आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 10th Anniversary Of 2011 World Cup Winning Triumph : Why Dhoni Batted Ahead Of Yuvraj In 2011 World Cup Final

वर्ल्ड कप विजयाची दशकपुर्ती:'या' कारणामुळे युवराजच्या आधी मैदानावर उतरला होता कर्णधार महेंद्रसिंह धोनी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीलंकेने भारताला दिले होते 275 धावांचे आव्हान

2 एप्रिल 2011, भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. हा दिवस कोणताच भारतीय विसरू शकत नाही. याच दिवशी भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर वर्ल्ड कप जिंकला होता. त्या दिवशी भारताने फायनलमध्ये श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत करुन वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यातील तो क्षण अजूनही आपल्याला आठवतो, ज्यात कर्णधार महेंद्र सिंह धोनीने अखेरचा षटकार मारुन सामना जिंकला होता. पण, तुम्हाला माहिती का, धोनी ज्या नंबरला खेळायला आला होता, त्या नंबरवर युवराज सिंह येणार होता. मग, त्या दिवशी अचानक असे काय झाले, ज्यामुळे धोनी युवराजच्या जागी खेळायला आला. याबाबत तत्कालीन मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टनने सांगितले की, टुर्नामेंटवर आपली छाप सोडण्याच्या धोनीच्या दृढ संकल्पाने भारताला विश्वविजेता केले. अप्टनने पुढे सांगितले की, युवराजच्या आधी येण्याचा निर्णय धोनीने गॅरी कर्स्टनशी चर्चा करुन घेतला होता. त्यावेळेस धोनी आणि कर्स्टनचा एकमेकांवरील विश्वास पाहण्यासारखा होता.

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोच कर्स्टनसोबत जल्लोष करताना भारतीय खेळाडू
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोच कर्स्टनसोबत जल्लोष करताना भारतीय खेळाडू

ते पाऊल इतके महत्वाचे का ?

वर्ल्ड कपमध्ये युवराजच्या ऑलराउंड प्रदर्शनाने भारताला अंतिम सामन्यापर्यंत येण्यास मोलाची मदत केली. वर्ल्ड कपमध्ये युवराजने 362 धावा आणि 15 विकेट घेतल्या. टुर्नामेंटमध्ये युवराचा 4 वेळा मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने गौरव करण्यात आला. युवराने क्वार्टर फायनलमध्ये तीन वेळचे डिफेंडिंग चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरोधात तणावपूर्ण परिस्थितीतून भारताला बाहेर काढले. दुसरीकडे, वर्ल्ड कपमध्ये कर्णधार धोनीची भूमिका फक्त डिसीजनपुर्ती राहिली होती. टुर्नामेंटमध्ये अंतिम सामन्याच्या आधीपर्यंत धोनीचा हायएस्ट स्कोअर 34 रनांचा होता. जर, धोनीच्या अंतिम सामन्यात युवराजपूर्वी येण्याचा निर्णय चुकला असता, तर आपण वर्ल्ड कपलाही मुकलो असतो.

पॅडी अप्टनने भारतीय खेळाडूंसाठी मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी काउंसलिंग आयोजित केली होती.
पॅडी अप्टनने भारतीय खेळाडूंसाठी मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी काउंसलिंग आयोजित केली होती.

कसा घेतला तो निर्णय ?

अप्टन पुढे सांगतात की, युवराजच्या आधी येण्याचा निर्णय धोनीचा होता. अप्टनने इंडियन एक्सप्रेसशी बातचीतमध्ये सांगितले की, धोनी वानखेडेच्या ड्रेसिंग रुममध्ये बसला होता. हेड कोच गॅरी आणि मी बाहेर बसलो होतो. त्यावेळी मागून खिडकी वाजवण्याचा आवाज आला, मी आणि गॅरीने मागे वळून पाहिले, तर धोनीने मी फलंदाजीला जाणार असे म्हटले. त्यावेळी धोनीने एकही शब्द न बोलता फक्त सांकेतिक भाषेत हे सांगितले. यानंतर गॅरीने मान हलवून होकार दिला. दोघांमध्ये एकही शब्द बोलणे झाले नाही, पण त्या दोघांचा एकमेकांवर इतका विश्वास होता की, बोलण्याची गरज नव्हती.

हा निर्णय का घेतला ?

त्या सामन्यात श्रीलंकेने भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना सेहवाग आणि तेंडुलकर लवकर आउट झाले. यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात चांगली पार्टनरशिप झाली. पण, ती जास्त वेळ टिकू शकली नाही. श्रीलंकेकडून मुथैया मुरलीधरन भारतासाठी खूप धोका ठरू शकत होता. मुरलीधरनविरोधात युवराजचा रेकॉर्डही चांगला नव्हता. श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संघकारानेही युवराजसाठी आपले ट्रम्प कार्ड जपून ठेवले होते. युवराज येण्यापूर्वी मुरलीने फक्त 39 रन देऊन 8 ओव्हर टाकल्या होत्या. यावेळी धोनीने युवराजपुर्वी येऊन संघकाराची प्लॅनिंग धुळीत मिळवली.

त्या निर्णयामागे अजुन कोणते कारण असू शकते ?

युवराजला कँसर झाला होता. याची माहिती टुर्नामेंटनंतर झाली. पण, युवराजचा आजार अंतिम सामन्यापर्यंत खुप वाढला होता. युवराजने अंतिम सामन्यानंतर सांगितले होते की, सामन्यापूर्वी त्याला रक्ताची उलटी झाली होती. पण, त्याने याबाबत कोणालाही सांगितले नाही. पण, आम्हाला असे वाटते की, कर्णधार म्हणून धोनीच्या ते लक्षात आले असावे. यामुळेच धोनीने युवराजपुर्वी जाण्याचा निर्णय घेतला असावा.

श्रीलंकेने भारताला दिले होते 275 धावांचे आव्हान

भारताने 2011 मध्ये आजच्या दिवशी (2 एप्रिल) श्रीलंकेला अंतिम सामन्यात 6 गडी राखुन पराभवाची धुळ चारली होती. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 6 विकेट 274 धावा केल्या होत्या. माहेला जयवर्धनेने 88 बॉलमध्ये 103 धावांची खेळी केलीहोती. प्रत्युत्तरात भारतीय टीमने 48.2 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 277 रन केले होते.

गंभीर आणि धोनीने भारताला अंतिम सामना जिंकून दिला

भारताकडून गौतम गंभीरने 97 रन आणि महेंद्र सिंह धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती.

बातम्या आणखी आहेत...