आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैदी अरेबियात सध्या राेनाल्डाेची हवा:राेनाल्डाे करस्पाँडंटसाठी  24 तासांत 1 हजार अर्ज

अरमानी सय्यदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिस्टियानाे राेनाल्डाे आता साैदी अरेबियातील अल नासर फुटबाॅल क्लबसाेबत करारबद्ध झाला आहे. फुटबाॅलच्या वि‌श्वातील या सुपरस्टारच्या एन्ट्रीने सध्या साैदी अरेबियामध्ये वेगाने प्रगतीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. राेनाल्डाेसह क्लबला माेठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे. यातूनच आता साैदी अरेबियातील एका मासिकाने थेट ‘राेनाल्डाे करस्पाँडंट’साठी खास अर्ज मागवले. यातून अवघ्या २४ तासांमध्ये यासाठी हजारपेक्षा अधिक जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे राेनाल्डाेच्या नावाभोवती असलेले वलय अद्यापही कायम असल्याचे दिसून आले. त्याचा जगभरामध्ये माेठा चाहता वर्ग आहे.

‘आम्ही मध्य-पूर्व भागामध्ये काम करताे. यातून या ठिकाणी आमचे मासिक जाते. मात्र, अद्याप यातून राेनाल्डाेबाबत काेणत्याही प्रकारचे वृत्त आले नाही. त्यामुळेच आम्ही आता खास प्रतिनिधी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच आम्ही सर्वांकडून अर्ज मागवले. या प्रतिनिधींकडून आम्हाला राेनाल्डाेच्या बाबतीतील खास माहिती अपेक्षित आहे. यातूनच आम्हाला राेनाल्डाेविषयीची खास माहिती प्रसिद्ध करता येणार आहे, अशा शब्दांत मासिकाच्या संपादकांनी आपली प्रतिक्रिया दिली.

क्लबचे फाॅलाेअर वाढले : राेनाल्डाेसाेबत विक्रमी डील करणे अल नासर क्लबच्या पथ्यावर पडले आहे. सध्या या फुटबाॅलच्या क्लबच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. साेशल मीडियावर या क्लबचे फाॅलाेअरही झपाट्याने वाढले आहेत. या सर्वांना सातत्याने राेनाल्डाेच्या बाबतीतील माहिती वाचणे आवडत आहे. त्यामुळेच या क्लबच्या फाॅलाेअरची संख्या सध्या ८० लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...