आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाठिंबा:वर्णद्वेषाविराेधात 14 रेसर ट्रॅकवर; गुडघ्यावर बसून माेहिमेला पाठबळ

व्हिएन्ना10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
या रेसमध्ये सहभागी झालेल्या रेसरने माेहिमेला पाठबळ दर्शवले. तसेच काेराेनात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. - Divya Marathi
या रेसमध्ये सहभागी झालेल्या रेसरने माेहिमेला पाठबळ दर्शवले. तसेच काेराेनात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
  • एफ-1: ऑस्ट्रियात झाली सत्राची पहिली रेस

फाॅर्म्युला-१ ची यंदाच्या सत्रातील पहिली रेस रविवारी माेठ्या उत्साहात पार पडली. मात्र, या रेसदरम्यान वर्णद्वेषाविराेधात रेसरमध्ये प्रचंड संताप हाेता. यालाच विराेध करण्यासाठी सुरू असलेल्या ब्लॅक लिव्हस मॅटरच्या माेहिमेला या सर्व रेसरने वेगळ्याच पद्धतीने पाठबळ दर्शवले. ऑस्ट्रियन ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेल्या २० पैकी १४ रेसरने गुडघ्यावर बसून या माेहिमेचे समर्थन केले.

गत महिन्यात अमेरिकेत वर्णद्वेष आणि भेदातून कृष्णवर्णीय जाॅर्ज फ्लाॅइडची हत्या झाली. त्यामुळे जगभरातील क्रीडाविश्वात एकच संतापाची लाट पसरली. प्रत्येक खेळाडू आता याच्याविराेधात मैदानावर उतरत आहे. याचाच प्रत्यय लाॅकडाऊननंतर झालेल्या पहिल्याच एफ-१ रेसच्या दरम्यान आला. यातील सहभागी रेसरने याचा तीव्र शब्दांत निषेध केला. चाचणी करून रेसर या स्पर्धेत सहभागी झाले हाेते.

एफ-1: ऑस्ट्रियात झाली सत्राची पहिली रेस

या रेसमध्ये सहभागी झालेल्या रेसरने माेहिमेला पाठबळ दर्शवले. तसेच काेराेनात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्या आणखी आहेत...