Home >> Sports >> From The Field

From The Field

 • केपटाऊन- टीम इंडिया अाता यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध सलग मालिका विजयासाठी उत्सुक अाहे. भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील तिसरा अाणि निर्णायक टी-२० सामना शनिवारी केपटाऊनच्या मैदानावर रंगणार अाहे. दाेन्ही संघांनी प्रत्येकी एका विजयासह ही तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ ने बराेबरी साधली अाहे. अाता या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्याचा विराट काेहलीचा मानस अाहे. यासह भारताला वनडेपाठाेपाठ टी-२० मालिका अापल्या नावे करण्याची संधी अाहे. याशिवाय सामन्यातील...
  05:59 AM
 • केपटाऊन- हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ अाता अाफ्रिकेविरुद्ध एेतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर अाहे. शनिवारी भारत अाणि यजमान दक्षिण अाफ्रिकन संघामध्ये पाचवा अाणि शेवटचा टी-२० सामना रंगणार अाहे. हा सामना जिंकल्याने भारतीय महिलांना मालिका विजयाची नाेंद करता येईल. भारताने सलग दाेन विजयासह मालिकेमध्ये २-१ ने अाघाडी घेतली अाहे. पावसामुळे मालिकेतील चाैथा सामना रद्द झाला हाेता. सलगच्या दाेन पराभवानंतर अाफ्रिकेने तिसरा सामना जिंकला हाेता. अाता मालिकेतील पाचव्या...
  05:52 AM
 • नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अाता काेट्यवधी रुपयांची कमाई करण्याची संधी अाहे. याशिवाय भारतातील क्रिकेट प्रेमींनाही अागामी पाच वर्षात १०० पेक्षा अधिक सामन्यांचा अानंद लुटण्याची संधी मिळणार अाहे. यासाठी येत्या २७ मार्च राेजी अागामी पाच वर्षांतील १०० सामन्यांच्या प्रसारण हक्कासाठी ई-लिलावाची प्रक्रिया रंगणार अाहे. गत सहा महिन्यांपूर्वी बीसीसीअायने अागामी पाच वर्षांसाठी स्टार इंडियाला सर्वाधिक लाेकप्रिय ठरलेल्या अायपीएलचे प्रसारण हक्के विकले. यातून बीसीसीअायला...
  February 23, 07:04 AM
 • सेंच्युरियन- कर्णधार डुमिनी आणि क्लासेनच्या अर्धशतकाच्या बळावर दक्षिण अाफ्रिकने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ६ गड्यांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अाफ्रिकेने १८.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. द. आफ्रिकेच्या कर्णधार डुमिनीने ४० चेंडूत ६४ धावा केल्या. जोरदार फटकेबाजी करत हेनरिक क्लासेनने ३० चेंडूत ३ चौकार व ७ षटकार खेचत ६९ धावा ठोकल्या. डेव्हिड मिलर ५ धावांवर परतला. बेहार्डिन...
  February 22, 07:03 AM
 • सेंच्युरियन- भारताचे पुरुष अाणि महिला क्रिकेट संघ सलगच्या विजयाची लय कायम ठेवत यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाले अाहेत. फाॅर्मात असलेल्या भारताच्या या दाेन्ही संघाला मालिका विजयाची संधी अाहे. यातून भारताच्या संघांना दाैऱ्यामध्ये यजमान अाफ्रिकेविरुद्ध वनडेपाठाेपाठ टी-२० मालिकाही जिंकण्याचा पराक्रम गाजवता येईल. विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बुधवारी सेंच्युरियनच्या मैदानावर दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा टी-२० सामना...
  February 21, 03:00 AM
 • मुंबई- बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये भारत सरकारच्या कर धोरणामुळे नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २०१६च्या भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा करमाफी वरून वाढलेली तेढ सध्या वाढली असून त्याचे पर्यावसान, आयसीसीकडून भारतात होणाऱ्या, २०२१ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात होऊ शकते. आयसीसीने अशी टोकाची भूमिका घेतल्यास, मेंबर्स पार्टिसिपेशन अॅग्रीमेंट (एमपीए) हा करार बीसीसीआयकडून रद्द केला जाऊ शकतो. त्यामध्ये आयसीसीचेच...
  February 21, 03:00 AM
 • दुबई- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अापल्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर सामन्यागणिक नवनव्या विक्रमाला गवसणी घालत अाहे. याशिवाय त्याने अापल्या नेतृत्वात भारतीय संघाची विजयी माेहीमही कायम ठेवली. याच उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर अाता त्याने अायसीसीच्या क्रमवारीमध्येही पराक्रम गाजवला. त्याने कसाेटीपाठाेपाठ अाता वनडेच्या क्रमवारीत एकसाेबत ९०० पेक्षा अधिक रेटिंग गुण संपादन केले. अशा प्रकारे दाेन्ही फाॅरमॅटमध्ये ९०० प्लस रेटिंग गुण संपादन करणारा काेहली हा भारताचा पहिला फलंदाज...
