंडियाने दाेन दिवसांत घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धची कसाेटी जिंंकून अापले वर्चस्व सिद्ध केले. युवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात यजमान भारताने ८७ व्या वर्षात सर्वात माेठ्या विजयाची नाेंद केली. भारताने शुक्रवारी एकमेव कसाेटीत अफगाणिस्तानवर डाव अाणि २६२ धावांनी मात केली. यासह भारताने माेठा विजय अापल्या नावे केला. या विजयात अार. अश्विन (४/२७) अाणि रवींद्र जडेजा (४/१७) यांनी माेलाचे याेगदान दिले. यांनी धारदार गाेलंदाजी करताना एकाच दिवशी अफगाणिस्तान...
  June 16, 05:58 AM
 • बेंगळुरू - अफगाणिस्तानलाडेब्यू टेस्टमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने अफगाणिस्तानचा डाव आणि 262 धावांनी पराभव केले. भारताने पहिल्या डावात 474 धावा केल्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव 27.5 ओव्हरमध्ये 109 धावांवर गुंडाळला गेला. तर दुसरा डावही अवघ्या 103 धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने दुसऱ्याच दिवशी हा सामना जिंकला. पहिल्या डावात अफगाणिस्तानच्या 5 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये गुरुवारी सुरू झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्या...
  June 15, 05:54 PM
 • बंगळुरू- सलामीवीर शिखर धवनच्या (१०७) विक्रमी शतकापाठाेपाठ मुरल विजय (१०५) अाणि लाेकेश राहुलने (५४) शानदार शतकी भागीदारी रचली. या शानदार खेळीच्या बळावर यजमान भारतीय संघाने गुरुवारी पाहुण्या अफगाणिस्तानविरुद्ध कसाेटीत दमदार सुरुवात केली. भारताने पहिल्या डावात दिवसअखेर ६ बाद ३४७ धावा काढल्या. यासह अफगाणिस्तान संघाने अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पण केले. अफगाणिस्तानकडून यामीन अहमदझाईने दमदार पदार्पण करताना दाेन विकेट घेतल्या. तसेच रशीद खान, वफादार, मुजीब रहमान यांनी प्रत्येकी एक विकेट...
  June 15, 01:03 AM
 • बंगळुरू- बांगलादेशविरुद्ध मालिका विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला अफगाणिस्तानचा संघ अाता जबरदस्त फाॅर्मात अाहे. हीच लय कायम ठेवण्याच्या इराद्याने अाता अफगाणिस्तान संघ अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पणासाठी सज्ज अाहे. या दमदार पदार्पणासाठी अफगाणिस्तानच्या युवांनी कसून सराव केला. कर्णधार असगरच्या नेतृत्वाखाली हा संघ दाेन दिवसांपासून नेटवर तयारी करत अाहे. अांतरराष्ट्रीय स्तरावर १२ वा कसाेटी संघ म्हणून अाता अफगाणिस्तानची नाेंद हाेणार अाहे. यासाठी टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य...
  June 13, 05:29 AM
 • 7 जून 1975 रोजी क्रिकेट वर्ल्डकपचा पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांनी आपल्या करिअरमधील सर्वात धिम्यागतीची खेळी खेळली होती. क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात 1975 मध्ये झाली होती. तेव्हा त्याला प्रुरुडेंशियल कप नाव दिले गेले होते. मर्यादित षटकांची क्रिकेटची ही पहिली टुर्नामेंट होती. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्टइंडीज, श्रीलंका आणि पूर्व अफ्रिकेचा समावेश होता. पहिला सामना 7 जून 1975 रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला...
  June 8, 07:11 PM
 • क्वालालंपूर -भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय क्रिकेटर बनली आहे. त्याचबरोबर हे यश मिळवणारी ती जगातील एकमात्र महिला क्रिकेटरदेखील बनली आहे. तिने महिला आशिया कप टी-२० स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ही कामगिरी केली. आता तिच्या २०१५ धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये तिच्यापुढे केवळ दोनच पुरुष क्रिकेटर आहेत. यात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तिल (२२७१) आणि...
  June 8, 06:18 AM
 • क्वालालंपूर - कर्णधार हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी साेमवारी अाशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. सहा वेळच्या चॅम्पियन भारतीय महिला संघाने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात थायलंडचा पराभव केला. भारताने ६६ धावांनी सामना जिंकला. भारताने या विजयाच्या बळावर गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थान गाठले. यासह भारताने स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला. अष्टपैलू कामगिरी करणारी कर्णधार हरमनप्रीत काैर ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. हरमनप्रीत...
