आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया:15 वर्षीय संयुक्ता काळे भारताची ‘सिमोन बाइल्स’; 5 सुवर्ण जिंकले

चंदीगड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राची १५ वर्षीय संयुक्ता काळेला भारताची सिमोन बाइल्स म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अमेरिकेची बाइल्स ही जगातील महान जिम्नॅस्ट आहे. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्समधील २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने ५ सुवर्ण जिंकून क्लीन स्वीप केले होते. तसेच संयुक्ताने खेलो इंडिया स्पर्धेत ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये पाच सुवर्ण जिंकून क्लीन स्वीप केले. तिने पाचही स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिला एकूणच सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्ट म्हणूनही गौरवण्यात आले. संयुक्ताचा एकूण स्कोअर ८५.५५ होता. ही सर्व पदके तिच्यासाठी खास आहेत, कारण तिने बॅडमिंटन हॉलमध्ये त्याची तयारी केली. तिच्याकडे प्रशिक्षणासाठी पुरेशी जागा किंवा उपकरणे नव्हती. सोबत फक्त प्रशिक्षक मानसी होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून संयुक्ताला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक मानसी सुर्वे-गावंडे म्हणाल्या, “या पाच सुवर्णपदकांमुळे जिम्नॅस्ट संयुक्ताची गुणवत्ता सिद्ध होते. आम्ही ठाण्यात एकत्र प्रशिक्षण घेतले आहे. आशियाई चॅम्पियनशिपसाठीही पात्र ठरणारी संयुक्ता ही देशातील एकमेव खेळाडू होती.

संयुक्ताला या प्रकारात 06 आहेत पदके

बातम्या आणखी आहेत...