  February 21, 01:00 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आता राजकीय नेता बनलेला इम्रान खानने तिसरे लग्न केले आहे. 65 वर्षाच्या इम्रानच्या पत्नीचे नाव बुशरा मेनका आहे. ती त्याची आध्यात्मिक गुरू सुद्धा आहे. काही दिवसापूर्वी हे वृत्त आले होते की, इम्रान तिस-या लग्नाच्या मूडमध्ये आहे आणि त्याने बुशराला प्रस्ताव दिला आहे. खरं तर, बुशराने इम्रानने म्हटले होते की, तिस-या लग्नानंतरच तू पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकशील. आता अशी उडतेय इम्रान खानची खिल्ली..... - सोशल मीडियात माजी पाकिस्तानी क्रिकेटरची जोरदार...
  February 20, 11:20 AM
 • नवी दिल्ली- भारतीय संघाने गतवर्षी काही महत्त्वाच्या सामन्यांत पराभव पत्करला. याच पराभवामुळे टीमला क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमधील नंबर वनचे सिंहासन गमवावे लागले. मात्र, अाता काेहली अँड कंपनीसाठी क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये नंबर वनचे स्थान पुन्हा गाठण्याची संधी अाहे. यासाठी टीमला पुढील २३ दिवसांमध्ये सलग ६ सामन्यांमध्ये विजयाची नाेंद करावी लागेल. या सहा सामन्यांमध्ये दाेन दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध अाहेत. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेतील तिरंगी मालिकेमध्ये चार सामने खेळणार...
  February 20, 06:18 AM
 • काेलकाता - अापल्या झंझावाती खेळीने सामन्यागणिक शतकाची नाेंद करणारा कर्णधार विराट काेहली विक्रमाचा माेठा पल्ला निश्चितपणे गाठून शकेल. यादरम्यान ताे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांच्या विक्रमांनाही मागे टाकेल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केला. विराट काेहलीने नुकत्याच झालेल्या सहाव्या वनडेत शानदार शतक ठाेकले. यासह त्याने वनडे करिअरमध्ये ३५ व्या शतकाची नाेंद केली. याशिवाय त्याने अाफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेमध्ये सर्वाधिक...
  February 20, 05:57 AM
 • नवी दिल्ली- गतवर्षी अायसीसीच्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाला अनपेक्षितपणे पाककडून पराभव पत्करावा लागला. यादरम्यान मिडल शब्दाला भारतीय संघातील सर्वात माेठी दुबळी बाजू मानले जात हाेते. गाेलंदाजीमध्ये मिडल अाेव्हर अाणि फलंदाजीमध्ये मिडल अाॅर्डर. भारताचे खेळाडू मिडल अाेव्हर म्हणजेच ११ ते ४० च्या षटकात अधिक विकेट घेण्यात अपयशी ठरत हाेते. तसेच अाघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मिडल अाॅर्डरच्या फलंदाजांना अाव्हान कायम ठेवता येत नव्हते. मात्र, अाता याच दुबळ्या बाजूल दूर...
  February 19, 03:02 AM
 • ईस्ट लंडन- मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी शुक्रवारी टी-२० मध्ये यजमान दक्षिण अाफ्रिकेवर सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. मितालीच्या (७६) नाबाद झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने टी-२० सामन्यात अाफ्रिकेवर ९ गड्यांनी मात केली. यास भारतीय महिलांनी पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० ने अाघाडी मिळाली. आफ्रिकन महिलांचा हा दुसरा पराभव ठरला. महाराष्ट्राची युवा गाेलंदाज अनुजा पाटील (२/३७) अाणि पूनम यादव (२/१८) यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अाफ्रिकेला ७ बाद १४२ धावांवर राेखले....
  February 17, 07:43 AM
 • सेंच्युरियन- कर्णधार काेहलीने अापल्या विराट नेतृत्वाच्या बळावर टीम इंडियाला दाैऱ्यामध्ये २६ वर्षांतील विजयाची अवघ्या १६ दिवसांमध्ये बराेबरी साधून दिली. भारताने शुक्रवारी मालिकेतील सहाव्या अाणि शेवटच्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेवर ८ गड्यांनी मात केली. यासह भारताने सहा वनडे सामन्यांची मालिका ५-१ ने अापल्या नावे केली. भारताने अातापर्यंत २६ वर्षांत अाफ्रिकेविरुद्ध पाच विजयांची नाेंद केली. यासाठी भारताला २६ वर्षे लागली. मात्र, हेच विजयाचे यश काेहलीने अापल्या कणखर...