  June 5, 04:46 AM
 • नवी दिल्ली- यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला तब्बल ८ वर्षांनंतर कसाेटीसाठी मैदानावर पुनरागमन करण्यासाठी संधी मिळाली अाहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने त्याची नुकतीच अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसाेटी सामन्यासाठी यजमान संघात निवड केली. नुकत्याच झालेल्या ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे कार्तिकला भारतीय संघामध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात अाला. त्याने करिअरमधील शेवटचा कसाेटी सामना २०१० मध्ये...
  June 3, 05:28 AM
 • मुंबई- चेन्नई सुपरकिंग्ज २ वर्षांच्या बंदीनंतर परतली, ती विजयासाठीच. ३४ वर्षांचे सरासरी वयोमान असलेल्या चेन्नई संघाने मुंबईत हैदराबादला ८ गड्यांनी हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. तसेच मुंबई इंडियन्सशीही बरोबरी साधली. चेन्नई चेन्नई २०१० व २०११ मध्ये विजयी झाली होती. हा विजय ७ वर्षांनी मिळाला. अंतिम लढतीत शेन वॉटसन चमकला. त्याने ११७ धाव केल्या. याआधी २०१४ च्या फायनलमध्ये वृद्धिमान साहाने शतक ठोकले होते. शेन वाॅटसनच्या (नाबाद ११७) झंझावाती शतकाच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने...
  May 28, 07:37 AM
 • मुंबई- इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असलेला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी IPL मध्ये विक्रमी आठव्यांदा फायनल खेळण्यास रविवारी मैदानात उतरेल. धोनीच्या चेन्नई संघाने अव्वल स्थानी असलेल्या हैदराबादला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीचे हे विक्रमी आठवे आयपीएल फायनल असेल. आठ आयपीएल फायनल खेळणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या 9 सत्रांत चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधार सांभाळले...
  May 27, 01:22 PM
 • मुंबई- दाेन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ अाता तिसऱ्यांदा अायपीएलचा किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने कंबर कसली. रविवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज अाणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात फायनल मुकाबला हाेणार अाहे. विलियम्सनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे. अाता दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचा हैदराबाद संघाचा प्रयत्न असेल. हैदराबादला नमवूनच चेन्नईने यंदाच्या...
  May 27, 10:34 AM
 • - सुरेश रैनाने आतापर्यंत प्लेऑफमध्ये 18 मॅच खेळत 658 धावा केल्या आहेत. - रैनाशिवाय महेंद्र सिंह धोनीलाच सर्वाधिक 400 धावा करता आल्या आहेत. क्रीडा डेस्क - सुरेश रैनाच्या चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल-11 च्या फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. रैना सातव्या वेळी फायनल खेळणारा दुसरा क्रिकेटपटू असेल. रैनापेक्षा अधिकवेळा संधी मिळणारा धोनी हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याला आठ वेळा ही संधी मिळाली आहे. रैनासाठी आयपीएलचे हे पर्व वैयक्तिक कामगिरीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4,953...
  May 26, 03:55 PM
 • नवी दिल्ली- आयपीएलच्या ११ व्या सत्रातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्सचे हैदराबाद समोर कोलकाता नाइट रायडर्सचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना ईडन गार्डनच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. या दोन्ही संघातील विजेती टीम शुक्रवारी महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबईत किताबासाठी एकमेकांसमोर उभे राहतील. हैदराबाद टीम गटात १४ सामन्यांनंतर अव्वल राहिला होता. मात्र अखेरच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यात कोलकाता विरुद्ध...
  May 25, 03:28 AM
 • लंडन-आयर्लंडचा दिग्गज क्रिकेटर गेल्या आठवड्यात आपल्या करिअरचा पहिला व एकमेव कसोटी सामना खेळणाऱ्या एड. जोएसने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विशेष म्हणजे त्याने दोन देशांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. त्याने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून वनडेत पदार्पण केले होते आणि आयर्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून वनडे व कसोटी सामना खेळला आहे. जोएसला आयर्लंडचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटर म्हणून पाहिले जाते. आयर्लंड क्रिकेटने म्हटले की, ३९ वर्षीय जोएस आता...
  May 25, 03:24 AM
 • मुंबई- हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली सुपरनाेवाज संघाने मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शानदार विजयाची नाेंद केली. या संघाने एकमेव टी-२० सामन्यात स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेजर्सचा पराभव केला. सुपरनाेवाजने ३ गड्यांनी सामना जिंकला. अष्टपैलू कामगिरी करणारी ट्रेलब्लेजर्सची सुझी बेट्स (३२ धावा, २ विकेट) सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. सलामीवीर मिताली राज (२२) अाणि व्याटच्या (२४) शानदार कामगिरीच्या बळावर सुपरनाेवाजने सामना जिंकला. स्मृतीच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी...
  May 23, 11:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED