आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • 12 Months 60 Matches ... 53% T 20; Challenge To Novice Players, Big Challenge In Front Of Selection Committee

टीम इंडियाचे व्यग्र वेळापत्रक:12 महिने 60 सामने... यात 53% टी-20; नवोदित खेळाडूंना आव्हान, निवड समितीसमोर मोठा पेच

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने आगामी टी-२० फाॅरमॅट आशिया कप आणि वर्ल्डकप जिंकण्यासाठी खास डावपेच आखले आहेत. यासाठी भारतीय संघ यंदाच्या १२ महिन्यांपर्यंत सातत्याने मैदानावर खेळताना दिसणार आहे. यातून आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावत पुढच्या वर्षी होणाऱ्या २०२३ वनडे वर्ल्डकपची तयारी करण्यावर भर दिला जाणार आहे.

त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १२ महिन्यांत जवळपास ६० सामने खेळणार आहे. यामध्ये ५३% टी-२० सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळे युवा आणि नवोदित खेळाडूंसाठी हे सामने आव्हानात्मक आहेत. कारण, सामन्यागणिक त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समिती आणि थिंक टँकसमोरही संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे. या ६० सामन्यांदरम्यान दर्जेदार खेळीवर खेळाडूंचा भर असणार आहे. यातून निवडक खेळाडंूंची निवड ही समितीसाठी मोठे जिकरीचे ठरणार आहे. टीम इंडिया या मोहिमेला येत्या ९ जूनपासून आपल्या घरच्या मैदानावर सुरुवात करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया त्यानंतर इंग्लंड आणि आयर्लंड संघाविरुद्धही मालिका खेळणार आहे.

इंग्लंड दाैऱ्यावर भारतीय संघासाठी खास प्रत्येकी तीन वनडे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर लगेच विंडीज आणि झिम्बाव्वे दाैराही आखण्यात आला आहे. यादरम्यान होणाऱ्या वनडे सामन्यांच्या मालिकेतून टीम इंडियाला पुढच्या वर्षीच्या वर्ल्डकपच्या तयारीची संधी आहे. तसेच टीम इंडिया सप्टेंबर महिन्यात आशिया कप क्रिकेट स्पर्धेतही सहभागी होत आहे.

निवड समितीची कसरत; खेळाडूंना मोठी संधी आगामी १२ महिने हे निवड समिती आणि थिंक टँकमधील सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. यादरम्यान होणाऱ्या मालिकांसाठी संघ निवडीचा मोठा पेच निर्माण होणार आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमधून सात युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघातील प्रवेशाचा आपला दावा मजबूत केला आहे. याशिवाय अनुभवी खेळाडूही संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यातून कोणाची निवड करायची, याबाबत पेच निर्माण होणार आहे. मात्र, याच मालिकेच्या माध्यमातून युवांना आपली क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. सध्या विराट कोहली, पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत, बुमराह हे प्रत्येक फाॅरमॅटमध्ये खेळण्यात तरबेज आहेत. मात्र, यांच्या अनुपस्थितीतही असेच स्टार खेळाडू निवडीवर आता भर दिला जाणार आहे. यासाठी शुभमान गिल, मयंक अग्रवालसारखे खेळाडू हे कसाेटीसाठीही सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. टी-२० मालिकेच्या माध्यमातून युवांना संधी मिळेल.

बातम्या आणखी आहेत...