  February 17, 03:05 AM
 • आखिंयो से गोली मारे... अशा प्रिया प्रकाशचे सध्या देशभरात कोट्यवधी दिवाने आहेत. मल्याळम अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश वारियरला चित्रपटांसोबतच क्रिकेटचेही वेड आहे. प्रियाला क्रिकेट पाहाणे खूप आवडते. नुकतेच एका मुलाखतीत तिने सांगितले की तिचा फेव्हरेट क्रिकेटर टीम इंडियाचा माजी कॅप्टन एम.एस. धोनी आहे. एकीकडे लोक प्रियाचे दिवाने झाले आहे तर प्रिया माहीची दिवानी आहे. डोळ्यांच्या अदांनी केले अनेकांना घायाळ - सोशल मीडियावर प्रिया प्रकाशच्या व्हिडिओचा बोलबाला आहे. यामध्ये मुलांची संख्या मोठी...
  February 17, 12:09 AM
 • ऑकलंड - ऑस्ट्रेलियाने गुरुवारी इंटरनॅशनल T20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हर्समध्ये 244 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने 7 बॉल शिल्लक ठेवून हे आव्हान पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 6 विकेटवर 243 दावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.5 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावत 245 रन केले आणि मॅच जिंकली. या मॅचमध्ये एकूण 32 षटकारांचा पाऊस पडला. टी-20 च्या 13 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा हा विक्रम आहे. टेस्ट, वनडे...
  February 16, 05:41 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटचे जवळपास सर्व मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर असलेला सचिन तेंडुलकर जीवनात कधीही 58 धावांवर बाद झाला नाही. ऐकायला खरे वाटत नसले तरी हे खरे आहे. करिअरमध्ये 100 शतक करणाऱ्या सचिनने तिन्ही फॉरमॅटमध्ये कधीही 75 आणि 58 धावांचा स्कोअर केलेला नाही. सचिनने सर्वाधिक 17 वेळा 15 धावांचा स्कोअर केला आहे. असेच काही क्रिकेटशी संबंधित इंटरेस्टींग फॅक्ट्स आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, असेच काही Facts..
  February 16, 05:00 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - चित्रपटाच्या एका सीनमध्ये डोळा मारून प्रसिद्ध झालेली मल्याळी अॅक्ट्रेस प्रिया प्रकाश इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. प्रिया सध्या केवळ वर्षांची अशून तिचे शिक्षण सुरू आहे. पण तिचे एक्सप्रेशन्स सोशल मीडियावर एवढे प्रसिद्ध झाले आहेत की, तिचे फनी फोटोज आणि व्हिडिओदेखिल तयार करण्यात आले आहेत. या व्हायरल फिवरपासून इंडियन क्रिकेटर्सही वाचू शकले नाहीत. प्रियाने डोळा मारल्यामुळे आता तिच्याबरोबर काही क्रिकेटर्सचे भन्नाट एक्सप्रेशन असलेले फोटो इंटरनेटवर व्हायर होत आहेत....
  February 16, 03:18 PM
 • स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर्सपैकी काहींनी सेलिब्रिटीसोबत तर काहींनी सामान्य तरूणीशी विवाह केला आहे. मात्र, असेच काहीसे विदेशी क्रिकेटर्सचेही आहे. पाकिस्तानपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक विदेशी क्रिकेटर्स असे आहेत ज्यांनी इंडियन गर्लला आपले साथीदार निवडले आहे. जेव्हा भारतीय तरूणींवर त्यांचे प्रेम बसले तेव्हा ना त्यांनी धर्म पाहिला ना देशाची सीमा बघितली. आज आपण त्यावर नजर टाकूया.... शॉन टेट आणि माशूम सिंघा- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटने इंडियन रॅम्प मॉडेल माशूम सोबत 12 जून,...
  February 16, 02:10 PM
 • सेंच्युरियन- भारत आणि दक्षिण अाफ्रिका हे शुक्रवारी सहाव्या वनडे सामन्यात समोरासमोर येतील. हा सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाईल, जे मैदान भारतासाठी लकी आहे. भारताने येथे ५ सामने जिंकले आहेत. जे दक्षिण आफ्रिकेच्या एका मैदानावरील सर्वाधिक विजय आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मालिका जिंकल्यानंतर सहाव्या वनडेत भारताला आणखी एका विक्रमाची संधी आहे. टीम इंडिया ४-१ ने आघाडीवर आहे. आता टीमकडे द.आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच धर्तीवर एका मालिकेत ५ वनडे जिंकण्याची संधी आहे. भारताने...
  February 16, 03:02 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- राेहितचे (११५) झंझावाती शतक अाणि कुलदीप यादवच्या (४/५७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने मंगळवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेवर मालिका विजय संपादन केला. भारताने मालिकेतील पाचव्या वनडेत अाफ्रिकेवर ७३ धावांनी मात केली. यासह भारताने सहा वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये ४-१ ने विजयी अाघाडी घेतली. राेहितने अाफ्रिकेच्या मैदानावर शानदार पहिले शतक साजरे केले. त्याचे हे करिअरमधील १७ वे वनडे शतक ठरले. त्याने १२६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार व ४ षटकारांच्या अाधारे ११५ धावांची...
  February 14, 01:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED